Monday, December 24, 2018

धोका

धोका

ती होती सगळ्यांची सखी ‘सोबती ,जीवलग…..आणि खुप काही….विचार पडला ना कोण असेल अशी  ?बर त्याच झाल अस नूतन अगदी गुणी मुलगी…सगळ्यांना जपणारी,मदत करणारी.आणि तिच्याच् नाशिबी अस याव??आता तुम्हाला वाटत असेल काय झाल अस तिच्यासोबात. ती आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण एन्जॉय करणारी होती…ती आज एक सक्सेसफुल बिसनेसवुमन झाली पण….
शाळेत असताना ती अभ्यासात हुशार,दिसायला एकदम सुन्दर होती ती…कोणीही प्रेमात पडेल अशी खुप हेल्पिंग …खुप लोभस …एकदम ड्रीमगर्ल…..गोरी गोरीपान…खुपच् रेयर कॉम्बिनेशन….
ती लहान म्हणजे 2 वर्षांची असताना तिची आई तिला सोडून देवाकडे गेली…आणि तिच्या वडिलांनी दूसरे लग्न केले..तिची स्वताची आई खुपच सुन्दर होती तिने सगळ सौंदर्य तिच्या आईकडूनच घेतल होत अस म्हणायला हरकत नाही…बिचारी एका अपघातात गेली नुतनला तर काही समजत पण नव्हतं की काय झालय..आणि आता आपण परत आपल्या आईला पाहू शकणार नाही....ती मस्त  लाइफ एन्जॉयच करत होती…ती तिच्या आजीची खुप लड़की होती..तिच्या आईच्यामागे आजीच् आई झाली होती तिची…खुप लाड़ात मोठी होत होती ती..तिची हर एक फ़रमाईश पूर्ण होत होती..म्हणजे थोडक्यात सांगायच् झाल तर दुःख काय असत हे तिने कधी पाहिलच् न्हवत्..अशीच ती लाड़ामध्ये मोठी होत होती…
शिक्षण पूर्ण झाल तिच ..आता घरात तिच्या लग्नविषयी बोलणी होउ लागली होती…भरपुर स्थळ सांगून आली होती तिला..एकतर अतिशय सुंदर अणि त्यात मोठ्या घरची मुलगी…

तिने तिच्या वडिलांच्या ऑफिस च्या कामात पण मदत करायला सुरुवात केली होती..तिच्या वडिलांनी दूसरे लग्न केले होते तिला एक मुलगा एक मुलगी होती…नूतनला त्यांच्या शिवाय करमत नसे अजिबात…ती त्यांना खुप जीव लावत होती.तिच्या मनातपण नव्हतं की हे आपले सावत्र भावंड आहेत..शेजारी पाजारी खुप कौतुक करायचे तिच…
तिच्या वडिलांच्या ऑफ़ीस समोर एक ऑफिस होत त्यांचा मुलगा अविनाश रोज तिला बघत बसायचा या मॅडम ना त्याचा काही तपासच नव्हता..
तो रोज तिच्या यायच्या वेळी तिच्या ऑफिस समोर उभा राहायचा…ती आत जाऊन जागेवर बसेपर्यंत तो तिथून आत जात नसे..आणि ही आपली आपल्याच नादात…जसकी तुम्हाला काय करायचय ते करा मला काय..अशा थाटात असायची ती…शेवटी एक दिवस त्याने डेरिंग केलच डायरेक्ट वाघाच्या जबड्यातच हात घातला म्हणा ना पठ्याने…
नूतन गाडीतून उतरली आणि आतमध्ये निघाली इतक्यात साहेब समोर जाऊन उभे राहिले ना तिच्या.
ति : कोण आपण ??काही काम होत का माझ्याकडे?मी ओळखते का तुम्हाला?
तो: हो थोड़ काम होत महत्वाच्…
(त्याला बघुन खुप हसु आल नुतनला तो इतका घाबरुण बोलत होता की जसकाय् त्याच्या समोर वाघच उभा होता…)
ति: कसल महत्वाच् काम? तुम्ही आमचे न्यू क्लाइंट आहात काय? मला तर काहीच माहित नाही तुमच्या प्रोजेक्ट बद्दल ..अस करा तुम्ही माझ्या पप्पां सोबत बोला तेच तुम्हाला हेल्प करू शकतील …if you don’t mind can I go to my office now? Bye…आणि निघाली की ही…तो तर बघतच बसला तिला नेहमीप्रमाणे….
पण आज तो आजुनच जास्त प्रेमात पडला तिच्या…का??? अहो आज तो बोलला न तिच्याशी…तिचा तो मंजुळ आवाज..बोलण्यातला कॉन्फिडेन्स.साहेब पुरता कामतुनच गेला की …पहिलाच घायाळ आजुनच घायाळ झाला  बिचारा...
ती ऑफिस मध्ये गेली आणि कामाला लागली..हे साहेब तिथेच् उभे होते अजुन…नुतनच्या डेस्क वरचा फ़ोन वाजला..तिने तो काम करता करताच उचलला..हॅलो नूतन हियर..पण नो answer तिने फ़ोन ठेऊन दिला .अस 2-3वेळ झाल..मग तिचे patience संपले तिने बडबड करत रिसीवरच काढून ठेवला…आणि पुन्हा आपल्या कामाला लागली..तिला काम करता करता मधेच अविनाश चा तो घबरलेला चेहरा आठवत होता. पण त्याचे डोळे तिला वेगळच् काही सांगत होते..ती एकटिच हसत होती..त्याच वेळी तिचे वडील तिथे आले.तिला अस हसताना पाहून ते चकित झाले..
नुतनचे वडील म्हणजे गावातल मोठ प्रस्थ..खुप पैसा पण त्याचा माज जरापण नाही..गावात त्यांचे कारखाने,दुकान, अनाथ आश्रम, सामाजिक संस्था अस बरच काही होत..नूतनला इतक्या मनापासून हसताना पाहून त्याना खुप बर वाटल..ते किती सांगायाचे तिला अग मैत्रिणींसोबत फिरायला जा मजा कर अत्ता तुझ वय मजा करायच् आहे..नंतर जबाबदाऱ्या आहेतच की..
पण तिची आजी गेल्यापासून ती खुप बदलली होती..तीच हसण खिदळण् विसरून गेली होती ती...आई ने पण आजी गेल्यापासून तिचे सावत्रपणाचे गुण दाखवायला सुरुवात केली होती..
नुतनला तिची आई अभ्यास पण नीट करू देत नसे..कुठल्या न कुठल्या प्रकारे तिने तिला त्रास द्यायला सुरुवात केली होती..तीच जवळच अस कोणीच नव्हतं..या सगळ्या प्रकारामुळे ती एकदम एकटी पडली होती…कोणाशिच् जास्त बोलत नसे…सतत आपल्याच विश्वात…असच तिने आपल् कॉलेज पूर्ण केल तेहि फर्स्ट क्लास मध्ये …घरात तीच आणि आईच् अजिबात जमतच नव्हतं त्यामुळे नुतनने विश्वासरावाचं ऑफिस जॉइन केल…तिच्यामुळे त्यांच्या व्यवसायात खुप जास्त भरभराट झाली..विश्वासराव खुप खुश होते तिच्या कामावर ..पण त्याचसोबत इतक्या लहान वयात तीच इतक पोक्तपणे वागण त्यांना खटकत होत…त्यांना पण वाटायच् नुतनने मस्त हसाव,फिराव, मजा करावी…
बर असो... ती गलातल्या गालात अशी हसत असतानाच विश्वासराव तिच्या जवळ गेले ..आणि असच खोट खोकले…ती एकदम दचकलि आणि बोलली…
नूतन:अरे पप्पा तुम्ही कधी आलात? आणि आज काय खोकला येतोय का ?मेडिसिन घेतल का?
पप्पा: अग हो हो …एकाच दमात् किती प्रश्न विचारशील..मी एकदम ठंणठणित बरा आहे पण आज आमच्या राजकुमारीला काय झालय?? एकट्याच् हसताय??हम्म काही स्पेशल घटना घडली वाटत आज??एकदम मिश्किलपने बोलत होते ते…
नूतन: (स्वतःला सावरत) काही नाही कुठे काय झाल तेव्हा ?? छे हो पप्पा..पण तुम्हाला अस का वाटल बर?
पप्पा : अग पोरी आज खुप वर्षानी तुला अस मनापासून हसताना पहिलग मन एकदम भरून आल बघ तुला अस खुश बघुन…आज तू ज्याकुणामुळे हसलीस ना त्याचे पाय धुवून पाणी पिईंन बघ् मी..(आणि त्यांच्या डोळ्यात अलगद अश्रु तरळलेच्)
वडिलांचे अश्रु पाहून नूतन पण खुप भाउक झाली आणि तिने त्याना प्रेमाने मीठी मारली…आणि बोलली पप्पा आई गेली तेव्हा आजी माझी आई झाली..आजी गेली आणि मला एकदम पोरक झाल्यासारख वाटायला लागल होत…माझ कशातच लक्ष लागत नव्हतं…पण आज तुम्ही माझ्या आईची जागा घेतलीत…सॉरी पप्पा मला कधी तुमच प्रेम समजलच नाही हो..पण आता मी रोज हसतना दिसणार तुम्हाला…आणि तुम्हालापण हसायला लावणार…नंतर थोड़ावेळ कोणीच काही बोलल नाही…इतक्यात एक स्टाफ आला आणि काही कामासाठी विश्वासरावांना घेऊन गेला….
वडिलांच्या मनातील आपल्यासाठीच अव्यक्त प्रेम समजल्यावर नूतन खुप खुश झाली होती .तिला पुन्हा हसावेसे बागडावेसे वाटू लागले…ती खुश रहात असल्यामुळे आजुनच सुन्दर दिसू लागली होती;आणि त्यामुळे इकडे अविनाश खुपच जास्त बैचेन होउ लागला होता.त्याच न जेवणात, न घरात ,न कामात कशातच लक्ष लागेना झाल होत…थोडक्यात काय तर साहेबाना लवेरिया झाला होता….तो फ़क्त एक मोका शोधत होता तिला प्रपोज़ करण्याचा…
विश्वासराव एक महिन्यासाठी दिल्ली ला गेले होते नूतन एकटीच सगळा कारभार संभाळत होती त्यामुळे घरी जायला खुप उशीर होत असे..त्यांच्या ड्राईवरला ती घरी पाठवून देत असे कारण तिला अस कोणाच् पर्सनल आयुष्य हिरावुन घेणे कधीच मान्य नव्हते.
त्या दिवशी तिला असाच खुप उशीर झाला ऑफिस मधून निघायला…पाऊस जोर जोरात पडत होता ..रास्त्यांमधे खुप पाणी भरले होते त्यामुळे घरी जाणे अगदीच अशक्य होते …तरी नशीब तासापूर्वीच तिला भूक लगल्यामुळे तिने जेवण मागवुन जेवली होती ती..तिला तर अस वाटल पण नव्हतं की तासभरात पाऊस अस रौद्र रूप धारण करेल आणि आपण बाहेर पडूच शकणार नाही.. तिने मनातल्या मनात विचार केला बर झाल बाई मी कोणालाच् थांबवल नव्हतं कामासाठी नाहीतर ते पण बिचारे अडकले असते इथेच…आणि रामु काकांना पण मी रोज सारखच बळेच घरी पाठवल..
नूतन विचार करत होती की हा तर बकीच्यांचा विचार झाला पण आता माझ काय? मी काय करू? आपल्या मतोश्रीना तर काहीच फरक पडणार नाही आपण घरी गेलो तरी आणि नाही तरी पण संजू आणि राजुल बैचेन होणार ..घाबरूण जातील बिचारे चला त्यांना तरी कॉल करुण सांगते मी ऑफिस मधे अडकले आहे ते…नाही अडकले नको …मग हं मी कामात आहे आज ..सकाळपर्यंत येईल अस… सांगते..नाहीतर परत यायचे इथे इतक्या पावसात….मनाशीच् ठरवून  तिने तसेच सांगितले …
संजू: अग ताई कशाला थांबते ??नको तू घरी येऊन बस करत काम तुझी…काहीपण काय आजपर्यंत पप्पा पण कधी रात्रभर असे थांबले नाहीत ऑफिस मधे…नको ग ताई प्लीज़ ये तू घरी…मी येऊ का तुला घ्यायला??खुप पाऊस आहेन कदाचित तू ड्राइव नाही करू शकणार..मी आलोच आपण घरी येऊ मग…
नूतन : अरे बाळा नको येउस तू..ऐक माझ…जर काम लवकर झाल तर येईन मी घरी …
दोघांच् बोलण राजुल ने ऐकल तिने संजूच्या हतातील फ़ोन जवळ जवळ ओढूनच घेतला
राजुल :काय झाल ग ताई तु ये घरी आता खुप उशीर झालाय न…मग ??अग तुला जेवायचेय आजून…तू ये मगच मी जेवणार…नाहीतर मी पण उपाशीच झोपणार…
नूतनचे डोळे पाण्याने डबडबले होते …त्यातच ती बोलली अग माझी छोटी परी..मी जेवले ग …आणि तू जरका उपाशी राहीलीस ना ते पण मझ्यामुळे तर आईना माझ घर उन्हात बांधेल …बांधुदेका ??बोल…
राजुल ला आता मात्र राडुच् आल …नको नको मी जेवते…तू कर तुझ काम ताई …..पण नक्की जेव हा …माझी शप्पथ आहे बघ तुला…
नूतन : हो ग चिमाणे …चल मी आता फ़ोन ठेवते हं खुप काम करायचय न मला…
नूतनचे हे दोन डोळेच होते …आणि ही त्याचं ह्रदय होती…एक डोळ्याला जरी त्रास झाला तर आपण कसे बैचेन होतो तशी नूतन होत असे या दोघांसाठी….आणि हृदयाचे ठोके कसे अचानक बंद झाले….त्याची जाणीव होन बंद झाल तर आपण कावरे बावरे होतो…तसेच हे दोघे नूतन नाही भेटलि , बोलली किवा दिसली नाही की... त्याचा जसकाय प्रणवायुच संपलाय की काय अस होत...
इतकावेळ नूतन ऑफिस बाहेर पैसेज मध्ये येऊन एका बेंचवर बसली होती…. पाऊस थांबून पाणी कधी कमी होतय याची वाट बघत..तिथुनच तिने घरी फोन केला…थोड़िशी रड़ली ..थोडिशि हसली…तिला अस वाटलच नव्हतं की कोणी जवळपास असेल …इतक्या लेट कोण थांबणार होत ??माझ्यासरख्या मुर्खाशिवय...आणि कधी नव्हे ते जोरात हसली होती ती…एकटेपनातला बालीशपना एन्जॉय करत होती ती…यालाच म्हणतात न दुःख मै भी ढूंढो तो खुशी मिलही जाती है…
तिचा हा सगळा वेडेपना तिच्यासाठी वेडा झालेला अविनाश एका कोपऱ्यात बसून बघत होता…आजपर्यंत त्याने तिला अस कधी पाहिलच नव्हतं…नेहमी फ़क्त एक जबरदस्त अशी बिज़नेस वुमनच् पहिली होती त्याने…तिच्या त्या रूपावर तर तो इम्प्रेस होताच पण हे रूप त्याहिपेक्षा जास्त लाघवी होत….

अविनाश खुप वेळ तिच्याकडे लपून लपून पहातच् होता तिच्या अगदी नकळतपणे…अचानक नूतन गुणगुनु लागली…आला आला वारा संगे पावसाच्या धारा….आणि अचानक अविनाशला काय झाल कोणास ठाऊक तीच इतकच गुणगुणेपर्यन्त तो पण आला तिच्या जवळ आणि गाउ लागला संगे अविनाश बेसहारा…तुझ्या प्रेमासाठी झाला वेडा हा दिवाना… झाला वेडा हा दिवाना…. नुतनला हे अगदीच अनपेक्षित होत…तिला समजतच नव्हतं काय react कराव…पण ती घाबरली होती हे मात्र खर…मग उगाचच झाशीच्या रानीचा खोटा आवेग घेऊन नूतन : तुम्ही आत्ता इथे कसे? माझ्या गाण्यामध्ये असे मधेच का आलात तुम्ही?(ती केव्हापासून काय काय वेडेपना केला ते आठवून.. खुपच बावरली होती…तो काय विचार करत असेल माझ्याबद्दल हे विचार आणि बरच काही पाठोपाठ येत होत डोक्यात तिच्या…वरुन मात्र मैडम एकदम cool)
अविनाश: घबरलात न? वाटलच मला तुम्ही घबरणार….म्हणून तर तुम्हाला कंपनी द्यायला थांबलो मी…मघाशी पाहिल सगळे गेले तरी तुम्ही ऑफिस मधे…बाहेर पाऊस सुरु झालाच होता…मग तुम्ही इथे अडकणार हे तर निश्चितच होत…तेवढच आज थोड़ जास्त वेळ दर्शन मिळाल तुमच..
नूतन : एकदम रागातच ओरडली ,”ओ मिस्टर तुम्ही काय बोलताय तुम्हाला तरी समजतय काय? Are you mad? इथून चालायला लागा आधी…नाहीतर मला लीगल एक्शन घ्यावी लागेल…
अविनाश: हो खरच mad झालोय मी ….पुरताच वेडा ….आणि आता मला न पोलिस सुधारु शकतील न डॉक्टर …तूच आहेस माझा इलाज…हो फ़क्त तूच
नूतन : (मनात तर लाडू फूटत होते…तरीही चेहरा संतापलेला आणि आवाजात जरब) ए हॅल्लो तुझी माझी ना ओळख ना पाळख …भिती नाही वाटत तुला अस माझ्या ऑफिस जवळ येऊन बोलताना…
अविनाश :(आज त्यानी ठरवलच होत काहीही होउदेत..हिला मी माझ्यामनातल सांगणारच आजुन किती दिवस असा एकटाच झुरू हिच्यासाठी …हीच मन पण कळुदेत की मला) अहो भीति कसली त्यात तुम्हाला माहित नाही.. पण सख्खे ऑफिस शेजारी आहोत आपण…तुमच्या केबिन समोरच माझ् केबिन आहे मैडम…रस्त्यावरचा गुंड नाही मी…माझ नाव अविनाश भालेकर तुमच्या सारखेच आम्हीपण प्रतिष्ठीत आहोत इथले…आणि जर तसाच गुंड असतोना तर जवळ जवळ गेले 3 तास तुम्ही आणि मी एकटेच आहोत इथे खुप काही करू शकत होतो तुमच्यासोबत…कोणी यायचा तर प्रश्नच नव्हता इतक्या पावसात…(नूतनला तो प्रथम भेटला तेव्हाच आवडला होता आणि आता ती लाजेने लाल लाल झाली होती..मान खाली घालून उभी होती..हातातल्या फ़ोन सोबत उगाचच काहीतरी चाळा करत होती…त्यातून अविनाशला समजल…अरे आग तो दोनों बाजु बराबर लगी है…)
अविनाश: बोलना काहितरी I Really love you sooo much dear!! I cant stay without you…please say yes …please…तो तसाच त्याच्या गुडघ्यांवर बसला ..तिचा हात हातात घेतला…त्या हातांवर एक अलगद चुंबन घेतले..आणि बोलला…मला समजले आहे तुला पण मी आवडतो होना…बघ नियतिला पण हेच हवय म्हणून तर असा संयोग आज जुळून आलाय…काहीतरी बोलना तू पण …किती छान लाजतियेस…हाय में मरजावा…आणि खाली पडला छातीवर दोन्ही हात ठेऊन…आता नूतनला हसु आवरले नाही …ती जोरजोरात हसु लागली आणि बोलली
नूतन : काय हे ?किती हा नाटकीपना?  काय म्हणाव तुम्हाला?
अविनाश : अब तो तुम कुछ भी कहो जानम..हम तो तेरे आशिक़ है
तिने त्याला हात देऊन उठवल..हात हातात घेताना अविनाश बोलला:ये हात मुझे देदे जालीम …हमेशा हमेशा के लिये देदे… उठता उठता त्याने तिलाच जवळ ओढुन मिठीत घेतले.. उगाच खोटा प्रयत्न करून तिने त्याची मीठी सोडवली आणि स्वतःच्या ऑफस मध्ये पळून गेली. तिच्या पाठोपाठ तोही गेला…मधेच तिच्यामध्ये आर्ची घुसली सैराटची..
नूतन : ए काय बाघतोस र? आत का आलास ? अवीनाश confuse…तो डोळे मोठे करुण तिच्याकडे बघत होता वेड्यासारखा …आणि मग एकदम जोरात बोलला धन्य आहात तुम्ही मॅडम हे पण गुण आहेत तर तुमच्यामध्ये??
नूतन : साहेब ये तो अभी शुरुवात है …अभी तो बहुत कुछ जानना बाकी है…
पाऊस आजुनपन पडतच होता..नूतन ने अविनाशला विचारल,”12 वाजलेकी आता अजुन पाऊस थांबला नाही..त्यामुळे रस्ते पण मोकळे नाही झाले…तुम्ही कांही खाल्लत की नाही? मी मघाशिच् जेवले होते..तुम्हाला भूक लागली असेल ना?
अविनाश : तुझ्या नादात मला खरच ग आठवणच नाही.. की मी अजुन जेवलो नाही.... हा 6 वाजता 2 समोसे खाल्ले होते एका क्लाइंट सोबत त्यामुळे कदाचित भूक जाणवली नाही…पण आता तू आठवण करुण दिलीस आता मला भूक लागली…काय करू आता मी ??....तुलाच खाऊ का??
नूतन : कस रे तुला प्रत्येक गोष्टीचा विनोद करता येतो??...थांब तू मी बघते फ्रिज मधे काही आहे का??
तिने फ्रिज मधे पहिल तर अर्धा लीटर दुधाची पिशवी …फ्रूट्स …आणि आज क्लाइंट्स येणार होते त्यांच्यासाठी मगवलेले बर्गर तिला दिसले…अचानक 6 वाजता क्लाइंट्चा कॉल आला होता.. की काही कारणांमुळे आज मीटिंग ला नाही येऊ शकणार…मस्तच ना तिने एक स्वतासाठी अणि 2 त्याला बर्गर घेतले एका प्लेट मध्ये …दोन कपमध्ये दूध काढल आणि मस्त पैकी माइक्रोवेव मध्ये कॉफ़ी बनवली बर्गर गरम केले ….दोघेजण समोरासमोर बसले होते तिच्या केबिन मधे…इतका वेळ खुप बड़बड़ करणारा अविनाश खाण्यात मग्न होता…आणि नूतन त्याच्याकडे डोळे भरून पहात बसली होती…तिच्या मनात आल एकूण सर्व घटना बघता खरच का हेच माझ्या नशिबात आहे?? मी याला संकेत समजून खरच अविनाश च्या प्रेमात स्वतःला झोकून देऊ काय?? तो मित्र म्हणून मला छान वाटला…पण माझा जीवनसाथी म्हणून तो खरच योग्य असेल का?तस त्यात न आवडण्यासारख काहीच नव्हतं…खुप स्मार्ट होता तो दिसायला…गोरागोरापान,  कर्ली केस ,डोळे नीळे हिरवे,  तालमित कमावलेल शरीर…  शिवाय पार्टीपण आपल्या तोलामोलाची त्यामुळे घरचे पण राजी होतील.
दोघांच् खाऊन होईपर्यंत पाऊस ही थांबला होता…अविनाश तिला बोलला मी सोडतो तुला घरी..तूझी गाडी नको घेउस राहुदेत इथेच…पण नूतनला ते योग्य वाटल नाही..कोणी पाहिल इतक्या रात्री दोघांना तर नसत्या गप्पा …नकोच…ती तिच्याच गाडीत निघाली.. पाठोपाठ अविनाश त्याच्या गाडीतून…नूतन घरात पोहोचेपर्यंत तो तिथेच थांबला …आणि मग तो त्याच्या मार्गाला लागला…
नुतनला आज झोप लागण अशक्यच दिसत होत….
खरच आज नियतिनेच भेट घडवली होती काय त्यांची?? पण मग पुढे अस का घडल?खरच खुपच विचित्र असते ही नियती
ती रात्र दोघांना ही झोप लागली नाही ..सकाळी नूतन खूपच खुश होती तिच्यामधील बदल तिच्या आईलाही जाणवत होता..अस म्हणतात प्रेमात पडला की माणूस खूप सुंदर दिसतो..तशीच ती पण खूपच सुंदर दिसू लागली होती..तिला अस झालं होतं की कधी मी ऑफिस ला जाते आणि अविनाशला बघते..तिने भराभर सगळ आवरलं नास्ता केला आणि आज चक्क राजुल आणि संजूला न भेटताच गेली…कस वेड असत ना हे प्रेम माणसाला पार बदलून टाकत बघा…..
नूतन ऑफिस मध्ये आली सगळे तिच्याकडेच पहात होते ..तिला समजत नव्हतं काय झालंय अस सगळे माझ्याकडे का बघत आहेत..ती केबिन मध्ये गेली तर एक अनोळखी माणूस येऊन बसला होता ..त्याने एक मोबाईल तिच्या हातात दिला आणि तुम्ही या फोटोतल्या माणसाला ओळखता का विचारलं…तिने पाहिलं तर ते तिचे पप्पा होते…
नूतन : हो ओळखते की वडील आहेत हे माझे ..काहो तुमचं काही काम आहे का? ते दिल्लीला गेलेत काही कामासाठी ..मला सांगा तुमचं काय काम आहे ते.
.व्यक्ती : अहो ताई ऐकातर माझं ..खूप वाईट झालाय काल..हा माणूस मला जख्मि अवस्थेत माझ्या रानात सापडला काल.त्याला खूप लोक मिळून मारत होते .करण काही समजलं नाही मला ..अर्धमेल्या अवस्थेत तिथेच सोडून ते गेले …मी त्यांच्या जवळ गेलो तेव्हा त्यांनी हा मोबाईल माझ्या हातात दिला आणि मला तुटक तुटक हा पत्ता सांगितला..खूप रडत होते ..आणि म्हणाले माझी नूतन धोक्यात ..वाचवा..हा मोबाईल दाखवा तिला..आणि एक मोठं नोटांचा बुंदले माझ्या हातात ठेवलं त्यांनी हेबघा…अस बोलून ते पैसे त्यांनी तिच्या हातात ठेवले…
नूतन : ते पैसे तुम्हालाच ठेवा …तुम्हालाच दिलेत ते त्यांनी..पण पप्पा आता कुठे आहेत? तुम्ही त्यांना कोणत्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलंय?चला आपण जाऊ तिथे..आता बरे आहेत का ते?
व्यक्ती : नाही ताईसाहेब मी त्यांना नाही वाचवू शकलो .सिटी हॉस्पिटल मध्ये नेलं मी त्यांना पण ते नाही वाचले..त्याची बॉडी हॉस्पिटलमध्ये आहे ..चला ताई ते तुम्हाला ओळख पटवून मगच हातात देतील…हा फोन तेवढा तुमच्या ताब्यात घ्या…आणि चला लगेच…तिने तो फोन घेतला आणि स्वतःच्या टेबलच्या ड्रॉवर मध्ये ठेवला..तिला काही समजतच नव्हतं तिने तो फोन आल्यावर बघू आधी मला बाबांना बघायचंय
नेहमीप्रमाणे अविनाश त्याच्या ऑफिस माध्ये जात होता ..जाता जाता नूतन ला शोधत होता ..पण आजच वातावरण काही त्याला नेहमीप्रमाणे दिसलं नाही..तो ऑफिस मध्ये आला तर नूतन कोणा इसमासोबत बोलत होती आणि रडत होती..अस वाटत होतं कोणत्याही क्षणाला ती खाली कोसळेल..आतामात्र त्याला तिला जाऊन भेटणं खूप म्हत्वाच वाटल..तो डायरेक्ट तिच्या केबिन मध्ये जाऊ लागला ऑफिस बॉय ने अडवलं त्याला ......इतक्यात नूतनच लक्ष बाहेर गेलं तिने त्याला हातानेच आत ये अस खुनवल …आता खरतर तिला एका भक्कम आधाराची गरज होती ..आणि तो आधार तिला अविनाशच दिसत होता…
कालच इतकी खुश असणारी नूतन आणि आज …खरच कसली असते हो ही नियती..एक जवळच माणूस भेटलं की दुसर आपलं ओढून न्यायचं ..कसला रे हा न्याय तुझा देवा…
अविनाश केबिन माधे गेला त्याने नूतनला आधी चेअर मध्ये बसवलं, पाणी दिल , आणि आता मला शांतपणे सांग काय झालंय ?हे सद्गृहस्थ कोण आहेत?तू यांच्यासमोर इतकी हतबल होऊन का राडतीयेस? काय झालंय तुला ? तुला मी अस कधीच नाही पाहिलंय आणि बघायचं पण नाहीये…,
व्यक्ती : साहेब आपण यांचे कोण?
अविनाश : का? त्याशिवाय मला समजणार नाही का काय झालंय ते?
व्यक्ती : तस नाही हो साहेब,  ताईसाहेबांना सांभाळायला हवं …त्यांच्या वडिलांनीपण शेवटच्या क्षणी हेच सांगितलं की धोका आहे यांना…तुम्ही कोण आहात त्यासाठीच विचारल..
अविनाश : जवळ जवळ ओरडलाच …काय?? विश्वासराव गेले???असे कसे ???तुम्ही कोण??तुम्हाला काय माहीत??कुठे झालं सगळं???हे बोलत बोलता त्याने नूतनचा हात हातात घेतला ती त्याच्या कुशीत शिरून रडू लागली..
त्या व्यक्तीने तो सर्व प्रसंग अविनाशला सांगितला
अविनाश : चल आपण जाऊ या हॉस्पिटलमध्ये ..नूतन आपण शोधू नक्की काय झालंय ते..घाबरू नकोस ग मी सदैव तुझ्या सोबत आहे..तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही मी..चल उठ ..संभाळ ग राणी स्वतःला …
बाहेर सगळा स्टाफ अचंबित झाला होता सगळा प्रकार पाहून. सगळे धक्के आजच एकावर एक मिळणार आहेत की काय आपल्याला…साहेब गेले ..आणि त्यांच्या दुष्मणासोबत त्यांची मुलगी??हे कधी आणि कस?? काय होणार आहे देवच जाणे
अविनाशने तिला खांद्याला पकडून गाडीत बसवलं मागे त्या व्यक्ती बसल्या आणि ते सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचले..तिथे ओळखपत्र दाखवणं वैगरे सगळे सोपस्कार त्यानेच पूर्ण केले …मग त्यांना शवागारात नेण्यात आले..त्यांनी ड्रॉवर मधून विश्वासरावांचे शव बाहेर काढले आणि हेच का तुमचे वडील ?नूतन त्यांना पाहून तिथेच बेशुद्ध झाली ..अविनाश ने तिच्या वतीने ओळख पटवून दिली आणि शव ताब्यात घेतले
डॉक्टर नूतनला तपासत होते तेव्हा अविनाश विश्वासरावांचे शव अँबुलन्स मध्ये ठेऊन आला …त्याने डॉक्टरांना विचारले ,”काशी आहे आता ही? मी नेऊ शकतो ना सोबत तिला?”
डॉक्टर : हो पण त्या कोणत्यातरी धक्क्यामध्ये दिसतायेत ..ब्लड प्रेशर खूपच जास्त आहे त्यांचं ..सो प्ली take care,
अविनाश : हो ..तिचे वडील अचानकच गेले त्यांचीच बॉडी घेण्यासाठी आम्ही आलो होतो ..त्यांना पाहिल्याबरोबर ही बेशुद्ध पडली…
डॉक्टर : ohh , त्यांना मेडिसिन्स दया पण वेळेवर ..काळजी घ्या पण त्यांची.. बाय द वे आपण यांचे कोण??
क्षणाचाही विलंब न करता अविनाश बोलला हिचा भावी पती…
डॉक्टर : ओके ओके ...गुड..काळजी घ्या
अविनाश : येस..thanks  डॉक्टर …
थोड्यावेळात नूतनला शुद्ध आली अविनाश तिची शिद्धीवर येण्याची वाटच पाहत होता
अविनाश :  आता कस वाटत आहे तुला ? तू चालू शकतेस ना?  आणि हो तुझ्या घरी कोणी कळवलं का ?आपण कळवायला हवं ना??बाबांना अँबुलन्स मध्ये ठेवलंय चल आपल्याला निघायला हवं ..तू कॉल कर घरी .. किंवा तू कॉल कर मी सांगतो…
नूतन :  हो ठीक आहे मी…हो मी लावते कॉल तूच सांग मी नाही सांगू शकत …
तिने कॉल लावला कॉल वर संजू होता तो नेहमीप्रमाणे बोल ना ताई आज आम्हाला न भेटताच गेलास ना तू ?? विसरलीस ना आम्हाला ?? हम्म म्हणूनच कॉल केलास न ? ते ऐकून नूतनला जास्तच रडू येऊ लागले तिने फोन अविनाशला दिला
अविनाश : हॅलो कोण बोलताय?
संजू : ताईच्या फोन वर हा दुसऱ्याच कोणाचा आवाज ऐकून तो जरा गडबडला …कोण तुम्ही ते आधी सांगा ? हा आमच्या ताईचा फोन आहे . तुमच्याकडे कसा?
 अविनाश : तिची तब्येत ठीक नाहीये म्हणून मी बोलतोय आपण कोण?
संजू : का? काय झालाय ताईला ? कुठे ती?
अविनाश : अच्छा तुम्ही तिचे छोटे भाऊ न ? तुमच्या आईला दे बर फोन बाळ काही महत्वाचं बोलायचं आहे
संजू : मला सांगा मी तिला सांगतो..,
आविनाश : प्लीज बोलावं बाळ आईला कॉल वर..नंतर तुला पण सांगतो
संजू : बर ठीक आहे बोलावतो ..आई  ए आई कोणाचातरी महत्वाचा फोन आहे ग लवकर ये
आई : कोणे ? बर आले थांब.. फोनवर ..हम्म कोण बोलताय आपण ?काय काम होत?
अविनाश : मॅडम मी जे सांगतोय त्यासाठी प्लीज तुमच्या मनाची तयारी करा ..खबर चांगली नाहीये..आणि आत्ता तुमच्या जवळ तुम्हाला सांभाळायला कोणीच नाहीये ..तुम्हाला सांभाळणारी व्यक्ती आता या जगात नाहीये मॅडम..
आई : काहीपण पण काय बोलताय ?? कोण बोलताय तुम्ही? काय झालंय कोणाला?कोणा बद्दल बोलताय तुम्ही??
अविनाश : मी अविनाश बोलतोय तुमचा होणारा जावई…तुमच्या ऑफिस समोरच माझं ऑफिस आहे..आम्ही आत्ता हॉस्पिटलमध्ये आहोत death बॉडी घेऊन येत आहोत ..कोणा कोणाला काळवायच आहे ते मला सांगा किंवा तुम्ही कळवा …आम्ही अर्ध्या तासात पोहीचतोच..
हे ऐकून मेघना म्हणजे नूतनची आई मटकन खालीच बसली… संजू धावतच आईजवळ आला जोरजोरात तिला हलवून विचारू लागला आई ..ए आई काय झालं तुला??आई अग बोलना…
ती काहीच बोलत नाही बघून काहीतरी वाईट बातमी आहे नक्की हे संजुला समजलं त्याने धावत जाऊन पाणी आणलं आणि मेघनाला पाजलं तिच्या तोंडावर पण पाणी शिंपडले…
संजू : आई थांब मी डॉक्टरांना बोलावतो…तुला काय होतंय ग आई ?
मेघना : नाही नको बोलाऊस डॉक्टरांना बाळा …आता कोणीच आपली काहीच मदत नाही करू शकत …आपल्यालाच सावरायला हवं
संजू : त्याला काहीच समजत नव्हतं आई काय बोलतीये..तो फक्त वेड्यासारखा तिच्याकडे बघत बसला..
मेघना मनाची तयारी करून उठली.. तिने नातलगांना फोन केले आणि बोलवून घेतलं  इकडे नूतनने
अविनाशला मिठीच मारली आणि बोलली thank you so much dear ..आज तू नसतास तर मी काय केलं असत
अविनाश : थँक्स बोलून मला परकं करू नकोस ग …मी तुझाच आहे ..आणि कायम तुझ्या जवळच राहीन ..चल आता आपल्याला निघायला हवं..आणि दोघे निघाले...
दोघेजण अँबुलन्स पाठोपाठ घरी गेले..
विश्वासरावांचं  समाजकार्य , सामाजिक ओळखी इतक्या जास्त होत्या की अँबुलन्स येईपर्यंत त्यांच्या बंगल्यासमोर लोकांचा समुद्रच पसरला होता ..त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी ते खूप अस्वस्थ झाले होते…त्यांच्या देवाचं दर्शन आता त्यांना परत कधीच होणार नव्हतं..प्रत्येकाच्या तोंडावर एकच प्रश्नचिन्ह होत कोण असेल तो राक्षस ज्याने आपल्या देवाला मारलं??? आजपर्यंत कधी कोणालाच न दुखवणारा हा सगळयांनाचा लाडका जीव …कोणाला खुपला डोळ्यात ??अस बेदारपणे जीव घेतला त्यांचा?
अँबुलन्स घराजवल आल्याबरोबर प्रेस वाले , पोलीस, आणि तो समुद्रा सारखा जनसमुदाय त्यांच्या स्वागतासाठी हजर होता…नाही स्वागत कसलं …त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी …
इतक्या लोकांमध्ये सुध्दा आज नुतनला एकट एकट वाटत होतं..सगळं जग खोट फक्त आणि फक्त माझा अविनाशच माझा आहे असाच तिच्या मनात विचार चालू होता…त्यामुळेच सगळ्यांच्यासमोर कोणाचाही विचार न करता ती अविनाशच्या हातात हात देऊन त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन रडत रडत निघाली होती…कारण आता तिचा फक्त तोच होता…
थोड्याच वेळात पोलीस बंदोबस्तात सगळ्या जनतेने दर्शन घेतले ..अस वाटत होतं कोणीतरी मोठा नेताच गेलाय की काय? प्रत्येकजण त्यांचं गुणगान गात होता …त्यानी आपली कशी मदत केली होती हे रडून रडून बोलत होते …का गेलात सोडून आम्हाला …या परत साहेब …
थोड्याच वेळात मेघना पण खूप जोरात रडू लागली. इतकावेळ तिने स्वतःला सावरलं होत पण तो बांध आता फुटला होता…ती बोलली,”साहेब तुम्ही होतात म्हणून मी होते…एका गरीबाची मुलगी इतक्या मोठ्या घरी आणली तुम्ही..मला कधीच त्याची जाणीव सुद्धा करून नाही दिली तुम्ही..नवीन नवीन मला अचानक सगळी सुख समोर दिसल्याने खूप मजोरडी झाले होते मी नको नको ते बोलत होते आपल्या नोकरांना ..तरीपण तुम्ही एक शब्दाने बोलला नाहीत मला .उलट त्या नोकरांनाच समजून सांगायचात. आणि हो आज काबुल करते सगळ्यांच्यासमोर मला नूतन नको होती घरात ..टोचायची ती मला..सतत आमच्या मधे मधे..खूप त्रास दिला मी तिला. पण ती तुमचीच मुलगी ना आजपर्यंत तिने कोणालाच माझ्याबद्दल वाईट सांगितलं नाही ना मला कधी वाईट बोलली.. आता तीच माझं सर्वस्व.. अचानक स्वतःला जोर जोरात थोबाडीत मारत ती चक्क नूतनच्या पायावर पडली ..पोरी माफ कर ग मला खुप वाईट वागले तुझ्याशी ..आता इथून पुढे मी कोणाकडे बघणार ग ?तूच ग आता माझी ,सगळकाही मला अंतर देऊ नकोस पोरी ..तुझी भावंड बघ ग पोरी आज पोरकी झाली..
नूतन आधीच पूर्णपणे बधिर झाली होती..जे घडलंय ते समजून घेणं तिला जड झालं होतं…आणि त्यात आज अचानक आईच हे असं वागणं …ती पटकन खाली वाकली आईला जवळ घेतलं …आग आई मी का तुला अंतर देऊ ??आजपर्यंत कधीच तुला मी वाईट म्हटलं नाही ग.तू जे केलंस ते कदाचित चुकीच होत पण मी ते कधी मनावर नाही घेतलं ग…उठ बर असा वेडेपणा नको करुस बघ तुला अस बघून संजू आणि राजुल किती घाबरलेत..या बाळांनो इकडे …दोघे पळत पळत तिच्याजवळ आले राजुल ने तर घट्ट मिठीच मारली नुतनला…
अंत्यसंस्कारासाठी शवाची मिरवणूक काढण्यात आली..नूतन ओढणीने वडिलांना वार घालत होती आणि कस काय झालं समजायच्या आतच नूतनच्या मागचा खांब पडला ..अविनाश तिच्याजवळच होता तो घाबरला त्याने खांबाजावळ जाऊन पाहिले तर त्यात एक बंदुकीची गोळी अडकलेली होती आणि त्यातून धूर निघत होता …
अविनाश : अरे इथे नूतनवर नक्कीच हल्ला झालाय आणि त्या शूटर चा नेम चुकला आहे कदाचित..या बंदूकीला साईलेन्सर असणार नक्कीच म्हणूनच आवाज आला नाही ..त्याने पोलिसांना तिची security वाढवायला सांगितली..
त्यानंतर विश्वासरावांवर रीतसर अंत्यसंस्कार झाले..नूतन घरी आली आणि सरळ तिच्या बेडरूम मध्ये गेली..अविनाशला तिने बळेच घरी पाठवलं तो बिचारा सकाळपासून तिच्या मागे मागे फिरत होता.तिची मदत करत होता काळजी घेत होता..
दमला तर असणारच ना तो..मग आराम तर हवाच ना??
तिने आंघोळ केली ..देवाला नमस्कार केला. नोकरांना स्वयंपाक बनवायला सांगितलं नोकर बोलले ताई आज कडू घास खायला हवा पण तो पण नाही खावंसं वाटत ..आमचे राजे गेले हो..खूप केलं त्यांनी आमच्यासाठी..
नूतन : अहो माझे वडिल होते ते .तुम्हाला इतकं दुःख होत आहे मला किती होत असेल पण तुमची मूल आहेत लहान त्यांना का उपाशी ठेवताय??संजू राजुल आहेत त्यांना पण भूक लागली असेल..जा बनवा तुम्ही स्वयंपाक…आणि जेऊन घ्या
पुन्हा आपल्या बेडरूम ला लॉक करून ती रडत बसली. तिला आज Ac नको वाटत होता अस वाटत होतं मोकळ्या हवेत माझे पप्पा मला त्यांचे आशीर्वाद देतील ..माझ्या कानात काहीतरी बोलतील जे त्यांना मला कधीच सांगता आलं नव्हतं..याच विचारात ती खिडकीमध्ये बसली होती आणि खरच खूप छान हवेची झुळूक ये जा करत होती ..जणूकाही तिचे पप्पाच तिला गोंजारत होते..
आणि अचानक तिला कसलीतरी चाहूल लागली..कोणीतरी तिला बघत आहे ..अस तिला वाटलं हो बागेत कोणीतरी लपून बसलं आहे ..तिने security ला कॉल केला आणि गार्डन चेक करायला सांगितलं ..पण नाही काहीच नव्हात तिथे..तिला वाटलं हा आपला भास असावा..आणि ती जाऊन बेडवर पडली..
10 मिनिटांसाठी तिचा डोळा लागला …तिला जाग आली ..आणि बघते तर काय समोर तो उभा……..
नुतनला सर्व लाईट बंद करून झोपायची सवय होती त्यामुळे इतक्या अंधारात कोण उभं आहे हे तिला समजतच नव्हतं ..ती डोळे बारीक करून करून बघायचा प्रयत्न करत होती कोण आहे ते ? पण छे हो काही अंदाजच येत नव्हता तिला…मग तीच डोकं चाललं तिने पटकन मोबाईलचा टॉर्च चालू केला ….आणि तिला तो चेहरा दिसला …कस शक्य आहे हे ? नाही नाही impossible ते कसे काय? आणि तिला एकदम चक्कर येऊन ती बेडवरच पडली आणि तशीच झोपून गेली..तिने त्याला बघताच क्षणार्धात तो गायब झाला..
सकाळी नूतन उठली ती आजूनपन समजू शकली नाही रात्री जे घडलं ते स्वप्न होत की सत्य ..काय होत ते सगळं? मेघना पण आज तिच्यासोबत नाश्त्यासाठी बसली होती. संजू आणि राजुल आजून झोपले होते मेघना : नूतन तू मला माफ केलंस ना ग?
नूतन : आई!! अग सारख सारख अस बोलून मला का लाजवतेस तू !! मी मुलगी आहे तुझी ..माझी आई जरी असती तरी तीनेपन मला मारलं असत कधी ओरडली असती …तू आजपर्यंत मला कधी मारलं तर नाहीस ना ??आग मग तू का माफी मागतीयेस ?? अग आत्ताचा प्रसंग खूप बिकट आहे आणि पप्पांना खरच कोणी मारलं आहे ?नक्की काय घडलं आहे ते आपल्याला मिळूनच शोधावं लागणार आहे ..मला तुझीही खूप मदत लागणार आहे .जे आपल्यात झालं गेलं घडून गेलं …सोडून दे ते सगळं …मला तुझी साथ हवीय ग आई ..देशील ना? दोघींचेपन डोळे पाण्याने भरून आले होते . मेघनाने उठून नुतनला आपल्या मायेच्या कुशीत घेतलं आणि दोघी मायलेकी अशाच कितीतरी वेळ रडत राहिल्या एकमेकींचे डोळे पुसले … .त्यांना अस बोलताना पाहून जवळ असणाऱ्या नोकरांचे पण डोळे भरून आले ..भीमा त्यांचा सगळ्यात जुना नोकर तो तर हातातला पंचा तोंडात कोंबून रडत होता …पुरुषांनी रडू नये अस म्हणतात ना मग आपण रडत आहो हे कोणाला कळू नये आवाज बाहेर येऊ नये म्हणून…
स्वतःच रडू आवरत भीमा पुढे आला आणि बोलला ,”आज साहेब असते न्हवं तर त्यांना आकाश बी ठेंगण झालं असत , तुम्हा दोघींना एक करण्यासाठी लई झटल साहेब ..पर आज जव्हा त्ये न्हाईत तवा तुमि जवळ आल्यात..परमेश्वराची मार्जी ..त्याच्या म्होर कोणाचं बी काय चालत नाय… माय लेकिना आता भूक लागलीय का न्हाय ?? तायसाब , मालकीन बाय घ्या आता वाईचं खाऊन ..काल धरून तुमी काय बी खाल्लं नाय.. आणि त्याने प्लेट मध्ये पोहे दिले…दोघी तोंड धुवून आल्या आणि नाश्त्याला बसल्या इतक्यात संजू आणि राजुल आले अंघोळ करून …समोरच दृश्य पाहून दोघे चकितच पडले ..आई आणि ताई एकत्र नाश्त्याला??!!!
संजू तसा बऱ्यापैकी मोठा होता ..तो आता 11 वीला होता त्यामुळे त्याला काल जे काही घडलं ते समजत होत..आपले पाप्पा आता आपल्याला सोडून गेलेत आणि परत कधीही भेटणार नाहीत हे त्याला समजलं होत …आई आणि ताईमध्ये नेहमी बाबांना मध्यस्थी करावी लागे तेव्हा कुठे सर्व काही ठीक होत ..”आता या दोघींना अस एक झालेलं पाहून त्याच्या जीवात जीव आला …त्याच्यापण डोक्यात हाच विचार होता कोणी मारलं असेल पप्पांना?का?
राजुल आणि संजू आनंदाने येऊन टेबलवर बसले भीमा काका नाष्टा दे आम्हाला अस बोलून छोट्या राजुलने ओरडायला सुरुवात केली ..ती आत्ता कुठे 4थी मध्ये होती तिला प्रसंग काही समजला नव्हता ती आपली तिच्याच तालात..खरतर राजुल म्हणजे अपेक्षा नसताना अचानक झालेलं अपत्य ..एक मुलगी तर होतीच आणि संजुचा जन्म झाला आणि घरात आनंदी आनंद झाला …विश्वासरावांना खूपच आनंद झाला की मला आता एक मुलगा एक मुलगी …बास अजून काय हवंय …पण मेघनाला काही हे पटत नव्हतं तिला स्वतःची पण मुलगी हवी होती…कारण साहेबांना मुलीची भारी आवड ना..खरतर तिला ऑप रेशनच करून टाक अस बोलले होते विश्वासराव पण मेघना बोलली नको हो जरा संजू 5 वर्षाचा तरी होऊद्या मग करेन … विश्वासराव तिच्या पुढे जास्त काही बोलत नसत…3 वर्ष तिने पूर्णपणे काळजी घेतली की मूल होऊ नये..कारण तिची मेडिकल कंडिशन पाहून डॉक्टरांनीच सांगितलं होतं किमान 3 वर्ष तरी दुसर मूल नको तुमच्या जीवाला धोका आहे..
त्यानंतर मात्र तिला स्वतःच्या मुलीची ओढ लागली तिने प्रयत्न चालू केले गर्भ राहिला ..तिने तपासले तर तो मुलगा होता…आजारी आहे म्हणून ऍडमिट होते असे सांगून ती गर्भपात करून आली ..तिचे हे चाललेले गलिच्छ प्रकार विश्वासरावनाच काय कोणालाच माहीत नव्हतं ..शेवटी तिला मुलगी आहे समजलं आणि असा अत्यंत आश्चर्य जनक धक्का देत राजुल चा जन्म झाला ..त्यामुळे ती सगळ्यांची खूपच लाडकी..
 सगळ्यांचा नाष्टा झाला आणि अविनाश आला ..नूतन ने विचारलं काही समजलं का सकाळी सकाळीच आलास..
अविनाश : अग सवडायला जायचंय ना म्हणून आलो ..चल निघुयाका?
नूतनने तर त्याला ये किंवा के अस काहीच सांगितलं नव्हतं तरी तो स्वतः हुन आला हे पाहून तिने विचार केला माझी पारख योग्यच आहे ..हो खरच हा माझ्यासाठी योग्य आहे..सगळ्यांनी आवरलं ..लागणार समान घेऊन ते सगळे निघाले अविनाश सोबत नूतन आणि वेगळ्या गाडीत भीमा , संजू, मेघना ..राजुल ला लहान असल्यामुळे नाही नेले सोबत…
सवडण्याचा विधी झाला आणि लगेचच अस्थी विसर्जन करण्याचा निर्णय झाला त्याप्रमाणे आता कधी आणि कोणी कोणी जायचे हे ठरवत होते ..मेघना बोलली अविनाश तू आणि नूतनच जाऊन या सोबत संजुला न्या मुलगा लागतो ना विधींसाठी?? मी राजुल सोबत थांबते घरी.हा निर्णय सगळ्यांनाच पटला.त्याप्रमाणे आजच रात्री निघायचे ठरले नूतनच्या गाडीमधूनच ते निघाले रामुकाका होतेच ड्राईव करायला ..संजू रामू काकांच्या बाजूला बसला आणि मागे अविनाश आणि नूतन..आळंदीला पोहोचायला सकाळ होणार होती ..कोणीच गाडीत काहीच बोलत नव्हते .गडू संजू सुद्धा शांत बसला होता ..अविनाशने या शांततेचा भंग केला ..रामुकाका मला भूक लागलीये आपण जेवायला थांबुया कुठेतरी..जवळ हॉटेल आलं चांगलं की थांबवा प्लीज..संजूपण बोलला होणं मलापण भूक लागलीये ..थांबुयना ताई जेवायला??
नूतन : अरे हो सॉरी रे माझ्या विचारांमध्ये मी हे विसरूनच गेले की तुम्हाला भूक लागली असेल..हो रामू काका थांबवा गाडी एखाद्या चांगल्या हॉटेल जवळ तुम्ही पण जेऊन घ्या आमच्याबरोबर..
रामू : नाही व ताईसाहेब मी नाही आपण तिथं गेल्यावर खाईन मी तुमच्या सोबत नको
नूतन : काका का असा करताय प्लीज जेवा तुम्ही पण..
हायवेवर एक चांगला हॉटेल बघून काकांनी गाडी थांबवली सगळे फ्रेश झाले आणि जेवले..तिथेच वॉशरूम ला जाताना  नुतनला तिच्या पाठोपाठ कोणी येतंय अस जाणवलं . तिने मागे पाहिलं तर कोणीच नाही ..आणि समोर पाहिलं तर पुन्हा समोर ते उभे..तिने जिवाच्या आकांताने जोरात अविनाशला आवाज दिला आणि त्या दिशेकडे बोट दाखवून ओरडली ते आले होते ..पण कास शक्य आहे ?  नाही .. आणि ती पुन्हा बेशुद्ध पडली . अविनाशने तिला सांभाळून गाडीमध्ये नेले..खूपाच घाबरली होती ती ..अविनाशला हेच कळत नव्हतं कोण दिसलं हिला..
रामुकाकांनी गाडी पुन्हा आळंदीकडे मार्गस्थ केली ..
पहाटे पहाटे गाडी आळंदीला पोहोचली . एका चांगल्या हॉटेलमध्ये चेक इन केलं .फ्रेश होऊन सगळ्यांचा नास्ता झाला आणि मग अस्थीविसर्जन करण्यात आले ..हा सगळा विधी होत असताना नूतन सारख एकच बोलत होती ..कोण होत ते काल ?नक्की कोण ? की मला आता भास व्हायला लागलेत ?वेडी झालीये का मी ..काय आणि का घडतंय हे सगळं??
इतक्यात अविनाशने तिच्या खांद्यावर हात ठेवला ..ती दचकली…
अविनाश :  अग वेडे इतकी का घाबरलीस मीच आहे ग ..दुसरी कोणाची हिम्मत तरी आहे का तुझ्या खांद्यावर हात ठेवायची? एक बोलू का नूतन तुला ?
नूतन : हो बोल
अविनाश : तुला हे असं नाही पाहू शकत मी …प्लीज marry me …आजच लग्न करू आपण इथेच आळंदीमध्ये ..मला माहित आहे तू खूप टेन्शन मध्ये आहेस ..आणि हे पण माहीत आहे आत्ता या क्षणाला तुला तुझ्या जवळच्या आपल्या माणसाची खूप गरज आहे…प्लीज एकचान्स दे डिअर मला ..i will never disappoint you.. please trust me…I love you …
 नूतन अगदी स्तब्ध उभी होती .याला काय उत्तर द्यावे हेच तिला समजत नव्हतं ..ती आत्ता तरी नक्कीच लग्नासाठी तयार नव्हती..तिचं सध्या तरी एकच ध्येय होत आणि ते म्हणजे पप्पांना कोणी मारलं…आणि आपल्या ला होणाऱ्या भासांचा अर्थ काय??
काहीच उत्तर नाही पाहून अविनाशला समजलं हीच चित्त काही थाऱ्यावर नाहीये त्याने तिला हलवलंनूतन काहीतरी विचारल मी तुला बोलणा..उत्तर दे मला ..तुझ्या पोसिटीव्ह उत्तराची वाट पाहतोय मी
नूतन :  अविनाश …अरे ..म मी काय बोलू ? आय लव यु टू पण मी आत्ता नाही लग्न करणार जोपर्यंत झालेल्या प्रकारचा उलगडा होत नाही मी लग्नाचाच काय इतर कशाचाच विचार सुद्धा करू शकत नाही..आत्ताच कुठे मला त्यांचं प्रेम कळायला लागलं होतं आणि असे अचानक सोडून गेले ते मला..मला तुझी आत्ता हे शोधण्यासाठी तुझी साथ हवीय नंतर आपण आहोतच की सोबत ..,

इतक्यात तिथे संजू आणि रामुकाका आले
संजू : रडत ताई आता पप्पा परत कधीच नाही येणार का ग?? ही पूजा करून आपण त्यांना वरती देवाकडे पाठवलं काय ग? ते भटजी काका बोलले या पुंजेने पप्पांच्या आत्म्याला शांती मिळेल ..खरच का ग ताई? आता अपल्याला जशी त्यांची आठवण येतीये त्यांना पण येत असेल का ग?
नूतन : हो बाळा ..चला आता आपल्याला निघायला हवं रामुकाका हॉटेलमधून चेक आऊट करून लगेच निघायचं की तुम्हाला थोडी विश्रांती हवी आहे ?रात्रभर गाडी चालवळीत तुम्ही म्हणून विचारते
रामुकाका : ताईसाहेब तुम्ही म्हणाल तस ..आत्ता तर आत्ता निघू
नूतन : तुम्ही करा आराम  काका जेऊन आपापल्या रूम वर जाऊन आराम करूया मग 5 पर्यंत निघुया..चालेल ना ? पण मग आजपण रात्रभर गाडी चालवावी लागेल की उद्या सकाळी निघुया ? तुमच्या वयाचा विचार करून मला असं वाटत
अविनाश  : नूतन गाडी मी पण चालवू शकतो मध्ये मधे जेवून निघुया आपण
नूतन : नाही मला कोणाच्या जीवाशी खेळायचं नाही चला रामुकाका हॉटेल वर आपण उद्या सकाळीच निघुया
सगळे आपआपल्या रूम मध्ये जाऊन फ्रेश झाले ..खालीच हॉटेलच्या डायनिंग हॉल मध्ये जेवण झाली आणि पुन्हा सगळे रूम मध्ये गेले.
संजू नूतनच्याच रूम मध्ये होता.त्याला खूप झोप येत होती तो आल्या आल्या झोपून गेला..
नूतन घडलेला एक एक प्रसंग आठवू लागली अगदी विश्वासराव दिल्ली ला निघण्या आधीपासून सर्व गोष्टींचा विचार करू लागली. त्यादिवशी दुपारी पप्पा आपल्याच केबिन मध्ये होते जेव्हा त्यांना एक कॉल आला. बोलत असतानाच बाबांना अचानक खूप घाम येत होता ..आणि ते मोजकेच बोलत होते.का??नाही नाही, नको , हो मी कारतोना, तिला नको मध्ये उगाच, हो हो मी येतो लगेच निघतो..trust मी हो खरच..आणि फोन झाल्यावर त्यांना खूप अस्वस्थ वाटत होतं ..माझ्याशी काहीही न बोलता ते त्यांच्या केबिन मध्ये गेले..मला काही समजत नव्हतं काय झालं मग मी पण मागोमाग गेले..बाबा घाम पुसत होते
खूपच टेन्शन आलं होतं त्यांना न राहवून नूतन ने विचारलं , “ पप्पा काय झालं? कोणाचा कॉल होता? तुम्ही इतके का अस्वस्थ झालाय? काही प्रॉब्लेम आहे का? मी डॉक्टर काकांना बोलावते थांबा
पप्पा : अग नाही नको पोरी..काही नाही मी ठीक आहे ..हे बघ मला निदान महिनाभर तरी दिल्लीला जावं लागेल एक महत्वाचा काम राहून गेलं बघ ..मला आजच निघायला हवं ..बेटा तोपर्यंत तू तुझी, घरची आणि ऑफिसची काळजी घे ..चल मी निघतो तुझ्या आईला सांगतो माझी बॅग भरायला आणि निघतो मी ..तू काहीही काळजी नको करू सगळं सगळं ठीक आहे बघ.. मी आहे ना मग काळजी नाही करायची बेटा ..चल निघतो हा मी..मग मेघनाला फोन केला अग मेघना माझी बॅग भर ग महिना भरासाठी..जावंच लागेल मला …मला वाटलं होत सगळं संपलं पण नाही ग आता जाऊन सगळं संपवतो मी तू लगेच बॅग भर ..

खरतर नुतनला तेव्हाच कळायला हवं होतं काय संपलं ?काय संपवायचं ? जर पप्पांना तेव्हाच मी जाऊ नसत दिल सगळं विचारलं असत तर आज पप्पा असते माझ्यासोबत
आणि यातूनच तिला एक clue मिळाला की आईला यातलं नक्कीच माहीत आहे ..येस आता घरी जाऊन आधी आईलाच विचारणार मी नक्की काय झालं होतं ते..हो आईच सांगू शकेल मला ..तिचची doorbell वाजली दरवाजा उघडला तर समोर अविनाश
अविनाश : डिस्टर्ब केलं का मी तुला ?
नूतन : छे रे अजिबात नाही..उलट तूच तुझी सगळी काम सोडून माझ्यासाठी इथे आला आहेस तूच खूप डिस्टर्ब झाला असणार माझ्या मुळे
अविनाश : नाही ग मुळीच नाही तस काहीही नाहीये ..पण तू मला आत नाही का येऊ देणार अस दरवाज्यातच बोलायचं का आपण??
नूतन :  ओहह सॉरी ,,आणि दरवाज्यातून बाजूला होत अरे येना..पण संजू झोपलाय आवाजाने उठेल कदाचित
अविनाश : तू पण झोपणार आहेस का?  झोप मग मी जातो नंतर बोलूया
नूतन : नाहिरे मी जागीच आहे .कसली झोप ..झोप उडलीये माझी..मला पण बोलायचं आहे तुझ्याशी आपण तुझ्या रूम मध्ये बोलूया का?
अविनाश : हो ते बर राहील…रूम लॉक करून नूतन आणि अविनाश त्याच्या  रूम मध्ये गेले..थोडावेळ तो तिच्या चेहऱ्याकडे एकटक बघत होता ..त्याच्या मनात आलं काय अवस्था झालीये हिची .कोण जबाबदार याला ?मी हिला भेटलो आणि …तो असा विचार करत असताना नूतनच त्याच्या चेहऱ्यावर लक्ष गेलं तो पाहत तर तिच्याकडे होता पण मनात काही औरच चालू होतं..
नूतन : अविनाश ..अरे कसला विचार करत आहेस तू..? काय झालं ? बोलना तुला काय बोलायचं होत ?
अविनाश : अग मी विचार करत होतो काय अवस्था झाली आहे तुझी ..किती सुखी होतीस तु ..मी तुझ्या आयुष्यात आलो आणि तुझी सगळी सुख दूर झाली
नूतनने पटकन त्याच्या ओठांवर तीच बोट ठेवल आणि बोलली शु.. गप्प बस अस काहीपण नको बोलुस उलट तू अगदी योग्य वेळी माझ्या आयुष्यात आला आहेस आत्ता मला खरच तुझी खूप गरज आहे रे
अविनाश : एकदम लाडीकपणे हो ..खरच का ग ? आणि त्याने एकदम तिला स्वतःच्या जवळ खेचून मिठीत घेतले..नूतन मी खूप प्रेम करतो ग तुझ्यावर ..मला तुला लवकर पहिल्यासारखा बघायचं आहे ..हो मान्य आहे तुझ्या वडिलांना मी परत नाही आणू शकत ..पण तुला हवी ती सगळी मदत करेन मी तुला ..फक्त मला अंतर देऊ नकोस ..तुझ्यापासून मला कधीही दूर लोटू नकोस ….त्याची ती मिठी तिला खूप हवी हवीशी वाटत होती ..त्यांच्यासोबतच तिने पण त्याला घट्ट मिठी मारली आणि बोलली नाहिरे माझ्या राजा मी तुला कधीही दूर नाहीं करणार माझ्यापासून तिने अस बोलताच अविनाशचा स्वतःवरचा ताबा गेला त्याने पटकन तिच्या ओठांवर ओठ ठेकले ..नूतनपण त्याला प्रतिसाद देऊ लागली..खरतर इतक्या टेन्शन मध्ये असे काही …पण हे क्षण नूतनला खूप सुखावणारे आणि हवे हवेसे वाटले ..कितीतरी वेळ दोघे असेच एकमेकांच्या मिठीत चुंबन घेत होते ..त्यांनापण समजलं नाही …अचानक doorbell वाजली…दारात संजू होता ..अग ताई तू इकडे कधी आलीस तु झोपली नाहीस का ग? चल ना आपण झोपुया ..मला एकदम जाग आली आणि तू बाजूला नाही ..घाबरलो ना मी …मग मला वाटलंच तू इथेच असणार ..चल ना ग …
दोघेपण एकमेकांकडे पाहत होते त्यांच्या चेहऱ्यावर नको तो विरह स्पष्ट दिसत होतं पण काय करणार नूतन तिच्या रूम मध्ये आली …ती खूप लाजत होती,  हसत होती , संजू : काय झालं ताई तू का हसतेस
नूतन : जीभ चावत ..म मी हसते नाहिरे काहीपण काय चल झोप मी पण झोपते. मग अविनाशचा विचार करता करता तिला पण झोप लागली..
रात्रीच्या जेवणासाठी अविनाश बोलवायला आला तर ही आजून झोपलीच होती.. बेल च्या आवाजाने ती उठली .दरवाज्यात अविनाश ..मॅडम आमची झोप उडवून स्वतः मस्त झोपा काढताय ..चला जेवायला
नूतन : लाजतच हम्म मी फ्रेश होऊन येते तू जा खाली रामुकाकांना पण सांग जेऊन घ्यायला..मला वाटत आहे आपण आजच रात्री निघुया ..तू बघना जरा रामुकाका आहेत का त्या कंडिशन मध्ये की गाडी चालवू शकतील.
अविनाश : स्वीटहार्ट उद्या सकाळी सकाळी नाश्ता करून लवकर निघुया आजची रात्र असुदेणा प्लीज
इतक्यात संजू पण उठला : ताई तू नाहीना झोपलीस आणि हे अंकल पण परत इथे का आले ते पण नाही झोपले ना
नूतन : हसत अरे वेड्या मी आताच तर उठले ..आणि अविनाश आपल्याला जेवायला बोलवायला आलाय चल आवरून घे बर
आणि सगळे जेवायला खाली पोहोचले
सगळे जेवायला बसले होते नूतन विचारात होती की आपण गेल्या गेल्याच आईला विचारुया पप्पा अस का बोलले होते? कोणाला भेटायला गेले होते ..निदान काहीतरी clue तरी भेटेल..
अविनाश मात्र वेगळ्याच मुड मध्ये होती …कस असत ना प्रेमाची ओढ काही वेगळीच असते ..मग कोणताही प्रसंग घडलेला असो आपलं प्रेम समोर असताना दुसर काही सूचन जर अवघडच असत .. नूतन विचारात असतानाच अविनाशने टेबलाखाली नुतनला पायाने धक्का दिला नूतन एकदम दचकलीना …. संजूने विचारले काय झालं ताई ..घाबरलीस तू?
नूतन : अरे नाहिरे काही नाही जेव तू आणि लाडक्या रागात डोळे मोठे करून अविनाशकडे पाहिलं…
अविनाश खाली मान घालून जेवायचं नाटक करत तिच्याकडे चोरटेपणाने पाहत होता..आणि नूतन लाजून लाजून कावरीबावरी झाली होती
जेवून सगळे रुम मध्ये निघाले ..अविनाशने गुपचूप नूतनचा हात हातात घेतला ..नूतन अशी काही लाजली ..आणि लगेच घाबरली अरे हात सोड पाहिलं ना कोणी
अविनाश : अग पाहिलं तर पाहिलं तुझ्या घरी तर मी केव्हाच सांगितलंय मी तुमचा होणारा जावई आहे ते..
नूतन : गपणारे अविनाश काय रे तू पण हा आता झोप गुड नाईट… स्वीट ड्रीम्स..
अविनाश : नाही तू ये मला झोपवायला मग मी झोपणार
नूतन : ए लाडात नको येऊस हा ..जा तू झोप बर …
अविनाश : अगबाई झोप यायला तर हवी ना? ती तर तू चोरलीस ..आणि आता स्वतः मस्त झोपणार ..कसली आहेस ग तू …आणि रागात स्वतःच्या रूम मध्ये गेला
नूतनच्या आधीच संजू आत गेला होता..त्याने विचारलं ताई ते अंकल कोण आहेत ग ? ते का आलेत आपल्यासोबत ??सारख सारख तुझ्याकडे बघत असतात वेडे आहेत काय ग जरासे??
नूतन : चिडून ..मोठ्या माणसांना अस बोलतात का? चल झोप बर तू
तिने पण नाईटी घातली आणि झोपली इतक्यात तिच्या मोबाईलवर एक मेसेज झळकला तिने पाहिलं तर अविनाश : स्वीटहार्ट मिस्सिंग यु डिअर प्लीज येना थोड्यावेळासाठी
नू : नाही झोप तू
अ : अग किती त्रास देतेस फक्त अर्धा तास ये
नू : बर थांब संजू झोपल्यावर ओके
अ : हं ओके
अविनाशची बेल वाजली बघतो तर समोर नूतन ऐवजी रूम सर्विस icecream घेऊन आला होता
अविनाश : चिडून ए हे काय ? मी नाही मागवली आणि इथे मी एकजण असताना दोन दोन ?? जा बाबा जा दुसरी कोणाचीतरी ऑर्डर इथे घेऊन आला आहेस तू
वेटर : नाही सर मॅडम ने मागवलीये याच रूममध्ये
अविनाश : अरे इथे कोण मॅडम दिसतायेत का तुला ? (मनात आमची मॅडम तर झोपली केव्हाच )जा बाबा झोपदेत मला
इतक्यात हसत नूतन आली तिने आईस्क्रीम ठेऊन वेटरला जायला सांगितले..
नूतन : तुझं डोकं खुप गरम झालंय ना म्हणून आईस्क्रीम पाठवलं आधी ..म्हटलं उगाच प्रेमा ऐवजी आगीचा भडका उडायचा…
अविनाश : तिच्या जवळ आला ..त्याने तिला मिठीत घेतले ..
नूतन : साहेब आधी आईस्क्रीम खाऊया पाणी होतंय त्याच
अविनाश : किती ग अरसिक आहेस तू..तुला आईस्क्रीम च पडलंय..
नूतन : हो मला खायचिये आईस्क्रीम मी खाणार
अविनाश : बर बाई खातो ..चल खाऊया
आईस्क्रीम खाताना नूतनने अविनाशला तिला जो घडलेला प्रसंग आठवला तो सांगितला आणि घरी गेलेकी लगेच मी तिला विचारेन अस सांगितल
अविनाश : खूपच छान ग मला तर वाटत आहे त्यांना कदाचित खुनी कोण आहे हे पण माहीत असेल मग
नूतन : हो कदाचित …तिला खूप रडू येऊ लागलं ..मला पप्पांचा खुनी शोधायचा आहे रे आम्ही पोरके झालोत ते नाहीत तर ..मला माझे पप्पा हवेत अविनाश ….i want him back right now. Please get him back for me
अविनाशने तिला मिठीत घेतल तो बोलला त्यांना तर मी नाही परत आणू शकत हो पण त्यांच्याऐवजी प्रेम देऊ शकतो तुला सतत तुझी सावली बनून राहू शकतो मी …ती थोडी शांत झाली आणि त्याने तिला घट्ट मिठी मारली .त्या एका क्षणी नूतनने आपलं सर्वस्व त्याला सोपवले ..त्यांना दोघांना कधी झोप लागली समजलंच नाही ..सकाळी 5 ला नुतनला तिच्या मोबाईलच्या अलार्म ने जाग आली…
आपण रात्री हे काय करून बसलो ..छे इतका पण कंट्रोल नाही माझा स्वतःवर ..अविनाशला न उठवताच ती तिच्या रूम मध्ये गेली..पाहिलं तर संजू छान झोपला होता ..नशीब नाहीतर काय बोलले असते मी याला कुठे होते मी
साधारण 8 च्या सुमाराला नाश्ता करून ते निघाले परतीच्या प्रवासाला
नूतनने अविनाशला पुढेच बसायला सांगितले संजू खूप हट्ट करत होता पुढे बसण्यासाठी पण नूतनने ऐकलं नाही
अविनाश ला काही संमजेनाच काय झालंय ही माझ्यापासून अशी लांब का जातीये
दुपारी सगळे जेवायला थांबले तिथे अविनाशने नूतनशी बोलायचा प्रयत्न केला पण ती बोलली नाही ..अविनाशला काहीच समजत नव्हतं की मी केलंय तरी काय ? जे रात्री झालं ते दोघांच्या संमतीने मग ही माझ्यावर का चिडतीये
रात्री 7 वाजता सगळे घरी आले ..तिने रामूकाकाना अविनाशला घरी सोडवायला सांगितले..आणि त्याला बाय पण न करता घरी आली तिच्या आशा वागण्यामुळे अविनाश खूप नाराज झाला ..त्याला काय बोलावे हेच समजत नव्हते
घरी आल्याबरोबर नूतन मेघणाच्या रूम मध्ये गेली ..ती शांतपणे डोळे बंद करून जपमाळ करत होती ..
इतक्या दिवसात नूतनने कधीही तिला इतकं नीट पाहिलं होतं ..ती मनाशीच बोलली किती सुंदर आहे ना ही ..माझ्या आईनंतर पप्पांना ही आवडली यात बाबांची काहीच चूक नाही ..एक माझ्यासोबतच हीच वाईट वागणं सोडलं तर बाकी सर्व संसार तिने खूप चांगल्या पद्धतीने केला …योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात पण पप्पांना खूपदा मदत केली हिने …माझ्यावरच हिला का राग होता इतका हे तर तिलाच माहीत असो आता ही जपात मग्न आहे आपण नंतर येवुया ..ती मागे वळली आणि मेघनाने आवाज दिला
मेघना : झाला का ग सगळा विधी नीट ? संजूने काही त्रास नाही ना दिला
नूतन : हो झालं सगळं ..नाही ग.. संजूला सगळं समजत आई आता.. त्याने नाही दिला त्रास
मेघना : भीमाला सांग तुम्ही आलात तो स्वयंपाकाचं बघेल
नूतन : हो आई सांगितलंय त्यांना..बर मला तुझ्याशी काही बोलायचं होत ..आत्ता बोलूया का?
मेघना : अग त्यात काय विचारतेस.. बोल की
नूतन : पप्पा नक्की कुठे गेले होते ? ते दिल्लीला तर नक्कीच गेले नव्हते ..तू आणि बाबा जे फोनवर बोलला होतात ते मी ऐकलं होतं…काय संपवायला गेले होते ते? सांग आई.. प्लीज ग सांग मला..
मेघना : खूप घाबरली आणि गोंधळली होती .हे बघ घडणारी गोष्ट घडून गेली आता यावर काय विचार करायचा ? आणि ते लोक खूप वाईट आहेत ..तू जरी माझि नाहीस तरी मी तुझा जीव धोक्यात नाही जाऊ देणार ..हा विषय इथेच बंद
आई इतक्या ठामपणे नाही बोलल्यावर नुतनला परत विचारायचे धाडस होत नव्हते ..तरीपण स्वतःला हिम्मत देत तिने आईला सांगितले …आई मला बाबा रोज कुठे न कुठे दिसतात ग ..काहीही न बोलता अचानक गायब होतात ..कदाचित ते मला त्यांच्या खुनीला शोधून शिक्षा दे यासाठी येत असतील ..त्यांच्या आत्म्याला कदाचित शांती नाही मिळलीये ..तुला नाही वाटत का त्यांच्या आत्म्याला शांतता मिळावी? बोल आई ..सांग मला सगळं जे तुला माहीत आहे..
नूतन ने जे काही सांगितलं ते ऐकून मेघना खूप घाबरली…नूतन तुला सांभाळून राहायला हव..धोका आहे पोरी जीवाला तुझ्या ..तो आलाय इथे …मला पण भेटून गेला
नूतन : अग आई...पप्पा मला का त्रास देणार? ते पण त्यांच्या मृत्यू नंतर ?
मेघना : ते तुझे पप्पा नाहीत नूतन
नूतन : काय ??मग कोण आहे?
मेघना : मला तुला सर्वकाही सांगावच लागेल आता ..कारण तो तसापन तुझ्यापर्यंत पोहोचलाय
नूतन : आग काय असं अर्ध अर्ध बोलतेस आई नीट सांग ना काय ते
मेघना : हो ऐक तू ….विश्वासराव मूळचे इथले नाहीतच त्यांचं मूळ गाव मलकापूर..
 तिथे त्यांचे वडील आनंदराव गावचे सरपंच होते ..खूप मान होता गावात त्यांना ..त्यांची पत्नी अत्यंत सुंदर आणि गुणवान होती तिचं नावपन तसच तिच्यानावासारखं रुपमती…घरात नोकर - चाकर , पैशांची खूप रेलचेल होती..काहीपण कमतरता नव्हती …पण त्यांना मुलबाळ काही होत नव्हतं..डॉक्टर, वैद्य , नवस सगळं झालं पण काही उपयोग होत नव्हता…त्यामुळे दोघे खूप दुःखी होते …आनंदरावांचा जीवभावाचा मित्र होता अंकुश त्याची बायको गरोदर होती…पण तिची तब्येत दिवसेंदिवस ढासळत होती..डॉक्टरांनी तिची खूप काळजी घ्यायला सांगितली होती..तो बिचारा एक गरीब शेतकरी कशी काळजी घेणार बर …त्याने ती व्यथा आनंदरावांना सांगीतली..          आनंदराव : अरे खुळ्या वहिनी आहेत त्या आमच्या ..आजच्या आज घेऊन ये त्यांना आमच्या इथं ..माझी रुपमती समदी काळजी घेईल तिची..अरे येड्या ही काय ईचारायची गोष्ट हाय होय रे? जा गड्या जा आपली गाडी घेऊन जा …आणि लगेच आन त्यांना इथं
अंकुशचे डोळे पाण्याने भरून आले.तशी त्यांची मैत्री अख्या गावात प्रसिद्ध होती ..दोघे बालपणीचे मित्र ..तो जी काही शाळा शिकला ते पण  अनंतरावांमुळेच... पण गावात फक्त 7 वी पर्यंतच शाळा होती त्यामुळे पुढील शिक्षण अंकुश करू शकला नाही …शहरात शिकायला गेलेले अनंतराव गुपचूप सुट्टीच्या दिवशी गावी येत अंकुशला भेटत आणि दोन्ही मित्र खूप धम्माल करत …ती जोडी आजपर्यंत किती प्रयत्न करूनपन कोणीच तोडू शकल नव्हतं..
अनंतराव अंकुशच्या बायकोला बहीण मानत …त्यांनी अंकुशला सांगितलं तसबी पहिलं बाळंतपण माहेरलाच करतात आण माझ्या बहिणीला इथं जा आता जास्त इचार नको ..आणि समद नीट होईपतर तू बी इथंच राहायचं काय?
अरे माझ्या भावासारखाच आहेस तू माझ्यासाठी..
अंकुश लगेचच गाडी घेऊन घरी गेला त्याच्या बायकोला समजावून गाडीत घेऊन आला .. लगेच रुपमतीने तिला आधार देत तिच्यासाठीच्या खोलीत नेले आणि सांगितलं हे बघ ताई आजपासून ही तुझी आणि अंकुश भाऊंची खोली..आजिबात जास्त हालचाल करायची नाही..काही लागलं की फक्त एक आवाज द्यायचा मी आहेच ..काय आणि आजिबात अवघडून जायचं नाही ..भावाच घर आहे तुमच्या..तिने फक्त मान हलवली डोळे पाण्याने भरलेले ..आणि तोंडातून शब्दच फुटत नव्हते.
ती विचार करत होती किती मोठी माणसं आहेत ही..इतकी संपत्ती, पण गर्व नाही जरापन..बिचारीला मुलबाळ नाही तरी माझी काळजी घ्यायला तयार झाली ..एखादिनी दुस्वास केला असता…खरच माणस नाहीत देवलोक आहेत ही दोघेपण …
रुपमतीने तिला म्हणजे अंकुशच्या बायकोला उमाला लागणार सगळं सामान नोकरांकडून मागवून घेतलं आणि तिच्या खोलीत व्यवस्थित लावून घेतलं ..एक इलेक्ट्रिक ची बेल तिच्याहाताजवळ बसवून घेतली ..की काही लागलं तर ही बेल वाजवा …
सगळ्यांचा चहा नाश्ता झाला आणि अंकुश शेतावर गेला …अनंतरावांनी रुपमती ला विचारले , “ अग मी योग्य तर केलं ना ग ? नाही म्हणजे तुला न विचारताच तुझ्यावर एका जीवाची जबाबदारी घातली ..”
रुपमती : अहो मला उलट आनंदच झाला ..स्वतः आई होण्याचं सुख माझ्या नशिबात नाही.निदान कोणाला आई होताना पाहायच …तिची काळजी घ्यायचं सुख तरी मिळेल मला…
खरतर आनंतरावांच्या मनात पण हेच होत …त्यांनी प्रेमाने रुपमतीचा हात हातात घेतला …तिला जवळ बसवलं आणि बोलले,”तुला एक सांगू का ग?”
रुपमती : हो बोलाकी ..विचारायचं के त्यात?
अनंतराव : मी जगातला सगळ्यात सुखी आणि श्रीमंत माणूस आहे बघ
रुपमती : ते कसं काय ? श्रीमंत तर आहात पण सुखी आजिबात नाही ..जे सुख तुम्हाला हवं आहे ते कुठे देऊ शकले मी ? एक मूल जन्माला नाही घालू शकले तुमच्यासाठी ..तुम्ही काय हो सुखी
अनंतराव : राणीसरकर ..आहो मूल मी दत्तक पण घेऊ शकतो..,पण तुझ्यासारखी गुणी, सुंदर, आणि समजूतदार बायको आहे माझ्याकडे …माझ्यासारखा सुखी आणि धनी मीच बघ…नजर न लागो कोणाची आपल्याला…आणि प्रेमाने मिठीत घेतले त्यांनी तिला..तिच्या डोळ्यातले अश्रू तिने खूप प्रयत्न करून लपवले पण मिठीत गेल्यावर त्यांच्या खांद्यावर पडलेच
अनंतराव तिला पाठ थोपटत बोलले..या वेडाबाई अग रडतेस काय?
आता आपल्या घरी पण पाहुणा येणार आहेना ठीक आहे थोडे दिवसांसाठी सही
रुपमती उमची सगळी काळजी घेत होती ..तीच खाणंपिणं ..औषध ..वेळेवर डॉक्टरकडे नेने…सर्वकाही
उमाला पाचवा महिना चालू होता तिला अचानक खूप त्रास होऊ लागला… एक दिवस ऍडमिट केलं …त्यावेळी तिची सोनोग्राफी केली त्यात अस समजलं की तिला जुळी मुलं होणार आहेत… आणि तिची तब्येत तर तरी अशक्तच आहे …आता याना पूर्णपणे बेडरेस्ट हवी …
सगळ्यांना खूप आनंद झाला की दोन दोन मुलं अरे वा खूपच छान…पण उमाच्या जीवाला खूप धोका होता तिची काळजी घेण्याची जबाबदारी रुपमतीची होती ती तिच्या जवळच राहू लागली सतत…
एके दिवशी उमा आणि अंकुश बसले होते तेव्हा उमा बोलली ..अहो माझं एक ऐकणार का?
अंकुश : बोल ना
उमा : रूपा ताई माझी लई काळजी घेत्यात ..माजी बहीण असती तर ती बी कंटाळली असती …तीच बिचारीच हाल मला नाई बघवत …या बाळंतपणात मी वाचलं का नाई मला माहित नाहीं..पर देवानं दोन पोर पदरात घातलीत आपल्या ती यांचं कर्ज फेडण्यासाठीच असलं बागा..आपलं एक पोर आपण या दोघांना द्यायचं …मला वाचन द्या तस
अंकुशच्या तर मानातलाच बोलली होती उमा …त्याने लगेचच तिच्या हातात हात देऊन वाचन दिल ..हो आपलं एक पोर मी त्यांना देणार
नऊ महिने भरलेलेच होते उमाचे बोलता बोलताच तिला बाळांतकळा चालू झाल्या …अंकुशने पळत जाऊन रुपमतीला आवाज दिला …रुपमती लगेच आली आणि उमाला घेऊन डॉक्टरकडे गेली ..उमाने दोन सुंदर बाळांना जन्म दिला …उमाला खूप जास्त अशक्तपणा आला होता ..तिने रुपमतीला जवळ बोलवले आणि सांगितले माझ्या एक बाळाची आजपासून तू आई होशील मला वचन दे…रुपमतील काय बोलाव तेच समजत नव्हतं तिने तिच्या हातात देऊन हो अस वचन दिल ..अंकुश तिथेच होता त्याने एक बाळ तिला सोपवलं इतक्यात तिथे अनंतराव आले …त्यांना सर्वकाही प्रकार रुपमतीने सांगितला…आणि आता आपलं पण एक बाळ आहे ...ते ऐकून आनंतरावांना खूप आनंद झाला..
तिने उमा पूर्णपणे बारी होईपर्यंत दोन्ही बाळांची मनापासून देखभाल केली साधारण 1 महिन्यांत उमा बरी झाली तेव्हा तिने एक बाळ तिला सोपवले …त्या दिवशी अंकुश आणि उमा आपल्या घरी गेले …जाताना आनंतरावानी बरेचशे पैसे , कपडे, अन्नधान्य सोबत दिले होते …,दोन्हीकडे दोन्ही बाळ लाडात मोठी होत होती …अनंतराव आणि रुपमतीने आपल्या बाळाचं नाव विश्वास ठेवलं तर अंकुश आणि उमा ने उमाकांत…दोघांच्या शिक्षणाची जबाबदारी आनंतरावानी स्वतःवर घेतली होती..तसा ते कधीच दोघांमध्ये फरक करत नव्हते .जे काही ते विश्वास साठी करायचे तेच उमाकांत साठी पण करायचे …दोघे एकाच शाळेत शिकत होते….जुळे असल्यामुळे दोघे अगदी एकमेकांची कार्बन कॉपी होते फक्त उमाकांतला जन्मतः उजव्या भुवईच्या वर एक मोठा तीळ होता ..बस या एकाच गोष्टीमुळे सगळे त्यांना ओळखू शकत होते ..
पण दोघांचे गुण पूर्णपणे विरुद्ध होते ..विश्वास खूप हूशार…मदत करणारा …सगल्यांचा लाडका तर त्या विरुद्ध उमाकांत , हिंसक, सतत भांडण, अभ्यासात जेमतेंम होता …त्याला अजिबात मित्र नव्हते…
उमा आणि रुपमती उमाकांतला खूप समजावून सांगत... असे नाही करावं वैगरे …पण नाहीच त्याच्यावर काहीच परिणाम होत नसे..

उमकांतला विश्वासचा खूप राग येत असे…त्या दोघांना हे माहीतच नव्हते की आपण जुळे भाऊ आहोत ..उमकांतला नेहमी वाटत असे..साला आम्ही दोघे दिसतो सारखेच पण तो मोठ्या बापाचा आणि मी एका शेतकऱ्याच्या घरी जन्म घेतलाय..तो कसला सुखी आहे राव…त्यांच्या जीवावर मी शिकतोय वाढतोय जेव्हा की ते सगळं माझंच असायला हवंय…
आम्ही दोघे दिसतो सारखेच मग नशीब का वेगळी वेगळी?? सगळीकडे त्या विश्वासच्याच नावाचा बोलबाला आणि मी काय?
तो घरी जाऊन उमाला पण बोलायचा काय ग तुमच्या घरी कशाला जन्म दिलात मला ?का त्या विश्वासाच्या घरून उचलून तर नाहीना आणलं मला आम्ही दोघे इतके सारखे कसे दिसतो?
आता बिचारी उमा काय बोलणार त्याला ती बोलायची अरे नशिबाच्या गोष्टी असतात या आणि या जगात एक सारखे दिसणारे 7 जण असतात आता त्यातले तुम्ही दोघे एकाच गावात जन्माला आला त्याला कोण काय करणार ?
जसजसा मोठा होऊ लागला तास तशी उमकांतची गुंडप्रवृत्ती वाढू लागली होती..चोऱ्या कर.. कुठे मुलींची छेड काढ..कुणाशीतरी बाळेच भांडण कर …उमा आणि अंकुशला तर नको नको झालं होतं अक्षरशः ..काय पाप केलं म्हणून अस पोरग नशिबाला आलय काही कळेना असच दोघे नेहमी बोलत …अशातच एका किरकोळ आजारात उमाच निधन झालं …अंकुशपण पार खचून गेला होता ..मी (मेघना) उमकांतच्या बाजूच्याच घरात रहात होते..त्यांची घरात होणारी रोजची भांडण मला ऐकू यायची …
आम्ही सगळे एकाच कॉलेज मध्ये होतो …मला विश्वास खुप आवडायचे आधीपासूनच …पण त्यांना तुझी आई अर्चना आवडायची..ते सतत तिच्या मागे मागे फिरायचे…होतीच तशी ती …गोरी गोरीपान …घारे घारे डोळे…कुरळे लांब आणि पिंगट केस…एखादी राजकुमारीच वाटायची ती …तुझे पप्पाच काय पूर्णकॉलेजची मुलंच माग होती तिच्या….प्रत्येकाला ती आपली व्हावी अस वाटत होतं…ती अगदी तुझ्यासारखीच होती …आणि मला नेहमी तुझ्या चेहऱ्यात तिचा चेहरा दिसतो …म्हणूनच तुझ्याशी वाईट वागायचे मी …बर असो ….तर त्या मुलांमध्ये उमाकांत पण होताच …तो रोज येताजाता तिला छेडायचा…कधी तिची वेणीच ओढ .. कधी ओढणी …कधी कधी बळेच एखादा रुमाल पुढे नेऊन अग हा तुझा रुमाल पडला बघ …तिने नकार दिला तर आग राणी माझ्याकडून गिफ्ट समजून घे ग…अस खूप काही रोजच चालू होतं…एक दिवसतर कहरच केला त्याने …सगळ्या कॉलेज समोर किस केलं त्याने तिला …
झालेला हा अपमान तिला सहन झाला नाही ती रडत रडत पळत सुटली…तेव्हा विश्वास तिथे नव्हते कोणीतरी त्यांना निरोप दिला आणि ते गाडीवर तिच्या मगोमाग गेले…ती टेकडीकडे चालली होती…हो बरोबर जीव द्यायला चालली होती ती …काय तोंड दाखवायचं घरी? काय बोलू आई बाबांना? जग माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघेल आता ..काशी नजरेला नजर देऊ …अस खूप काही तिच्या मनात येत होतं निम्म्या रस्त्यातच विश्वासने तिला गाठलं …थांब अर्चना अग असा टोकाचा निर्णय घेऊ नकोस …मला समजतंय तुझ्या मनात काय चालू आहे …अग तू मला लहानपणापासूनच खूप आवडतेस मी तुला इथून पुढे कुठलाही त्रास होऊ देणार नाही ..आज जे झालं ते तू विसरू शकत नाहीस समजतंय पण अग…बर ते सगळं जाऊदेत मी आजच तुझ्या घरी तुला मागणी घालायला येतो… मग कोण काही बोलणार नाही तुला…फक्त मला एक सांग हा वेडा नवरा चालेल ना तुला ….
अर्चना तर नुसती वेड्यासारखीच बघत बसली विश्वासकडे…एखाद्याने येऊन चिडवलं असत ..डिवचले असत आणि हा तर …ती झालेल्या प्रसंगामुळे खूपच वाईट मानस्थिती मध्ये होती पण अचानक येऊन विश्वासने तिच्या दुःखावर फुंकर घातली होती…तिने लाजत त्याला हो म्हटलं …बर मॅडम धन्यवाद आता आमच्या गाडीवर बसून तिला पण धन्य करा…ती अजूनच जास्त लाजली आणि गाडीवर बसायचा प्रयत्न करू लागली पण तिला काही बसताच येत नव्हतं…
विश्वास : मॅडम मी काही खाणार नाही तुम्हाला माझा खांदा आता तुमचाच आहे ठेवा हात आणि बसा नीट ….तिने लाजत घाबरत त्याच्या खंद्याचा आधार घेतला आणि गाडीवर बसली…
विश्वास : ए घट्ट धरून बस बाई मला…. नाहीतर मागच्या मागे पडून जाशील आणि मी असाच एकटा बडबडत पोहोचायचं घरी…
आता मात्र अर्चनाला हसू आवरलं नाही …ती पण मनापासून हसली आणि खरच त्याला घट्ट पकडून बसली..
त्याने तिला तिच्या घरी नेऊन सोडले…तोपर्यन्त घडला प्रकार तिच्या घरी समजला होताच …पण तिला हसत हसत घरी येताना पाहून तिच्या वडिलांचा पारा चढला …के ग या कारटे काही लाज… शरम …आहे का तुला ?..इतका मोठा प्रसंग घडूनपण तू हसत हसत घरी येतेस …जीव का नाही दिलास ग विहिरीत … बाईच्या जातील कशाला हवेत हे असले नखरे रोज काय ते नटून थटून जायचं कॉलेजात ?आजपासून तुझं कॉलेज बंद …घरीच बसा …जरा घरातली काम शिका नीट…इतक्यात तिची आई आली 
आई : काय हो …कधी नटली माझी पोरगी??त्या मेल्याची नजरच खराब …गावातल्या सगळ्या पोरींना त्रास देतो तो हैवान …आज आपल्या पोरीला त्रास दिला …के ती गेली होती के त्याच्याकडे ये आणि मला….जाऊदेत काही बोलायचं नाही माझ्या पोरीला…आता बायकांपुढे नवऱ्याचं काही चालतय होय…गप्प बसले …पण ती कॉलेजला जाणार नाही हा त्यांचा निर्णय मात्र पक्का आहे हे त्यांनी तिच्या आईला मोठ्या आवाजात सांगितलं ….
इकडे तिला घरी सोडल्यावर विश्वास तडक घरी गेला …आई बाबा मला तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचंय .. मला माहित आहे असा निर्णय मी स्वतः घेणं योग्य नाही …पण प्रसंगच असा होता की मला या वचनात अडकाव लागेल …माझं शिक्षण आजून व्हायचंय ..मे पण ठरवलं होतं की शिक्षण पूर्ण झाल्यावरच मी लग्न करेन पण मला उद्याच त्या भट काकांच्या मुलीशी अर्चनाशी लग्न करायचे आहे..
आनंदराव आणि रुपमती एकदम शांतच झाले ..मग रुपमती : अरे पण असा अचानक का निर्णय …मला माहित आहे ती मुलगी खूप सुंदर आणि सुशील आहे ..आमची लग्नाला ना नाही …पण बाळा आधी तुझं शिक्षण तर पूर्ण कर 
विश्वासने आज घडलेला सगळा प्रसंग सांगितला…अनंतराव आणि रुपमती लग्नाला तयार झाले ..पण अस लगेच उद्या वैगरे नाही ..तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस ..लग्न अगदी मोठं आणि रीतसर पद्धतीनेच होईल ..हा आज आपण जाऊन मागणी घालायचा कार्यक्रम उरकून घेऊन 
विश्वासला तर सगळ स्वप्नच वाटत होतं …खरच किती भाग्यवान आहोत आपण …
रात्री सगळेजण रीतसर पणे अर्चनाच्या घरी गेले …अर्चनाने आधीच तिच्या आईला घडलेला सगळा प्रसंग सांगितला होताच …त्यामुळे ती तयारीतच भटकाकाना मात्र हा मोठा सुखदायक धक्का होता …माझी मुलगी इतक्या मोठ्या घरची सून होणार ….सगळं काही छान छान होत होत …आता तिला कॉलेज साठी पण परवानगी मिळाली होती … लग्नाचा मुहूर्त काढण्यात आला तो 2 महिन्या नंतरचा होता …सगळी जोरदार तयारी चालू होती …इकडे उमाकांत संतापाणे नुसता पेटून उठला होता…नाही मी अर्चना त्याची होऊ देणार नाही …सगळंच कस त्याच ?ती फक्त माझीच होणार ..मी हे लग्न पण होऊ देणार नाही …
काही शेतीच्या कामासाठी विश्वासराव बाहेरगावी गेले होते त्यांना 2-3 दिवस लागणार होते ... याची खबर उमकांतला मिळाली …त्या रात्री तो गुपचूप अर्चनाच्या घरी गेला त्याने तिला जागे केले ..आणि बोलला हे बघ अर्चना तुला माझीच व्हाव लागलं नाहीतर तुला दुसऱ्याची पण कोणाचीच होऊ देणार नाही …आज तू माझी होणार ती ओरडू लागली तर त्याने तिचीच चादर तिच्या तोंडावर बांधली …तरीपण ती जोरजोरत ओरडायचा प्रयत्न करू लागली …भटकाकाना काहीतरी आवाज जाणवला म्हणून त्यांनी येऊन पाहिलं…ते जोरजोरात ओरडू लागले अरे नाराधमा सोड माझ्या पोरीला …लाज नाही वाटत तुला …त्यांनी त्याला मागे ओढायला सुरवात केली …त्याने उठून रागाच्या भरात बाजूला पडलेले लाकूड त्यांच्या डोक्यात 2-3वेळा जोरजोरात मारले …रक्ताच्या चिरकांडया उडून ते जागेवरच मृत्यू पडले…तिची आई मध्ये आली त्याने तिला पण तसेच मारले …आणि कसलीशी गोळी अर्चनाच्या तोंडात कोंबली त्याने तिला थोड्याच वेळात ग्लानी आली …त्याने तिच्यावर रात्रभर जबरदस्ती केली …ती तर बिचारी शुद्धीत पण नव्हती …गावात कोणालाच काहीच खबर नव्हती ..इकडे काय घडलंय ते…सकाळी सकाळी विश्वास गावात आला …त्याला वाटलं जात जाता अर्चनाला भेटून जावं …उमाकांत तर सगळं उरकून पहाटेच पळून गेला होता….
विश्वासराव त्यांच्या घरी आले पाहतात तर दरवाजा उघडाच …आत जाऊन आवाज देऊ लागले पण काहीच प्रतिसाद नाहीं…त्यांना दोन देह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले …अर्चना अस्तव्यस्त पडली होती त्याने तिच्या अंगावर चादर टाकली …तिच्या आईची थोडीशी हालचाल विश्वासला जाणवली ….त्याने तत्काळ पोलीस आणि अँबुलन्स ला कॉल केला …
झालेला प्रकार बघून विश्वासला खूप धक्का बसला होता …त्यात अर्चानाची अशी अवस्था बघून तर तो आतून पूर्ण कोलमडला होता …तो तिथेच डोक्याला हात लावून बसला होता …थोड्या वेळात तिथे पोलिस आणि अँबुलन्स दोन्ही पण आले ..पोलिसांनी तर विश्वासलाच हातकड्या घातल्या…तो कीती समजावून सांगत होता पन पोलीस ऐकायलाच तयार नव्हते …त्याने खूप विनंती करून घरी फोन केला …आनंतरावना सगळं काही सांगितलं थोडयाच वेळात अनंतराव वकिलांसोबत तिथे आले…त्यांनी जमानतीवर त्याला सोडवलं…
इकडे दवाखाण्यात अर्चना चे वडील तर लगेचच मृत्युमुखी पडले होते …पण तिची आई जिवंत होती ....परंतु बेशुद्ध होती …अर्चना तर खूप घाबरलेली होती …तिला दिलेल्या झोपेच्या औषधांचा असर उतरायला बराच वेळ लागला..ती जेव्हा शुद्धीवर आली तिला झालेला प्रसंग आठवला ..ती जोरजोरात ओरडू लागली बाबांना वाचवा माझ्या …आईग ..तो आलाय इथे पकडा त्याला ...जेव्हा ती उठू लागली तेव्हा तिला जाणवलं की आपल्या शरीरासोबत काहीतरी भयानक प्रसंग घडला आहे …ती जोरजोरात रडू लागली …डॉक्टरांनी तिच्यावर उपाय चालू केले होते …पोलिसांना कळवण्यात आले की अर्चना आता शुद्धीवर आली आहे  मनस्थिती खूप खराब आहे तिची …सांगता येत नाही ती जबानी देऊ शकेल की नाही…आणि तिची आई आजून शुद्धीवर आली नाहीये ….
थोड्याच वेळात तिथे पोलीस आले ..त्यांनी अर्चनाला विचारायला सुरवात केली
बोला ताई कोणी केलं हे सगळं …कस झालं …अर्चना फक्त बाबा माझ्या बाबांना वाचवा इतकच ओरडत होती
पोलिसांनी तिला पुन्हा पुन्हा विचारलं कदाचित ती थोडीशी सावरली असावी तिने अचानक उमाकांत …त्या उमकांतला सोडू नका .. माझं आयुष्य खराब केलं सगळं त्यांनी …मी आता काशी जगू ??मी माझ्या विश्वासला कस तोंड दाखवू??
पोलीस : म्हणजे हे सगळं विश्वास नि नाही केलं ??
अर्चना : वेड लागल का तुम्हाला ??माझा विश्वास कधीच अस वाईट काम करणार नाही ..ही सगळी करणी त्या उमाकांत ची आहे पकडा त्याला …
हे होत असतानाच तिथे आनंदराव आणि विश्वास आले ..अर्चना अस बोलताच विश्वास पळतच तिच्याजवळ पोहोचला तिला मिठीत घेतले …अग वेडे तू मनाला लावून घेऊ नकोस जे घडलं ते घडून गेलं ..तू माझ्यासाठी आजूनपन माझी आरचू आहेस आणि मी सतत तुझ्या सोबत आहे …फक्त आता जे घडलं ते सगळं पोलिसांना नीट सांग तिने ती बेशुद्ध होईपर्यंतच सगळं सांगितलं पण पुढे काय झालं ते मात्र तिला आठवत नव्हतं …चांगली गोष्ट् हीच होती की आता पोलिसांनी विश्वास अपराधी नाही हे मानलं होत.. पोलिस उमाकांतच्या घरी गेले पण तो तिथे नव्हता …पळून गेला होता तो …त्याला वाटलं होतं आपण 3 खून केलेत …
अर्चनाला आणि तिच्या आईला बर होण्यासाठी जवळ जवळ  3महिने लागले त्यामुळे त्यांचं लग्न पुढे ढकलल ..पण आजून ही उमाकांतचा तापासच नव्हता ..तो अधून मधून विश्वासला फोन करून धमकी द्यायचा अर्चना फक्त आणि फक्त माझी आहे तिला हात सुद्धा लावायचा नाहीस तू …नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही..
आज अर्चनाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार होता ..सगळे खुश होते की आता या दोघांचं लग्न करूया तिच्या आईला पण आता बर वाटत होतं …पण चालता चालताच अर्चनाला चक्कर आली आणि ती खाली पडली ..डॉक्टर पण चकित झाले सगळे रिपोर्ट तर नॉर्मल होते आता काय झालं हिला …त्यांनी चेक केलं …थोडाविचार करून त्यांनी स्त्रीरोग तज्ञा बोलवल्या आणि कन्फर्म झालं की ....डॉक्टरांना बरोबर वाटलं होतं…पण थोडं धक्कादायक होत ते…अर्चना आई होणार होती …उमाकांतच बाळ होत तिच्या पोटात…तिला वाटलं आता विश्वास आपल्याला सोडणार…पण नाही तरीपण विश्वासरावांनी तिच्याशी लग्न केलं …लग्नानंतर 7 महिन्यात तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला …आणि ही बातमी उमकांतला कुठून तरी मिळाली…तो त्याच रात्री हॉस्पिटलमध्ये आला माझं बाळ आणि माझी अर्चना याना मी घेऊन जाणार …अस बोलत तो तिच्या रूम मध्ये गेला तिथल्या नर्स ने त्याला ओळखले तिने पटकन विश्वासला फोन केला 10 मिनिटात तो तिथे पोहोचला पण जे नको ते झालं होतं …उमाकांत ने अर्चनाला तिथेच असणाऱ्या कात्रीने मारून टाकलं होतं आणि तो आता त्या बाळाला घेऊन पळून चालला होता ..विश्वासने येतानाच पोलिसांना फोन केला होताच ते आणि विश्वास मागोमागच हॉस्पिटलमध्ये आले …विश्वासने अर्चनाला पहिला आणि त्याने मोठ्याने हंबरडाच फोडला …अरचु तू …त्याने डॉक्टरांना बोलावलं …पण नाही या वेळी ति त्याला कायमची सोडून गेली होती…
विश्वासने त्याला विचारले अरे का ?का ?अस का केलंस तू ? 
उमाकांत : मग तिला चल म्हणत होतो तर ती पण येत नव्हती आणि माझ्या बाळाला मला घेऊन पण जाऊ देत नाही …पाठवली तिला पण तिच्या बापाकडे…हे माझं बाळ आहे मी घेऊन जाणार …आणि जर ती माझ्याकडे नाही तर कोणाकडेच राहू देणार नाही…ही माझी पोरगी आहे ..माझी ..काय?तुम्ही जर हिला माझ्याजवळ नाही राहू दिल तर हिलापण हिच्या आईकडे पाठवीन…
तो बोलण्यात गुंतला होता तेव्हाच काही पोलीस मागच्या खिडकीतून चलाखीने त्याच्या मागे आले आणि बाळाला काढून घेतल त्याच्या हातातून…दुसऱ्या पोलिसांनी त्याला हातकड्या घातल्या …बाळाची जबाबदारी विश्वासने घेतली…ते बाळ म्हणजेच तू ग …हो नूतन तू उमाकांत आणि अर्चनाची मुलगी आहेस मी तुझी आई नाही काकी आहे…तुला त्रास द्यायचं कारण फक्त तुझं अर्चना सारख दिसणं होत …
विश्वासराव त्यांची आई आणि वडील तुला लहानाची मोठी करत होते …माझा तर जीव अडकला होता ग विश्वरावांमध्ये …त्यानी त्यांच शिक्षण पूर्ण केलं …तेव्हा तू 5 वर्षाची झाली होतीस …एकीकडे उमाकांत ला वेडाचे झटके येत असल्यामुळे फाशी न देता वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ठेवले गेले …त्याच्या धक्क्याने त्याच्या आईला उमाला हार्ट अटॅक आला आणि त्यात त्या मरण पावल्या…
विश्वासरावांना आता आजिबात गावात राहावंसं वाटत नव्हतं पण त्यांना तुलाही अंतर द्यायचं नव्हतं …अनंतराव आणि रुपमती त्याच्या खूप मागे लागले होते दुसर लग्न कर …पण ते त्यासाठी पण तयार नव्हते …मग त्यांनी ते गाव सोडून लवकरच शहरात जायचा निर्णय घेतला पण अनंतराव आणि रुपमती काही गाव सोडायला तयार नव्हते ..मग नूतनची देखभाल कोण करणार …विश्वासराव खूप बेचैन झाले होते ..त्यांना काहीच मार्ग सापडत नव्हता 

मला खूप वेळा वाटायचं ..त्यांच्या समोर जावं आणि सांगावं मला तुमच्या पायाशी स्थान द्या हो …मी सदैव तुमचीच आहे …इतर कोणाचा विचारही या मनात आजपर्यंत कधी आला नाही …पण कधी हिम्मतच झाली नाही
माझ्या वडीलांची परिस्थिती खूप वाईट होती …खूप प्रयत्न करून त्यांनी माझं लग्न ठरवलं होतं…तो मुलगा माझ्या पेक्षा 15 वर्षांनी मोठा होता …का तर मी गरीब घरची ना कोण करणार लग्न माझ्याशी ?अस माझ्या वडिलांना वाटत होतं ..हुंडा द्यायची किंवा लग्न करून द्यायची त्यांची ऐपतच नव्हती…मला काय करू काहीच समजत नव्हतं …कोणाकडे मदत मागू …आशा म्हाताऱ्या मानसासोबत लग्न करण्यापेक्षा मरण बर अस मला वाटू लागलं होतं ...आणि मग माझ्या मनात काही आलं ….
माझ्या मनात अस आलं की ..सध्या आनंदराव आणि रुपमती तसेपन विश्वास साठी खूप टेन्शन मध्ये आहेत…त्यांची इच्छा आहे की त्याने लग्न करावं मग मी माझी व्यथा त्यानाच सांगितलं तर …ते दोघे मनाने पण खूप चांगले आहेत..जर त्यांनी मागणी घातली तर आबा नक्कीच नाही म्हणणार नाहित आणि त्या म्हाताऱ्यापासून पण माझी सुटका होईल…मग मी वेळ पाहून एक दिवस गाठलं दोघांना …
दोघेपण हॉल मध्ये पाळण्यावर बसले होते ..काहीतरी बोलत होते…मी जाऊन सरळ दोघांच्या पायावरच लोळण घेतलं ..आणि बोलले आता फक्त तुमचाच आधार आहे मला …वाचवा मला …ते दोघेपण एकदम दचकले ..आग कोण तू? काय झालंय तुला …
मी माझी ओळख दिली अहो नामा सुताराची मुलगी मी..
रुपमती : अगबाई किती मोठी झालीस ग तू ..खूप लहान असताना पाहिलं होतं तुला तू अंकुश भाऊजींच्या बाजूलाच राहतेस ना ?
मेघना : हो ताई
रुपमती : उठ बाळ ये अशी जवळ बस माझ्या …हं सांग आता काय झालंय तुला ? मी काय मदत करू तुझी? सांग ?
मेघना : ताई मला विश्वास खूप आवडतात अगदी लहानपणापासून…खूप प्रेम आहे माझं त्यांच्यावर…पण त्यांना अर्चना आवडत होती म्हणून मी माझं प्रेम त्यांच्यापुढे कधीच व्यक्त केलं नाही…न आता त्यांची अवस्था मला पाहवत नाही …मी रोज प्रयत्न करते जाऊन त्यांच्यापुढे माझं प्रेम व्यक्त करायचा ..पण हिम्मतच होत नाही माझी…
आबांनी खूप स्थळ आणली वेगळी वेगळी …आम्ही गरीब असल्यामुळे हुंडा नाही देऊ शकत …मग आबा कोणालापन आणतात माझ्याशी लग्न करायला…आता पण नांदगाव च्या सावकाराचा स्थळ आणलं आणि पक्कच करून टाकलंय …मला विचारलं पण नाही …ताई ते माझ्यापेक्षा 15 वर्षांनी मोठे आहेत ..
जर मी तुम्हाला सून म्हणून पसंत असेल तर तुम्ही माझ्या घरी रीतसर मागणी घालाल का ? म्हणजे मग मला विश्वास ना पण साथ देता येईल….आत्ता ते ज्या वाईट मनस्थिती मध्ये आहेत त्यातून मी त्यांना बाहेर काढेन …वाचन देते ताई खूप सुखाचा संसार करून दाखवेन तुम्हाला ..फक्त आत्ता साथ हवी तुमची
आनंदराव आणि रुपमती एकमेकांकडे पाहू लागले …मी दिसायला सुंदर होतेच …नाही म्हणायचं तस काही कारण नव्हतंच …ते बोलले तू आत्ता घरी जा …आम्ही बघतो काय करायचं ते…
मेघना घरी गेली आणि उद्या काय होईल याची वाट पाहू लागली …संध्याकाळी विश्वास घरी आला तेव्हा रुपमतीने त्याला जवळ बोलावले …हातात तेलाची बाटली घेतली आणि बोलली …अरे विश्वास तुला अस दुःखी नाही पाहू शकत मी ..ये बस इथे थोडं डोक्याला तेल चोळून देते बर वाटेल तुला …विश्वासला लहानपणापासून तिने केलेला हेअस मसाज खूप आवडायचा … तो लागेच तिच्या पुढ्यात बसला…
रुपमती : आज काही कानावर आलं आमच्या तुमच्याबद्दल
विश्वास :(( एकदम गोंधळून )… का ग काय झालं ? मला नाही माहीत काही …काय ऐकलंय?
रुपमती : तू मेघनाला ओळ्खतोस का? 
विश्वास : कोण ग? ती सुताराची? 
रुपमती : हो तीच ..आली होती आज आपल्या घरी …खूप त्रासात आहे ती 
विश्वास : का? आणि त्यात माझं काय??मी तर बोलतपन नाही तिच्याशी
रुपमती : अरे तोच तर प्रॉब्लेम आहे..तू बोलत नाही …आणि तू पण
विश्वास : आई नीट सांग ग ..का उगाच गोल गोल फिरवतेस
रुपमती : मी नाही घुमवत …ती घुमतीये तुझ्या बाजू बाजूला …वेड्यासारख प्रेम करते तुझ्यावर…पण बोलायला घाबरते
विश्वास : काय ???मला घाबरते आणि तुम्हाला सांगते ..अवघड च आहे की हे
रुपमती : अरे तिचा बाप एक म्हाताऱ्याशी लग्न लावायला निघालाय तीच …जर तू हो बोललास तर इतकी चांगली मुलगी आपल्या घरात येईल ..खूप छान आहेर पोरगी जर तू हो बोलास तर आम्ही बोलणी करतो तिच्या घरी..एक मुलीला वाईट होण्यापासून आपण वाचवू शकतो रे बघ विचार कर 
विश्वास : मी काय कोणाचं भलं करणार? माझ्या अर्चनाला वाचवू शकलो नाही मी साधं आणि तीच काय चांगलं करणार मी… चल आई जेवायला दे मला ..आणि नूतन कुठे आहे जेवलीका??
रुपमती : नूतन वरती रुसून बसलीये
विश्वास : ते का? आता हिला काय झालं?
रुपमती : अरे मघाशी मेघना आली होती.. तिच्यासोबत खेळत होती ..छान गट्टी जमली होती दोघींची पण खूप उशीर झाला ..तर मीच बोलले मेघनाला ..आता घरी जा ..म्हणून बाईसाहेब रुसून वर बसलात ..तिला मेघना हवी आहे..हे ऐकून विश्वास पळतच वर गेला आणि नुतनला विचारलं : खरच मेघना आई आवडेल का तुला ?
नूतन : ती माझी आई आहे जे घेऊन या तिला 
विश्वसला थोडावेळ असा भास झाला जणूकाही अर्चनाच् बोलतीये जा तीला घेऊन या …
विश्वासने नुतनला उचलून घेतले ..खाली येऊन रुपमतीच्या जवळ बसला ..आणि बोलला – जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर घाला मागणी मेघनाला मी तयार आहे…
दुसऱ्याच दिवशी रुपमती आणि आनंदराव मेघणाच्या घरी गेले..त्यांनी तिच्या वडिलांकडून तिचा हात विश्वास साठी मागितला ..आधी तिच्या वडिलांनी खूप नाटक के ..तीच लग्न ठरलं आहे..ते पण बिन हुंड्याच ..
रुपमती : आम्हाला तुमचा एक रुपायापन नको फक्त मुलगी आणि नारळ द्या ..आणि नारळ पण नसेल तर फक्त मुलगी द्या…
मेघनाने नशीब काढलं रे देवा अस जिर जोरात तिचे वडील ओरडत सुटले.. ..लवकरचीच तारीख धरली लग्नाची आणि आम्ही दोघे विवाहबद्ध झालो
आमचं लग्न जसकाही फक्त तुझ्यासाठीच झालं होतं  ..विश्वासराव माझ्याशी बोलत पण नव्हते …आणि मी तर त्याच्यासाठी आले होते इथे..त्यांचं आपल नेहमी नूतन …नूतन…आणि नूतनच …मग मला हळू हळु तुझा खूप राग येऊ लागला …मला त्यांनी बायकोची जागा दिलीच नव्हती ..मी फक्त तुझी आया बनले होते …रोज तीळ तीळ तुटत होते…हे रुपमती च्या लक्षात आलं …एकदिवस त्यांनी आम्हा दोघांना त्यांच्या रूम मध्ये बोलावलं …
रुपमती : काय कसा चालुये संसार तुमचा ?
आम्ही दोघे अगदी एकसाथ : छ ..छानच चालुये ..का बरं ??
रुपमती : अरे मला माझं नातवंड कधी मिळणार बघायला?
विश्वास : अग आई नूतन तुझीच नात आहे की ..
रुपमती : हे बघ विश्वास स्पष्टच बोलते ..ती माझी स्वतःची नात नाही ..तिच्यामध्ये तुझा अंश नाही …मला तुझ्या आणि मेघनाच्या बाळाशी खेळायचय …तिला मी आपलीच मानते ..पण मानन आणि असणं यात खूप फरक आहे विश्वास …लग्नाच्या पहिल्या दिवसापासून बघातीये मी तुला …तू मेघनाच् स्थान आजून  दिल नाहीयेस तिला …तिचा हक्क आहे तो..होना मेघना ? बरोबर बोलतीये ना मी
मी फक्त होकारार्थी मान हलवली आणि विश्वासराव माझ्याकडे आशचर्याने बघू लागले...आमची नजरा नजर झाली …आणि मी चक्क लाजले …अगदी माझ्या नकळतपणे..
रुपमती : हसत अरे खूप प्रेम आहे तीच तुझ्यावर …कशी नक्षत्रासारखी पोर आहे …जी आता या जगात नाही तिच्यासाठी झुरत बसण्यापेक्षा …इतकं सुंदर भविष्य आहे तुझं ..तुझ्यासमोर तिकडे लक्ष दे ..तिला पण भावना , मन आहे ….
विश्वासराव असेपन मनाने खूप चांगले ..जेव्हा त्यांना जाणवलं की आपण मेघनावर अन्याय करत आहोत ..त्यांना स्वतःचाच खूप राग आला 
विश्वासराव : हो आई समजलं मला …मी फक्त स्वतःचाच विचार करत होतो …माफ कर मेघना मला ..तुझ्या मनाचा मी विचारच नाही केला …इथून पुढे मी तुला नेहमी सुखी ठेवेन ..,पण त्यापूर्वी तू मला माफ केले ना हे  सांग…आणि आई तुला लवकरच तुझं नातवंड खेळताना दिसेल ग आपल्या घरात …
आणि हळूच मला कोपराने मारलं ना यांनी..आणि माझ्या चेहऱ्यावर मिश्र भाव आले जे सासूबाईंना बरोबर समजले …त्या मिश्किल पणे बोलल्या आजपासून नूतन माझ्याजवळ झोपेल जा तुम्ही …तुमची जबाबदारी पूर्ण करा ..आधीच खूप उशीर झालाय एक वर्ष गेलंय असच आता आजून नको …
आम्ही दोघेपण खाली मान घालून लजलोच ..आणि होकारार्थी मान हलवली …
रुपमती : अरे अजून इथेच ? चला निघा आता इथून 
आम्ही दोघे आमच्या रूम कडे निघालो …माझ्या मनात भावनांचा कल्लोळ उठला होता नुसता ..आज मी खऱ्या अर्थाने त्यांची होणार होते … चलता चालता त्यांनी माझा हात हातात घेतला ..आणि दुसरा हात माझ्या खांद्यावर ..मे तर नुसती पाणी पाणी झाले होते…हृदयात नुसती धडधड होत होती …आनंद पण होता आणि टेन्शन पण..ज्याची मी वाट बघत होते आज ती वेळ आली होती …माझ्या मनात एकदम येऊन गेल …जुने लोक बरोबर बोलतात सब्र का फल हमेशा सही होता हे..हं …आम्ही आमच्या रूम मध्ये गेलो …दोघे एकदम चकितच झालो समोरच दृश्य पाहून…पूर्ण खोलीत गुलाबाच्या पाकळ्या होत्या …सेंटेड मेणबत्त्या लावल्या होत्या बेड मस्त मोगरा आणि गुलाबांच्या पाकळ्यांनी सजवला होता बाकी सर्व लाईट बंद केलेले होते …हे काम आमच्या सासुबाईंचंच होत त्यांनी भीमा कडून सगळं करून घेतलं होतं हे सगळं …खरच मी खूप नशीबवान अशी माणसं मला मिळाली…
त्यांनी मला दरवाज्यातच उचलून घेतलं ..मी तर लाजून लाजूनच अर्धमेली झाले होते 
मेघना : अहो हे काय सोडा ना कोणी पाहिलं आपल्याला 
विश्वास : बघूदेत की  ..लायसन आहे आपल्याकडे असच थोडी उचललं तुला …आणि आज तर आमच्या आईनेच फर्मान सोडलंय त्यांना नातवंड हवंय मग त्यांचा मान तर ठेवायलाच हवा ना आम्हाला
मेघना : दोन्ही हात स्वतःच्या तोंडावर ठेवत इश्श ..काय हे! तुमचं अस रूप मी आज प्रथमच पाहतीये
विश्वास : का ग के झालं ? नाही आवडलं का ?
मेघना : मी याचीच तर वाट पाहत होते ..आपण खूप म्हणजे नक्की कधी नाही सांगता येत पण खूप लहान असल्यापासून तुम्ही मला आवडता ….नेहमी तुमच्याकडे पाहतच मी लहानाची मोठी झाले..आणि तुमच्या या अश्या प्रेमासाठी जेव्हापासून आतुर होते …पण तुम्ही इतके रोमॅण्टिक असाल अस नव्हतं वाटलं मला 
विश्वास : अरेरे ! अंदाज चुकला मॅडमचा ..आता हो काय करणार तुम्ही? पण आता तुला दुसरा उपायपन नाही कारण हा जन्म तर आपण बांधलेले आहोत ..
मेघना : हाच का मी तर जितके जन्म घेईन ते सगळे जन्म मला तुम्हीच हवे आहात 
विश्वास : ए बाई इतकं मोठं कॉन्ट्रॅक्ट नको हा ..,बाकीच्यांना पण मोका हवा ना …
मेघना : नाही तुम्ही फक्त आणि फक्त माझेच आहात 
विश्वासने तिला जवळ घेतले ..तिला अलगद जवळ ओढून घेतले ..आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून एकदम लाडीकपणे हो का ग मी फक्त तुझाच का ? आणि तिच्या ओठांवर अलगद ओठ टेकले 
ती रात्र त्यांच्या भावी सुखी आयुष्याची सुरुवात होती …
आता नूतन जवळ जवळ 5 वर्षाची झाली होती …त्यादिवशी त्यांना ती गुड न्युज मिळाली
मेघना आई होणार होती  .खूप खुश होते मी ..आणि आम्ही सगळेच …आता सगळयाच तुझ्याकडच लक्ष कमी होऊ लागलं होतं ..पण भीमा तुझी सगळी काळजी नीट घेत ..आणि विश्वास पण …ते तुला कधीच त्यांचा पासून जास्त वेळ ठेवतच नव्हते …वाटलं होतं मला मूळ होणार तर ते तुझ्यापासून थोडे तरी दूर होतील ..पण छे  .खूपच जीव त्यांचा तुझ्यावर …
संजूचा जन्म झाला घरात जसकाय मोठा उत्सव च होता …सासूबाई आणि सासरेबुवा मला आजिबात नजरेआड होऊ देत नव्हते खूप काळजी घेतळी त्यांनी माझी बाळांतपानात ..,कदाचित माझ्या आईनपन नसती घेतळी इतकी माझी काळजी…..पण विश्वास आजूनपन नूतन नूतन करायचे ते संजुला कधीच मनापासून जवळ घेत नसत… मला खूप वाईट वाटायचं …ते मला बोलले ..मूलगीतर आहेच आपल्याला आता एक मुलगा पण झाला ..तू ओपेशनच करून घे काय करायचीय आजून मूल…
पण मी नाही केलं ओपेशन ..मला असं वाटलं की यांना मुलींचाच लळा जास्त आहे ..मग एक मुलगी झाल्याशिवाय मी ऑपरेशन नाही करणार …
तू संजुला घ्यायला यायचीस जवळ आणि मी तुला फटके देऊन पळवून लावायचे ..सासूबाई बघुन पण काहीच बोलायच्या नाही …भीमा चा खूप जीव होता तुझ्यावर त्याला खूप राग यायचा माझा ..पण त्याने घरात कधीच कोणाला काहीही सांगितलं नाही …
संजू काहीतरी 4 वर्षाचा असताना विश्वासरावांनी मलकापूर हुन इथे राजेवाडी ला शिफ्ट व्हायचे ठरवले …तसे त्यांनी रुपमती व आनंदरावांशी बोलणे केले…त्या दोघांच म्हणणं होतं अरे आपलं सगळं आहे इथे ..काही कमी नाही मग कशाला हवाय नवा व्यवसाय ? नको जाऊ ..पण विश्वासरावना तिथे राहायचे नव्हतेच त्यांचा निश्चय पक्का होता..ते तुला पन घेऊन निघाले सासूबाई खूप चिडल्या …अरे ती कशाला हवी मधे ?? विश्वासराव .तीच तर हवी सोबत आणि निर्णय पक्का झाला  आपण चौघे निघालो त्याच दिवशी..तुझे पप्पा खरच ग खूप हुशार आणि जिद्दी …त्यांनी कोणाचाही आधार न घेता नवीन व्यवसाय सुरू केला ..आणि मूळचेच खूप हुशार असल्याने ....ते त्यात खूपच कमी वेळात यशस्वी झाले…
आता त्यांना उमाकांत , तुझी आई अर्चना यांचा जवळ जवळ विसरच पडला होता ..एक दिवस रात्री जेवत असताना त्यांना एक फोन आला …काय रे माझं प्रेम हिसकावून घेतलंस …आता माझी मुलगी पण …मी इकडे इतक्या त्रासात आहे आणि …तू मजा करतोस …येतोय मी लवकरच तुझ्या भेटीला …विसरलास तू?  मी काय बोललो होतो ते? जर तू माझ्या पोरीला माझ्या पासून दूर केलस तर तिला पण तिच्या आईकडे म्हणजे अर्चना कडे पाठवीन …भरले दिवस तिचे आता…आणि शेवटी जोरात बोलला काय रे ओळ्खल की नाही मला …मिईई उमाकांत बोलतोय …आता तुला पण नाही सोडणार
त्यांनी ताट तसच ठेवलं ..ताटाला नमस्कार करून न जेवताच निघाले …
मेघना : अहो काय झालं ? कोणाचा फोन होता ?
विश्वास : काही नाही …आलोच मी …तुम्ही जेऊन घ्या ..
मेघना : अहो पण अस भरल्या तटावरून उठून चालले तुम्ही ..झालय तरी काय ?
विश्वास : काही नाही ग …,आलो मी थोड्यावेळात मग जेवतो ..ठीक आहे …तुम्ही जेऊन घ्या 
आणि पटापट बाहेर गेले ..जाताना कोणाला तरी फोन केला ..
त्यांचे एक पोलीस मित्र होते त्यांना कॉल केला …आलेल्याफोनच्या नंबर वरून त्याच लोकेशन ट्रेस झालं त्यावर त्याला शोधून काढला …
खूप भयानक दिसत होता तो …केसाच्या जटा झालेल्या ..अंगावरती एक फाटक ..मळकट बनियन …पँटीचे तुकडे तुकडे झालेले …डोळे लाल लाल ..आणि चेहऱ्यावर एकदम विचित्र भाव …
एक कोणालाच समजलं नाही त्याला आमचा नंबर कसा मिळाला ? आम्ही राजेवडीला आलोत हे त्याला कस समजलं? पोलीसांनी त्याला बेदम मारलं आणि पुन्हा वेड्यांच्या हिस्पिटल मध्ये रवाना केले ..स्वारी पळून आली होती हॉस्पिटल मधून..आता त्यांच्या जीवात जीव आला होता ...रात्री खूप उशीरा ते घरी आले आणि लगेच झोपले…,सकाळी उठल्यावर मी खूप वेळ विचारल तेंव्हा कुठे त्यांनी मला सगळा प्रकार सांगितला..मी तर खूप घाबरले होते .ते बोलले घाबरायचं काही कारण नाही …त्यानंतर एक महिन्यात च आनंदराव खूप आजारी पडले त्यांचा निरोप आला म्हणून सगळे गावी गेलो… त्यांना हार्ट अटॅक आला होता ..रुपमतीने आम्हाला बाजूला घेऊन सांगितले की उमाकांत आला होता त्याने धमकी दिली की तुमचं सगळं घराणं गायब करणार ,त्या विश्वास ला आणि माझ्या पोरीला  पण नाही सोडणार मी …त्यांना खूप मोठा धक्का बसला यामुळे ....आणि पाठोपाठ3 अटॅक आलेत ..सांगता येत नाही वाचतील का नाही आणि रुपमती रडू लागली…
विश्वासने तिला जवळ घेतलं , “ आई रडू नकोस ग ..सगळं काही नीट होईल “…रुपमती खूप वेळ रडत होती …विश्वास तिला शांत करत होते ..पण मनात हेच होत की आत्ताच थोड्या दिवसांपूर्वी मी उमाकांतला पकडून दिल होत मग हा परत परत कसा पळून येतो हॉस्पिटलमधून ?आणि जर हा वेडा आहे तर बरोबर आम्हाला कसे फोन करतो ? माझ्या बाबांकडेच कसाकाय आला हा ?काहीतरी गडबड आहे खरी …याचा शोध लावायचाच …पण एकीकडे आनंदरावांची तब्येत हाताबाहेर गेली होती ..डॉक्टरांचे प्रयत्न चालूच होते ..आणि त्यातच त्यांना देवाज्ञा झाली…
रुपमतीला काहीच सुचत नव्हतं ..ती अगदी वेड्यासारख करू लागली ..,,”गेले सुटले तुम्ही …मला गेले सोडून इथे या दोन भावांच्या मध्ये …एकाने तुमचा जीव घेतला …आता दुसरा काय माहीत काय करणार…अहो तुमच्यासोबत मला पण न्यायचं होत ना हो …काय करू या पारक्यांमध्ये राहून ?मला घेऊन चला हो सोबत …घेऊन चला ....
विश्वास : आई मी आहेना ग ..अशी का काहीही बोलतेस आणि कोण ग दुसरा भाऊ उमाकांतचा ?
रुपमती : तु …तूच आहेस त्याचा भाऊ…हो तूच …जुळा भाऊ .मला आता तुझी पण भीती वाटते …आपलं ते आपलंच असत ..किती जीव लावला मी उमाकांत ला पण …पण त्याने माझं सौभाग्य हिरावल माझ्या पासून . तू पण त्याचाच भाऊ …तुझा काय भरोसा? हे बोलत बोलतच ती बेशुद्ध पडली डॉक्टरांनी त्यांना एक इंजेक्शन दिले आणि झोपवले 
विश्वासच तर डोकं सुन्न झाले होत . आधीच बाबा गेले ते दुःख …उमाकांत बाहेर मोकळा फिरतोय त्यापासून धोका …आणि आता आई बोलते मी त्यांचा मुलगाच नाही . अरे काय आहे हे सगळं ? ते डोक्याला हात लावून तिथेच बसले ..मी बाजूलाच होते …धक्का तर मला पण बसला होता …पण त्यांना सावरण जास्त गरजेचं होतं या क्षणाला …आणि मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून शांतपणे तिथे बसले होते…त्यांची पाठ थोपटत होते … की तुमचं कोणीही नसलं तरी मी आहे...
विश्वास खूपच दुःखी झाले होते ..तुला आणि संजुला आम्ही घरीच ठेवलं होतं तस तुला आता चांगलं समजत होत …तुमची दोघांची देखभाल तिकडे भीमा करत होता ..अचानक एखादा करंट बसावा असे विश्वास उठले आणि भीमाला फोन केला …तो पुन्हा वेड्यांच्या हॉस्पिटलमधून पाळाला आहे ..बाबांचा जीव गेलाय त्याच्यामुळे ..आई पण तीच भान हरपून बसलीये …ती मला उमकांतचा भाऊ बोलतीये..काय झालंय आईला काही समजत नाही …
भीमा : साहेब आईसाहेब बराबर बोलतायेत तुम्ही अंकुशच पोर आहात ..जुळी पोर झालती त्यांना आणि त्यातलं येक त्यांनी आईसाहेबांच्या पदरात घातलं व्हत ..आणि तुमि पोरांची काळजी करू नका ..ह्यो वाघ इथं असताना त्याची काय बिशाद वो…समद उरकून य तुमि काय बी काळजी न्हाय..आन जर म्हणत असाल  तर घिऊन येतो याना तिकडं..मला वाटतय म्या यायलाच पायजेल..सायेब येतू मी पोरासनी घेऊन..
विश्वास फक्त ऐकत होता …तो हो नाही काहीच बोलला नाही …मनस्थितीच नव्हती त्याची काही बोलायची ..भीमाने ड्राइवर सोबत घेऊन गाडीतून मुलांना घेऊन आला ..ते गावी येईपर्यंत आमचा जीवात जीव नव्हता …
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी भीमा पोहोचला …आईला पण शुद्ध आली होती …आता ती विश्वासलाच जवळ घेऊन बसली होती …माझ्या बाळा ..आता तूच रे माझा …त्या उमाकांत पासून जपून रहा रे बाबा …नुतनला पण जप ..ती तर त्याचीच मुलगी आहे तरी तिच्या जिवाच्या मागे लागलाय खविस …माझ्या नवऱ्याचा पण जीव घेतला त्यांनी …कधीही चांगल होणार नाही त्याच 
विश्वासला आता बर वाटत होतं की निदान ती त्याला मुलगा मानून जवळ बसली होती ..पण मग काल जे घडलं ते काय होत ? कदाचित तो तिला आलेला पॅनिक अटॅक असावा …पण त्यात मला ती खर काय ते बोलून गेली …आता बाबा नाहीत मला तिची काळजी घ्यायला हवी …माझे आईवडील नसूनपन त्यांनी माझी किती काळजी घेतली …किती सुखात ठेवलं …मला कोणत्याही गोष्टीची कधीही कमतरता भासू दिली नाही …आता मला या उमकांतला पण धडा शिकवायलाच पाहिजे …
आनंदरावानावर सगळे सोपस्कार झाले आज 13 वा होता त्यांचा रुपमती ला पुन्हा  अटॅक आला होता …त्या ओरडू लागल्या माझा नवरा कुठे गेला ? कुठाय तो उमाकांत? आणि अचानक विश्वास च्या जवळ जाऊन त्यांचा गळा धरला …तुला नाही सोडणार आता उमाकांत …माझ्या नवऱ्याचा जीव घेतलास तू …,आता माझ्या विश्वास ला त्रास देतोस तू …आम्हाला सुखाने नाही जगू दिलस तू ..,ना तुझ्या आई बापाला सुख दिलस …आज सोडणार नाही तुला …जीवच घेते तुझा पण….सगळे जण धावत आले विश्वासला सोडवू लागले …मी तर खूप घाबरले होते …त्या काही विश्वासला सोडत नव्हत्या मग काय मी दिली श्रीमुखात भडकावून त्यांच्या …त्या बेशुद्ध झाल्या …अँबुलन्स बोलवले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवलं …इथे 13 व्याच बरंच काही व्हायचं होत त्यामुळे आम्हा दोघांना हॉस्पिटलमध्ये नाही जाता आलं 
भीमा गेला त्यांच्या सोबत …,आणि त्यांना ऍडमिट करून लगेचच आला …सगळं आटोपून आम्ही हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत रुपमती देवाघरी गेल्या होत्या…पण त्या ज्या पद्धतीने गेल्या होत्या ते थोडं वेगळच वाटत होतं …चेहऱ्यावर खूप भीती होती त्यांच्या …डोळे खूप मोठे झाले होते …जीभ बाहेर आली होती …
इतक्यात तिथे डॉक्टर आले ते बोलले ,”अरे तुम्ही लगेच कापडेपन चेंज करून आलात ?वहिनी आत्ताच आल्या वाटत 
विश्वास : काय ? अहो आम्ही आत्ताच तर येतोय 
डॉक्टर : नाही हो मगाशी तुम्ही वेगळ्याच कापड्यामधे होतात…मी तुम्हाला सांगत होतो आता त्या बऱ्या आहेत ..पण तुम्ही माझ्याकडे पाहिलं पण नाही …मला वाटलं टेन्शन मध्ये आहात जाऊदेत …इतक्यात त्यांचं लक्ष रुपमती कडे गेलं …ते म्हणाले अहो हे काय ? यांचं अस काय झालंय ?अहो मघाशी एकदम ओक होत्या …काय केलं तुम्ही यांना …यांच्याकडे पाहून तर त्यांचा गळा दाबलाय अस दिसतंय …डॉक्टरांनी तपासलं ती या जगात नव्हती 
डॉक्टरांना पूर्ण संशय विश्वासवरच होता ..त्यांच्या म्हणण्यानुसार तोच येऊन भेटून गेला आणि त्यांना मारून गेला …आता हे आजून नवीन संकट…आम्हाला समजलं हे काम उमाकांतचच …विश्वास डॉक्टरांना खूप समजावून सांगत होता …अहो आई आहे माझी ही ..मी का मारू तिला …आत्ताच वडिलांचा 13वा घालून आलोय आणि ..लगेच आईपण …माझी मनस्थिती समजून घ्या डॉक्टर मी खूप टेन्शन मध्ये आलोय …अचानक पोरका झालोय मी…मी का मारेल हो आईला माझ्या …डॉक्टरांनी काहीही ऐकलं नाही आणि पोलिसांना बोलावून घेतलं ….
तो आलेला पोलीस तुषार जाधव नेमका विश्वासचा वर्गमित्र निघाला … त्याला धक्काच बसला की विश्वासने अस काही केलं …तो उमकांतला ही ओळखत होताच …तुषारने सर्व प्रकरण विचारले …आम्ही त्यांना सगळं सांगितलं …तुषार तिथे काही पुरावा मिळतोय का पाहत असतानाच त्यांचं लक्ष तिथे असणाऱ्या कॅमेऱ्याकडे गेलं …
इ.तुषार : डॉक्टर इथे हा जो कॅमेरा आहे तो चालू आहे का ?
डॉक्टर : अहो साहेब मोठं नावाजलेल हॉस्पिटल आहे आमचं ..बंद कॅमेरा का ठेऊ …
इ.तुषार : पण इथे असा का बसवला आहे 
डॉक्टर : जेव्हा मेंटली डिस्टर्ब पेशंट्स येतात त्यांना आम्ही या रूम मध्ये ठेवतो observation साठी ठेवला आहे हा कॅमेरा 
इ.तुषार : मला याच आजच रेकॉर्डिंग पाहायचं आहे …चला मला रेकॉर्डिंग रूम मध्ये घेऊन
डॉक्टर : ओहह येस…खरच की हे माझ्या डोक्यातच आलं नाही 
इ.तुषार : म्हणूनच तर तुम्ही डॉक्टर आणि मी इन्स्पेक्टर आहे ना …
डॉक्टर तुषारला घेऊन रेकॉर्ड रूम मध्ये गेले तिथे ज्या वेळी उमाकांत आला होता त्यावेळी पासूनच रेकॉर्डिंग तुषारने चेक केलं ..जे पाहिलं ते पाहून तो सुन्न झाला …
तुषारने रेकॉर्डिंग पाहायला सुरुवात केली …त्यामध्ये उमाकांतच होता भोवतेक …पण तो एकटा नव्हता त्याच्यासोबत आजून कोणीतरी होत …पण ती व्यक्ती पाठमोरी उभी होती रुपमती शुद्धीवर आली होती आणि जरा उठून बसली होती …उमाकांत ने गेल्या गेल्याच तिचा गळा पकडला आणि बोलला …बोल मी तुझाच मुलगा आहे ना का मला त्या भिकरड्यांच्या घरी पाठवलस ?बोल की ए म्हातारडे …
रुपमती हातवारे करत बोलू लागली …आधी गळा तर सोड बोलू काशी ?
उमकांतने तिचा गळा सोडला …मग रुपमती सांगू लागली तू आमचा मुलगा नाहीस आणि विश्वास पण नाही …पण तुम्ही दोघे भाऊ आहात आणि तुम्ही उमा आणि अंकुशची मूले आहात ..आम्हाला मुलबाळ नव्हतं म्हणून त्यांनी तू आम्हाला दत्तक दिला होतास …
उमाकांत : हो ना मग आजपासून मला पण घे दत्तक चल …आणि सगळी इस्टेट माझ्या नावावर कर आताच्या आत्ता …
रुपमती : ते मी नाही करू शकत ..
उमाकांत : का नाही करू शकत ? मग सगळ्यांच्या मैतीच बघ तू आता …एकतर सगळं माझ्या नावावर कर नाहीतर मी नूतनलाच काय कोणालाच जिवंत नाही सोडणार …आजपर्यंत सगळं माझ्या हक्काचं विश्वासलाच मिळत आलंय …त्यांनी बिसनेस चालू केला तर त्यात पण तो यशस्वी …तिथं पण आहेतच शत्रू त्याचे …हे बघ हे आहेत राजाराम भालेकर सर्वात मोठे शत्रू विश्वासचे …सगळ मार्केट तोडलं त्यांनी ह्यांच ..इतकंच नाही …त्यांचे जे काळे धंदे आहेत ते पण उघड केले …खुपसरा गैरकानुनी माल पकडून दिलाय यांचा त्यांनी …आणि राहील साहिल अस ते सोशल वर्क करतो ..काय ते आश्रम आन काय काय …त्यामुळे लोक त्याला इलेकशन ला उभं करणारेत …आता इतके वर्ष इथे रामरावांचं राज्य होत …आणि हा सगळ्याची वाट लावतोय मला त्यांनी आश्वासन दिलय जर मी त्यांना मदत केली तर सगळी तुमची इस्टेट माझी …बोल बाई मी आणलेल्या पेपर्स वर मुकाट्याने सही कर आणि सगळं माझ्या नावावर कर 
रुपमती : अरे माझ्या सहीने काहीच होणार नाही …सर्व इस्टेट नूतन आणि विश्वसच्या नावावर आहे …आणि नूतन आजून सज्ञान नाही झाली त्यामुळे ती जबाबदारी पण विश्वासचीच …बघ मी तर काहीच नाही करू शकत ..हो पण तुझं आणि या रामरावच कारस्थान नक्कीच उघड पाडणार मी पोलिसांना आणि विश्वासला सगळं काही सांगणार 
इतक्यात त्या बाजूच्या व्यक्तीचा आवाज …सोडू नकोस त्या बाईला ..वाट लावेल आपली आशिपन फिट्स येतात तिला ..अस कर गळा दाबून मार …फिटच येऊन मेलीये अस वाटेल …त्यांनी त्याच्याच गळ्यातला स्कार्फ काढून दिला तिला मारण्यासाठी … आणि उमकांतने तो तिच्या गळ्याभोवती गुंडाळून फाशी दिली तिला ..जाताना दोघे वेगवेगळे गेले ..त्यामुळे बाहेर काहिच समजू शकलं नाही…
रेसिपशनच्या कॅमेऱ्यात बरोबर उमाकांत गेल्यानंतर10 मिनिटांनी विश्वास मझ्यासोबत आलेला दिसला 
पण त्या व्यक्तीचा रामरावचा चेहरा काही दिसला नाही पूर्ण विडिओ मध्ये …
तुषारला आणि विश्वास ला आत्ता समजलं की रामरावच्या साथिमुळे हा नेहमी हॉस्पिटलमधून पळून येतो तर …आणि इतका मोठा माणूस या प्रकरणात आहे ..तुषार तर सुन्नच झाला ..कारण आता हे प्रकरण थोड राजकीय वलयात पण येऊ लागलं होतं …लवकरच काही योग्य कारवाई नाही केली तर प्रकरण हाताबाहेर जाईल …आता या सगळ्या मागे कोण आहे हे तर समजलं होत पण त्यांचा चेहरा दिसत नसल्याने काहीच कारवाई करता येणार नव्हती ….
तुषार : विश्वास या विडिओ मधील उमकांतचा मस दिसत आहे तसाच तो बरच काही बोलला आहे त्यामुळे तू निर्दोष आहेस हे प्रुव होत ..त्यामुळे मी तुला अटक नाही करणार पण तुम्ही सगळे सांभाळून रहा …खूप पोहोचलेल्या माणसाची साथ आहे उमकांतला …
विश्वास : अरे तुषार thanku so much …,मला आता वेड लागेल असे वाटत आहे …,आत्ताच बाबा गेले त्यांचं दुःख पचवेपर्यंत आईपण गेली …आणि तिला मारणारा कोण तर माझा सख्खा जुळा भाऊ …आणि आता तोच भाऊ माझ्या आणि माझ्या कुटुंबीच्यापन जीवावर उठला आहे..
त्याने सगळ्या फॉर्मालिटी पूर्ण करून आईची  बॉडी ताब्यात घेतली …आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे अंत्यसंस्कार केले …तेरावा झल्याशिवाय तो तिथून निघू शकत नव्हता …
इकडे तुषारने त्या व्हिडिओच्या आधारावर उमकांतला अटक केली …त्यातून हे पण सिद्ध झाले की तो वेडा नाही …त्यामुळे यावेळी त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये न ठेवता जेल मध्ये ठेवण्यात आले 
13वा झाल्यावर तो सगळ्यांना घेऊन तिथून आपल्या घरी आला …यावेळी उमकांतला जन्मठेपेची शिक्षा झाली खरतर फाशी व्हायला हवी होती पण भोवतेक त्या रामरावांमुळे वाचला असावा तो …रामराव न आजकाल खूप त्रास देत होते आम्हाला …कधी तुला मधेच अडवून मारायचे …कधी आपल्या गाडीच्या काचा फोडायचे …खूपदा निनावी पत्र यायचे हे गाव सोडून जा नाहीतर परिणाम वाईट होतील …विश्वास बिचारा आधीच दोघांच्या जाण्याने खूप खचले होते ..शिवाय उमाकांत आपला भाऊ आहे ..आपण यांचे कोणीच लागत नाही या विचारांनी ते खूप वाईट हालात होते …मी तर रोज समजावत होतेच त्यांना पण काहीच उपयोग होत नव्हता …मी कितीदा सांगितलं त्या रामरावचा पण काटा काट्याने काढा …जर तो आपल्याला इतका त्रास देतो तर त्याच पण कुटुंब असेलच की त्यांना आपण त्रास देऊ …
ते काहीच करत नाहीत म्हटल्यावर मीच भीमाच्या मदतीने रामरावच्या कुटुंबाची माहिती काढली एक मुलगा एक मुलगी …आणि बायको नाही …कुठल्याश्या अपघातात गेली म्हणे ..पण लोक तर बोलतात या रामरावणेच मारलं तिला…सगळे नाद होते त्याला …बाईचा तर खूपच ..हे सगळं त्याच्या बायकोला समजलं तर त्याने तिलाच जगातून गायब केलं अस ऐकण्यात आलं ..शी कसला भयानक माणूस ना हा …आणि त्याचा मुलगा शिक्षणासाठी USA ला होता म्हणे …मुलीचं लग्न झालेले ते पण कोणत्यातरी मोठ्या मंत्र्यांच्या पोराबरोबर …काय कोणाला त्रास देणार राहून गेलं सगळं …
रामरावच खूप मोठं ऑफिस होत ..पण विश्वासरावांच्या हालचाली समजाव्या म्हणून मुद्दाम सेम कॉम्प्लेक्स मध्ये समोरच ऑफिस घेतल त्याने …कोण आलं कोण गेलं सगळं समजायचं त्याला …
बरेचदा दोघे समोरासमोर आले की वाद व्हायचे दोघांचे …विश्वास तसे शांतच असायचे पण रामराव खूप नाडायचा उगाचच भांडायचा …म्हणतात ना उथळ पाण्याला खळखळाट फार ..,तसाच होता बघ तो …
विश्वास हळू हळू त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागले…लोकांनी खूप अग्रह केला त्यांना निवडणूक लढवण्याचा …रामरावच्या समोर उभं राहायचा …पण विश्वासला कधी इच्छाच नव्हती …ते नाही राहिले उभे …रामराव निवडून आले आणि त्यांनी जास्तच त्रास द्यायला सुरुवात केली  ..ते एकदिवस एकटेच रामरावच्या घरी गेले …तिथे रामराव दारू पीत बसले होते …विश्वास : नमस्कार आमदार साहेब ..कसे आहात आपण …तुम्ही खूप चोरून चोरून वार करता आमच्यावर पण आम्हाला अस मागून त्रास देन जमत नाही …आम्ही दोस्ति आणि दुश्मनी दोन्हीपन समोरासमोर करतो …
रामराव : काय रे तुझी हिम्मत काशी झाली माझ्या घरी यायची ?तुला काय वाटतं मला धमकी देशील आणि इथून जिवंत जाशील ?? शक्य नाही रे ते …तुझ्यासारखा मूर्ख आजून पहिला नाही बघ मी …स्वतःच आलाय एकटा वाघाच्या गुहेत…आता कसा वाचणार तू?...
विश्वास : हे बघा तुम्ही स्वतःची समजूत घालू नका …आणि हो मी काही दिसत असलो तरी इतका पण वेडा नाही हो …येताना माझा मित्र इन्स्पेक्टर तुषारला सांगून आलोय ..जर मी 1 तासात परत आलो नाही तर समजून जा मला दगा झालाय आणि पोलिसांची टीम घेऊन ये बंगल्यात …मग तुमचं कसा काय होईल ते तुम्हाला सांगायला नकोच …शिवाय हा माझ्या खिशाला जो पेन आहे ना हा फक्त पेन नाहींतर hidden कॅमेरा आहे यात …आणि तो पण लाईव्ह ..आत्ता आपण जे बोललो ना ते सगळं माझ्या लॅपटॉप वर save होतय आणि माझा पी ए ते बघतोय तिथे …आता पुढे काय करायचंय तुमची मर्जी …
पिलेला रामराव एकदम घाबरला …हे बघा अशीच मस्करी करायची सवय आहे माझी ….बोला काय घेणार चहा कॉफी का दूध ओ …किंवा मग व्हिस्की च घ्या …द्या कंपनी आम्हाला …इंपोर्टेड आहे …आवडेल तुम्हाला …
खरतर विश्वासने अशी काहीही काळजी घेतली नव्हती …तो असाच रागात शिरला होता त्याच्या घरी …पण त्याच डोकं खरच अफलातून चालायचं …शेवटी काय उमकांतचाच भाऊ ना तो …रामरावचि यांना हात लावायची हिम्मतच झाली नाही …ते सुखरूप घरी आले …घरी आले तेव्हा रात्रीचे 12 वाजून गेले होते …पूर्ण घामाघूम झाले होते ते …आल्या आल्या 
जवळ जवळ 2 बाटल्या पाणी पिले ते ..मी विचारलं काय झालंय ?काही त्रास होतोय का ?डॉक्टरांना बोलवू का ??
विश्वास : अग काहिनाही ग ..तू बस अशी जवळ …संगतो तुला …आज वाघाच्या जबड्यातून निसटून आलोय बघ 
मी : ते कसं  विश्वासने सगळा झालेला प्रकार सांगितला …मी इतकी घाबरले की त्यांना घट्ट मिठी मारली आणि पुन्हा असे मदारीचे खेळ करू नका ..नेहमीच खोट पाचत अस नाही …ठीक आहे चला झोपा आता …आणि आम्ही झोपलो ..पण दुसऱ्या दिवशी काय मांडून ठेवलय आम्हाला दोघांनापन त्याची कल्पना नव्हती...
सकाळी रोजच्याप्रमाणे उठून विश्वासाने पूजा केली …नाश्ता झाला ..तू शाळेत गेली …आणि विश्वास ऑफिस ला निघणार इतक्यात कोणीतरी जोरजोरात घराची बेल वाजवू लागलं …आम्ही दोघेपण घाबरलो ..भीमा पण घरी नव्हता ..तो तुला आणि संजुला शाळेत घेऊन गेला होता …,तो तिथेच थांबायचा आजकाल ..तुमची शाळा सुटल्यावर तुम्हाला घेऊनच घरी यायचा ..भीती होतीच ना उमकांत आणि रामरावची…
आम्ही दोघेजण विचारत होतो कोण आहे ..शेवटी विश्वास सावधपणे गेले दरवाजा जवळ आणि आयहोल मधून बघितलं तर समोरचा चेहराच दिसत नव्हता ..आता काय करावं …विश्वासने तुषारला फोन केला आणि मदत मागितली पण तो तर तिकडे गावी ..तो बोलला काळजी नको तिथल्या माझ्या मित्राला पाठवतो मी …आणि गुड न्युज अशी आहे की पर्वा पासून मी पण तिकडेच असेल माझी पोस्टिंग झालीये तुमच्याकडेच …
आम्ही दोघे खूप प्रयत्न करत होतो त्या दोन व्यक्तींचा चेहरा बघायचा पण दिसतच नव्हता …इतक्यात बाहेर पोलीस गाडीचा सायरन वाजला आणि आमचा जीव भांड्यात पडला …तुषारने खरच त्याची जबाबदारी चोख बजावली होती …ते दोघे आवाज ऐकताच ताबडतोब पळून गेले ..मी विश्वसना ऑफिसला नाही जाऊ दिल त्या दिवशी …तुषार त्याच दिवशी रात्री आला ....आपल्याकडेच राहा असा आग्रह केला आम्ही दोघांनी त्याला …असपन त्याच आजून लग्न झालं नव्हतं... मग काय तिकडे एकट राहण्यापेक्षा आपल्या घरीच रहावं हे पटलं त्याला …
ती रात्र आम्हाला झोपच आली नाही …हे काम एकतर रामराव किंवा उमाकांत च होत हे मात्र नक्की 
सकाळी विश्वास ऑफिसला गेले मी घरी एकटीच होते आणि अक्काबाई होत्या आपल्या कामवाल्या …मला तर खूप भीती वाटत होती ..तसं तुषारने एक शिपाई तैनात केला होता बंगल्याबाहेर पण तरी धड धड होत होती …तुषारने फोन करून सांगितलं …उमाकांत पळून गेला आहे जेल मधून सावध रहा वहिनी …आणि विश्वासला पण त्यानेच कॉल केला …आता तर काय विचारूच नको मला सगळ्यांचीच काळजी लागली होती …हा उमाकांत के करेल याचा काहीच भरवसा नव्हता …
दुपारी मला जरा झोप लागली इतक्यात बेल वाजली ..तर तुम्ही तिघे घरी आलात …आता भीमा पण होता घरी …भीमा म्हणजे मला नेहमीच खूप मोठा आधार असल्यासारखं वाटायचं …जणूकाही माझा मोठा भाऊच …मग मी पुन्हा जाऊन झोपले …तुझा जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला मला आणि मी दचकून जागी झाले …बघते तर काय तू आणि संजू काहीतरी खेळत होते आणि तुम्ही ओरडत होतात …
खूप राग आला मला तुझा …आशिपन आता तू 16 वर्षाची झाली होतीस अगदी तुझी आईच दिसायचीस तू …मी धपाधाप दोन धपाटे घातले तुला आणि जा जाऊन अभ्यास कर किंवा झोप अस सांगितलं ...तू रडतच तुझ्या रम मध्ये गेलिस मला वाईट पण वाटलं... पण काय करू खूप जास्त टेन्शन होत ग मला …,
संध्याकाळी विश्वास जरा लवकरच घरी आले …बर वाटलं बघून त्यांना तुषार पण 9 पर्यंत आला ..आम्ही सगळ्यांनी मस्त हसत , मज्जा करत जेवण केलं ..जणूकाही काही झालाच नाही …
थोडक्यात काय तर आजचा दिवस शांतपणे गेला …अस वाटलं आणि मी झोपले ..झोप लागायलाच लागली होती तर मला दरवाजाचा आवाज आला ..मी हळूच विश्वास ला हलवलं ..इतक्यात दरवाजा उघडून तो समोर ..हातात एक सुरा…डोळे लाल लाल झालेले …आणि त्याच्या मागेपन कोणीतरी होत ..कोण होत ... म्हणून वाकून पाहिलं जरा तर रामराव …मी जोरात ओरडले वाचवा वाचवा …उमाकांत …
तुषार माझा आवाज ऐकून त्याच पिस्तुल घेऊनच आला ..त्याने परिस्थिती पहिली …आणि ओरडला हँडसअप कोणीपन हालु नका उगाच मला गोळी मारावी लागेल …त्याला त्या दोघांचे चेहरे काही दिसले नव्हते ..फक्त दोघे उभे आहेत इतकंच  ..आणि त्याच्या लक्षात आलं मागच्या व्यक्तीच्या हातात तर बंदूक आहे आणि तो ती काधिपन चालवेल…आणि तसच झालं त्याने त्याचा हात उचलाच विश्वासला गोळी मारण्यासाठी.... इतक्यात खूप चपळाईने तुषारने त्या इसमावर गोळी चालवली …खूप अंधार असल्यामुळे त्याला नीट दिसलं नाही गोळी पायावर न लागता डायरेक्ट पाठीमध्ये लागली …आणि रामराव तसेच खाली कोसळले। …उमाकांत आजूनपन तसाच बेदारपणे उभा होता …अय चल तो गेला त्याच्या कर्मानी जाऊदेत …तू या पेपर्स वर सही कर चल …,
विश्वझ : का अस करतोयस तू  ..नको रे माझ्या भावा अस करुस ..अरे मी मोठा भाऊ आहे तुझा ..तुला काय हवं ते सगळं देतो पण आधी तो चाकू फेकून दे बर ..सगळी इस्टेट घेरे तुला ..कोणाला त्रास देऊ नकोस ..आणि विश्वास हळू हळू त्यांच्या जवळ जाऊ लागले त्याने त्यांच्या हातावर वार केला आणि त्या झटक्यात घाबरून तुषारकडून गोळी फायर झाली ती उमकांतच्या  डोक्याला घासून गेली…तो खाली पडला

,तुषारने अँबुलन्स बोलावली त्यात ते दोन्ही देह नेण्यात आले …रामराव केव्हाच वर गेले होते ..पण उमाकांत जिवंत होता …,पण तो कोम्यात गेला होता आणि तो शुद्धी वर येन अवघडच होत …त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या जीवात जीव आला...
सगळं ऐकून नुतनला एक प्रश्न पडला रामराव गेले ..उमाकांत असून नसल्यासारखा मग त्यादिवशी पप्पा कोण आलं म्हणून गेले असावे ? तिने हा प्रश्न मेघनाला विचारलाच..
मेघना : अग हाच प्रश्न मलापण पडला होता …विश्वास इथून गेल्यानंतर 2 दिवसांनी मला त्यांचा कॉल आला की ….उमाकांत शुद्धीवर आलाय..
नूतन : व्हॉट???क क काय ??? त्याला आजून ठेवलं होतं हॉस्पिटल वल्यानी इतके वर्ष ?how is it possible?? मी आता 23 वर्षाची आहे जेव्हा हे सगळं घडलं मी 16 वर्षाची होते correct?  अग सात वर्ष??कस हॉस्पिटलमध्ये ठेवलं त्याला आणि कोणी ?कोणी केला खर्च त्याचा ?
मेघना : विश्वास नी 
नूतन : काय बोलतीयेस तू आई ?कस possible आहे ?पप्पा का त्याला वाचवतील?
मेघना : अग उगाच नाही ग प्रेम केलं होतं मी विश्वासवर ..खूपच वेगळ्या काळजाचा माणूस बघ हा…काय तर म्हणे तो माझा जुळा भाऊ आहे ..मी असं कसं मरून देऊ त्याला ? त्यामुळे त्यांनी त्याला वाचवलं
तोच कॉल आला होता यांना …आणि शुध्दीवर आल्यानंतर फक्त एक तास तो हॉस्पिटलमध्ये होता ..नंतर त्याने तिथल्या एका नर्सला विचारलं मी कुठे आहे ?काय झालं होतं? तिने सर्व सांगीतल त्याला ..तर तो जोरात ओरडला त्या विश्वासला जिवंत सोडणार नाही …आणि हातातले सलाईन काढून टाकले ..बाजूच सामान तोडफोड केली ..त्याच नर्स कडून पैसे घेतले …तिचाच मोबाइल घेतला आणि तिथून पळून गेला…ती नर्स खूप घाबरली होती…तिने जाऊन डॉक्टरांना सर्व किस्सा सांगितला ..डॉक्टरांनी विश्वास ला फोन करून सांगितलं …आणि त्यामुळेच तर ते घाबरून गेले …त्यांना वाटल होत शुद्धीवर आल्यावर तो सगळं विसरून जाईल ..असपन सगळे छान सुखाने राहू ..पण छे ग सगळीच स्वप्न थोडीच पूर्ण होतात …तो तर इतक्या दिवसानंतर शुद्धीवर आला तरी त्याला विश्वासच आठवत होता …
हे ताबडतोब गेले गावाकडे ….जिथे त्याला ठेवलं होतं ….त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन नीट माहिती घेतली मग त्यांनी तुषारला फोन केला की हा पळून गेलाय त्याला शोधावं लागेल आपल्याला..अरे नूतनच्या , माझ्या मुलांच्या सगळ्यांच्याच जीवाला धोका आहे रे …खरच कस ना माझं नशीब माझा जुळा भाऊ ज्याने माझ्या सोबत मातेची कूस share केली होती …तोच माझ्या सुखांवर जळतोय …माझ्या आणि माझ्या कुटूंबाच्या मागे लागलाय …
ही सर्व घटना त्यांनी मला फोन करून सांगीतली होती …पण नंतर त्यांना कोणी मारलं काय झालं काहीच समजलं नाही …पण हे नक्की की आता आपल्या सगळ्यांच्याच जीवाला धोका आहे …नक्कीच उमाकांत ला कोणाची तरी साथ आहे ग…
मेघना : नूतन मला तुला काही सांगायचं …पण तू त्याचा चुकीचा अर्थ नाही काढायचास ..
नूतन : इतक्या धक्कादायक घटना सांगितल्यास तू मला आता आजून काय ग राहील ?सांगून टाक ते पण
मेघना : हा जो अविनाश आहे ना ..तो रामरावांचा मुलगा आहे ..जेव्हा तो बोलला तो तुझा होणारा नवरा आहे ..मला तर खूप धक्का बसला ग …खरतर हे मला माहित नव्हतं पण काल विश्वासचे P.A आहेत ना ते असीम त्यांनी सांगितलं मला …आणि आपल्यावर पाळत ठेवायला घेतलेलं ऑफिस आता तो संभाळतोय..इतकं मोठं ऑफिस सोडून जर तो त्या ऑफिसला येतो याचा अर्थ काय ग?मला वाटत आहे त्याचीच साथ आहे या उमकांतला..
नूतन : तिला दोन क्षण काही सुचलच नाही की आता काय उत्तर द्याव ?काय बोलावे ..ती विचार करत होती स्वतःशीच बोलत होती ..म्हणजे अविनाश ?? अविनाशनेच पप्पांना मारलंय का ?? तो माझ्यापण जीवावर उठलाय काय ??तिला तो हॉटेल मधला त्यांचा प्रणय प्रसंग आठवत होता ..त्याचे नेहमी खूप प्रेमाने तिच्याकडे बघणारे डोळे…तिच्यासाठीची काळजी , प्रेम …म्हणजे …म्हणजे ते सगळं खोट होत ??मी अशी कशी फसले याला ..मग नूतन एकदम जोरात बोलली आग आई ज्या दिवशी आम्ही भेटलो त्याच तर दिवशी पापांचा पण खून झाला …मग यात पण काही कनेक्शन असेल काय ग ?
तीने मेघनाचे दोन्ही हात हातात घेतले ..खूप घट्ट पकडून त्यावर डोकं ठेवलं  …आणि ती खूप जोर जोरात रडू लागली…आई मी चुकले ग …माझी पारख चुकली …घात झाला आपला ..धोका केला ग माझ्या कर्माने माझ्यासोबत …व्यवसायात मी बरोबर पारख करते ..कोणासोबत डील करायची कोणाशी नाही …पप्पांना खूप अभिमान वाटायचा माझा यामुळे …पण आज माझ्या आयुश्यातला महत्वाचा निर्णय मी चुकले ग …माझ्यामुळेच पप्पाचा पण जीव गेला ग …
इतक्यात मागे जोरजोरात टाळ्यांचा आवाज आला …नूतनने मागे दचकून पाहिले तर भीमा टाळ्या वाजवत होता …आणि तिने मेघनाकडे पाहिलं तर ती पण खूप विचित्र हसत होती ...इतक्यात तिथे संजू आला तो पण हसू लागला …नूतन पुरती गोंधळली होती इतक्या टेन्शन मध्ये हे सगळे असे का हसतायेत?
नूतन : वेड लागलय काय तुम्हाला सगळ्यांना ?असे का मूर्खा सारखे हसता ? टाळ्या वाजवताय ? मी नक्कीच काही विनोद केला नाहीये …
इतक्यात संजू बोलला : अग ता___इ आता ते तुला जमणार पण नाही …कारण …कारण खरा जोक तुझा झालाय …आणि तो आजून जास्त जोरात हसू लागला 
नूतन : काय चाललय हे सगळं मला कोणी नीट सांगेल का ?
मेघना : हो सांगते की ..सगळं अगदी नीट आणि सविस्तर …
नूतन : अग आई तू इतकावेळ मला इतकं काही सांगितलंस …बाबा गेलेत ..इतकं काही झालय ..तू ,संजू आणि भीमा कसे हसू शकतात ?आग काय प्रकार आहे हा ?
संजू : आग ताई सगळं नेहमी तुलाच कस ग मिळेल ? हा ?ऑफिस तुझं..पप्पा तुझे..हुशार तू..लाडकी तूच …आणि आम्ही कोण ग ? पप्पा नेहमी कोणाशी बोलणार? तुझ्याशी ..प्रथम काळजी कोणाची? तुझी …म्हणजे आम्ही कोणीच नाही काय ग ?अग लहान नाही मी आता …सगळं समजत मला …तू पप्पांची मुलगी नसून पण त्यांच्यासाठी तू त्यांची सर्वेसर्वा होतीस…आम्ही आजारी पडलो तर ते कधीच घरी धावत यायचे नाही ..पण तुला काही जरी झालं की लगेच धावत पळत घरी यायचे …कधी फोन जरी केला घरी… आम्ही कोणीही उचलला तर बोलावं ना आमच्याशी …पण नाही त्यांना आधी नूतन हवी असायची फोन वर 
नूतन :अरे बाळा काय झालंय तुला आज ? तू का अस बोलतोय ..माझा जीव आहेस रे तू आणि पप्पांच पण सगळ्यांवरच खूप प्रेम होतं रे …मी तुमच्यात मोठी होते म्हणून जबाबदारी टाकायचे माझ्यावर इतकच …संजू कुठून आलं रे इतकं विष तुझ्या डोक्यात माझ्या बद्द्लच ? बोलना कुठून आलं ?मी तर खूप जीव लावलारे बाळा तुला …आज तुझं अस बोलणं सहन होत नाहीये रे मला ..आपल्याला पप्पांच्या खुन्याचा शोध लावायचाय बर झालं तू आता इतका मोठा झाला आहेस…आपण मिळुन शोधून काढुया त्याला …
संजू : अग अस कधी होत का ?चोरच चोराला पकडेल ??
नूतन : म्हणजे?मला नाही समजलं ?
संजू : बोला भीमा बाबा तुम्हीच बोला 
नूतन : हे काय भीमा बाबा??हे काय नवीन …भीमा आहे तो आपल्या इथला नोकर 
संजू : हो तुला काय ग... जमल तर सगळ्यांनाच नोकर बनवशील तू ..पण माझे वडील आहेत ते 
नूतन : काय??अरे अस काहीही वेड्यासारखा बोलू नकोस ..आई काय बोलतोय हा ?
मेघना : हो बरोबर बोलतोय तो ..तुझा बाप कितीजरी चांगला माणूस होता तरीपण तसा तो मला पूर्ण सुख देण्यात समर्थ नव्हता ..त्यांना वाटायचं ते मला सगळं सुख देतायेत …मला त्यांना हे दाखवून नव्हतं द्यायचं की ते मला पूर्ण सुख देत नाहीये …मग मी खूप समाधानी आहे असच दाखवत होते …पण मी खूप बैचेन व्हायचे ..अस वाटायचं का मी याच्याशी लग्न केलं?स्वतःचं पायावर धोंडा पाडून घेतला एक फायदा होता फक्त।   तो म्हणजे खूप धनाढ्य आहे हा ..बघू यावर पण उपाय मिळेलच असा मी विचार केला …खूप मन मारत जगत होते मी ..अशातच आनंदराव भीमाला घेऊन आले आपल्या घरी ..त्याच पिळदार शरीर पाहून मी वेडीच झाले …तो पण माझ्याकडे एकटक बघत होता …त्याच्या डोळ्यात मला माझ्या बद्दल तेच दिसलं जे मला अपेक्षित होत …मी खूप खुश झाले होते त्याला पाहून….
भीमा आपल्या घरीच राहू लागला...,घरातली काम करू लागला …तो खूपच हुशार होता त्यामुळे सगळी काम पटपट शिकला ..त्याने घरात सर्वांचा विश्वास जिंकला ..नंतर अस झालं की त्याच्याशिवाय कोणाचं पान पण हलत नसे …आधी तर आमची दोघांची पण हिम्मत झाली नाही जवळ येण्याची …पण एक दिवस घरी कोणीच नव्हतं आणि भीमा माझ्या खोलीत आला …
भीमा : नमस्ते
मेघना : एकदम दचकून ..अरे तू होय ..काय भीमा काही काम होत का ?
भीमा : काय काम आहे ते तुम्हास्नी बी ठाव हाय 
मेघना : वेड्याच सोंग घेऊन – म्हणजे मला नाही माहीत 
भीमा : मी जवा पहिल्या दिशी आलो तव्हांच तुमच्या डोळ्यांनी मला समद सांगितलं व्हत आता कशापायी लाजताय ?
तो एकदम डोळे रोखून पाहत होता ..अस वाटत होतं कोणत्याही क्षणी झपटेल माझ्यावर …तशी मी खूशच होते …कस असत लेडीजने पुढाकार घेण बरोबर नाही दिसत ना 
मेघना :  भीमा काय बडबडतोय…समजतंय का तुझं तुला तरी …जा माझ्या खोलीतून बाहेर चालता हो
भीमा : हे बघा घरी कुणिबी न्हाई ..आणि आजून 3-4,तास तरी येत न्हाई …का उगाच वेळ दवडताय ?या की जवळ ..याच मोक्याची वाट बघित होतो अल्यापासन …आज 3 महिन झालं बघा येऊन ..,आज जर न्हाई बोललात तर परत कधी बी जवळ येणार न्हाई मी …तसा लई मानाचा हाय …एकदा हो तर हो ..आणि न्हाय तर न्हाय …बघा आता काय ते तुमीच ठरवा…
मी खूप चक्रावले होते ..एक तर ते विश्वासचा फिलिंगस नसणारा स्पर्श..त्यात कधीच सुख नाही मिळालेलं …आणि आज हा इतका दमदार पुरुष मला जवळ ये बोलत आहे ..नाही कस बोलावं ?एक मूलपण होऊ शकलं नव्हतं आम्हाला आजून 7 महिने होऊन गेले होते लग्नाला…मला नाही राहवलं ..मी पळतच जाऊन त्याला घट्ट मिठी मारली …त्या दिसपासून जेव्हा मोका मिळे आम्ही सोडत नव्हतो . थोड्याच दिवसात मी गरोदर आहे हे समजलं..घरी सगळे खुश झाले…विश्वसपन खूप खुश होता …,आणि संजू छोट्याशा पावलांनी आपल्या घरी आला …मला आणि भीमाला एकमेकांशिवाय करमत नव्हतं मग मी विश्वसना उकसावल की आपण दुसरा business करू दुसरीकडे जाऊ ..पण घरच्यांनी नाही म्हटलं आणि आमचा प्लॅन फसला ..खुप चिडचिड होत होती आम्हा दोघांची ..बघता बघता संजू 4 वर्षांचा झाला मी मध्ये मधे विश्वसला बोलतच होते तुम्ही इतके शिकलात काय या गावात राहण्यासाठी ?काय उपयोग तरी आहेका या शिक्षणाचा ?तुम्ही खूप हुशार आहात ..कोणताही बिसनेस तुम्ही तुमच्या हिंमतीवर सुरू कराल ..मला तर खूप विश्वास आहे तुमच्या कर्तबगारीवर ..तसा तर तो हुशार होताच याच तर हुषारीवर भाळले होते ना मी…खरतर माझं खुप प्रेम होतं विश्वास वर ..फक्त या एका सुखासाठी भीमाला जवळ केलं होतं मी ..
शेवटी तो दिवस आला आणि एकदिवस रागाच्या भरात मी,तू , विश्वास ,संजू आणि भीमा निघालो..,आता दिवसभर मी आणि भीमा घरीच असायचो …विश्वासने खूप कष्टाने पूर्ण व्यवसायाची घडी बसवली …खरतर मी तयार नव्हते तुला आणायला …पण तू आली तरच रुपमती आणि अनंतराव भीमाला सोडतील हे माहीत होतं ..म्हणून घेऊन आले तुला … मला आता मुलगीच हवी होती ..बरेच वेळा मला दिवस राहिले आणि मी भीमासोबत जाऊन चेक करायचे मुलगा असेल तर अबोरशन असेच बरेच वर्ष चालले होते सगळं ...भीमा खूप चिडत होता आग तू वेडी हाय का ?कशापायी जीव घेतीस ग या बारक्या जीवाचा ? आणि मला पुन्हा दिवस राहिले यावेळी मुलगी होती मी खूप खुश होते खरतर यावेळी मुलगा असता तरी डॉक्टरांनीच माझं अबोरशन केलं नसत ..सतत गर्भ पडल्याने पिशवी खूप खराब झाली होती माझी …हे बाळ पण होऊ देऊ नका असच बोलत होते ते ..पण मला मुलगी हवीच होती …नाहीतर विश्वासने सगळं तुझ्याच नारड्यात घातलं असत …खूप जास्त जीवावर खेळून मी राजुल ला जन्म दिला …तरीपण विश्वासला तूच दिसायचीस …मी हळू हळू संजुला भडकवू लागले ..बघ त्यांना नुसती नूतनच लागते..तुम्ही पण मूलना त्यांची …संजू पण आता तुझ्या विरोधात जात होता पण तुला दाखवून न देता..शेवटी तो मुलगा माझाच होता ना ..एक दिवस भीमा आला आणि मला बोलला मी गावाकडे जातोय मला 5-6 महिन्यांची सुट्टी हवीय…मी खूप चिडले त्याच्यावर ..
मेघना :का हवी आहे इतकी मोठी सुट्टी तुला ?जाऊन नेहमी सारखा एक दोन आठवड्यात ये 
भीमा : नाही यावेळी न्हाय जमायचं लगीच यायला 
मेघना ; का ?
भीमा : लागिन हाय माझं ..घरच्यांनी पोरगी बघितलीये …
मेघना : काय ? तुला मला असं सांगताना काही वाटत नाही का?
भीमा : आवो तुम्ही लई मोठ्या हायेत माझ्यापेक्षा ..वयान ..मानानं..तुमचं माझं कास हुनार …आयुषभर तर आपण सोबत न्हाई ना राहू शकत 
मेघना : आता तुला माझं वय दिसतंय ? आणि का नाही राहू शकत ?
भीमा : माझा वंश चालवाया माझं पोर नको का ? 
मेघना : अरे संजू आणि राजुल आहेत की ..
भीमा : पर त्यांना संमदे तुमचं आन साहेबांचं पोर बोलत्यात ..म्या तर तिथं कुठबी न्हाई इतके वरीस हायच की मी तुमच्या संग …माझं नाव सावताच्या नावाम्होर लावणार माझं पोर ..माझी बायकू पायजे ना वो मला ..
मेघना : अरे तू असा विचार का करतोयस आज .? मी पण तुझीच आहे रे ..ठीक आहे थांब तुला विश्वास नाही ना माझ्यावर ?संजू ए संजू इकडे ये बाळ …हे बघ तुला मला काही महत्वाचं आणि सिक्रेट सांगायचं आहे ..पण मला प्रॉमिस कर तू कोणाला सांगणार नाहीस …तुला विश्वास पप्पा नाहीच आवडत खरंय ना ?
संजू : हो पण त्याच काय झालं ?आणि कसलं सीक्रेट?बोल काय ते
मेघना : तुझा खरा बाप भीमा आहे..तुझा बाबा आहे हा 
संजू : काय ?काहीही नको बोलुस आई 
मेघना : अरे खरच ..तुझा बाप तुमच्यासमोर माझ्याशी छान वागतो…पण एकांतात खूप त्रास देतो ..मारतो …आणि मला खूप वेळा यातून भीमाने वाचवलं …त्यामुळे मी त्याचा प्रेमात पडले आणि तुझा जन्म झाला.आणि आता ते परत खूप त्रास देतायेत मला …मी त्यांना या जगातून कायमचंच वर पाठवणार आहे ..त्यात मला तुझी सोबत हवी आहे ..देशील ना 
संजू : थोडा घाबरला …गोंधळला आणि हो बोलला 
मेघना : बर जा बाळा संजू झोप तू आता ...भीमा ..तुला आजूनपन गावाला जायचं आहे का लग्न करण्यासाठी .???
भीमा : माझ्या जवळ आला आणि अत्यंत आवेगाने मिठी मारली मला …नाही ग कधीच न्हाई जाणार आता …पर हे समद करायचं कस?
मेघना : अरे वाह आज पहिल्यांदाच तुम्ही च तू ?छान वाटलं …हे बघ तासापन तो उमाकांत त्यांच्या मागे लागलाय ..सध्या कोम्यात आहे …पण तो कधीपण शुद्धीत येऊ शकतो ..तू गावाला जातोय सांगून त्या हॉस्पिटलमध्ये जा ..तिथे काही आपली मानस तयार कर..तो कोम्यातून बाहेर यायचे किती चान्स आहेत ते बघ …आणि तो शुद्धीवर आला की प्रथम आपल्यालाच बातमी मिळायला हवी याची व्यवस्था कर 
भीमा : आग काय चालू हाय ग डोसक्यात तुझ्या ?तो शुद्धीवर येण्याचा आणि साहेबांच्या मरणाचा काय संबंध?
मेघना : हे बघ एक तर तो मारेल यांना …आणि जर त्याच मन बदललं तर आपण मारू आणि त्याच नाव पुढं करू ..काय बोलतोस 
भीमा :बापरे लाईच भारी डोकं चलतया तुमचं …हा पर हे समद व्हायला लई येळ लागलं ना ?तव्हर म्या असाच का ?
मेघना :असाच का रे ?आहे ना मी इथे तुझ्यासाठी …फक्त नावासाठी थांब जरा 
दुसऱ्या दिवशीच भीमा सुट्टी काढून तिकडे गेला ..त्याने काही नर्स ,डॉक्टर्स गाठले आणि त्यांना पैसे देऊन आमच्या बाजूने केलं …डॉक्टरांनी सांगितल की होईल तो बरा …चांगली improvement आहे …
त्यादिवशी त्यांना जो फोन आला तो आमच्या माणसाने केला ..त्या आधी 2 दिवस तो शुध्दीवर आला होता …मी त्याला फोन केला आणि माझा प्लॅन सांगितला…तो तयार झाला 
नूतन :म्हणजे तुम्हीच मारल ना पप्पांना ?का ?आग तुला नव्हतं राहायचं त्यांच्या सोबत तर तू वेगळं व्हायचं होतंस ना ग ..
मेघना : हो म्हणजे सगळी इस्टेट तुला हो ना ? 
नूतन : शी ..किती ग वाईट विचार आहेत तुझे आई …आता आई म्हणायची पण लाज वाटायला लागलीये तुला …आग तू जर पप्पांना बोलली असतीस ना तू सुखी नाहीस ..संतुष्ट नाहीस त्यांच्यासोबत तर तुला लगेच डीवर्स देऊन मोकळं केलं असत पप्पांनी ..आणि तुझ्या या लवर भीमाला पण मार्गाला लावलं असत …इतक्या लोकांचं भलं केलय त्यांनी …तुझ्यावर पण उपकार केले असते …बर आता बाबांना कस मारलस ते पण सांगून टाक..आणि हा उमाकांत कुठे आहे ..माझे बाबा मला हेच सांगत असावे तुझ्यापासून मला धोका आहे …बोलकी बाई सांग आता कस मारलस पप्पांना?
मेघना : ए जीभ आवर तुझी … जास्त चरचर करू नकोस ..तुझ्या बापाला मी नाही मारलं ..आजून आमचा प्लॅन रेडी नव्हता …आधी फक्त त्यांना तिकडे पाठवायचं ठरलं त्यासाठी त्यांना कॉल करून सांगितलं की उमाकांत शुद्धीत आलाय आणि तुम्हाला आणि नुतनला जीवाला धोका आहे …
आता ते तिकडे पोहोचले आणि आमची पुढची हालचाल होण्यापूर्वीच ते गायब झाले ..त्या दिवशी रात्री खूप पाऊस पडला ..खरतर त्याच दिवशी आम्ही विश्वासला मारायचा प्लॅन केला होता ..पण आम्ही पावसामुळे जाऊ शकलो नाही …आम्ही  काही करायच्या आधीच मेला तो आणि मेघना वेड्यासारखी जोर जोरात हसू लागली …नंतर आम्ही उमकांतला शोधायचा खूप प्रयत्न केला पण तो नाही सापडला …
नूतन :तुम्ही उमकांतला सांगितलं होतं ना त्याला मारायला मग त्यानेच मारलं असणार ….
मेघना :नाही आम्ही गेल्यावर मग उमाकांत मारणार होता ..पण सगळा प्लॅन फसला बघ 
इकडे सर्व बोलत असतानाच नूतनने कोणाला तरी text केला होता …शिवाय आईच सगळं बोलणं रेकॉर्ड केलं होतं मोबाइल मध्ये ..कोणाला आणि काय मसग केला तिने ??
पण ते कोणाच्याच लक्षात आलं नाही …
मेघना बोलत असतानाच जोर जोरात टाळ्या ऐकू आल्या ..तिने मागे पाहिलं तर विश्वास ???नाही नाही उमाकांत??कोण होता हा ?..ती व्यक्ती :वाह वाह खूप छान  . मस्त मस्त ..अग खूपच छान प्लॅन होता तुमचा …
मेघना : उमाकांत ?उमाकांतच ना तू ? का आलास ?बोल ?तू काम मस्त केलंस पण …शिवाय कोणाचं नाव पण नाही आलं मध्ये …welldone …
ती व्यक्ती : जोर जोरात हसत …वाह आता नवऱ्याला पण नाही ओळखत का ग तू ?आग तुझा भीमा तुझ्यासोबत होता ते ठीक पण माझा पण कुश माझ्या सोबत होता आणि त्याच्यामुळेच वाचलो मे।..
मेघना : म्हणजे तुम्ही ?तुम्ही उमाकांत नाही ??आणि तुम्ही विश्वास आहात? हे बघ उमाकांत असले नसते उद्योग करू नकोस ..के ते नीट सांग …उगाच मोहाला बळी पडू नकोस …हे बघ तुला तुझा ठरलेला हिस्सा मिळेलच तेव्हा तू त्याची काळजी करू नकोस …उगीच माझा नवरा बनू नको…बस झालं बाई...,झाली एकदाची सुटका ..आता मी भीमा माझी पोर सुखाने राहू इथे…भीमा याला याचा हिस्सा दे बर 
भीमा पुढे आला हातात सुरा घेऊन 
विश्वास :काय रे लाज नाही वाटली तुला …मालकाशी गद्दारी केलीस तू? माझ्या बायको सोबत ?कुठे फेडशील ही पाप
भीमाच्या हातून सुरा गळून पडला …तो त्याच्या पाय पकडून रडू लागला …माफ करा साहेब …खूप मोठी चूक झाली हो आमची …क्षमा करा…आणि तो बाजूला जाऊन डोक्याला हात लावून बसला …
मेघना :अरे भीमा तुला कसा विश्वास बसला की हा विश्वास आहे ..अरे वेड्या उठ घाबरू नकोस …
भीमा : हे मालकच आहेत ..तुम्ही त्यांची बायको असून बी वळखना ?नीट बघा मालकच हायेत …,तिने जवळ जाऊन पाहिलं तर …खरच तो विश्वासच होता ...
मेघना एकदम घाबरली ..कस शक्य आहे हे?नाही तुमची तर बॉडी पण जाळली आम्ही ..अंत्यसंस्कार केले तुंमचे …मग आम्ही चिता कोणाची जाळली?उमाकांतची??पण तो कसा मेला ?विश्वास झाली चूक माझी …,पण आता मला वेड लागेल माझी..खूप मोठी चूक झाली..मला माफ करा…झालं ते विसरून जा या सांगळ्यात तुम्ही वचलात हे महत्त्वाचं …पण मग उमाकांतच मेला बरोबर ना 
इतक्यात मागून आवाज आला तिला …माझ्या सो कॉल वहिनी …मला इतक्या easily मारणं सोपं नाही …
या धक्क्याने मात्र ती हादरली आणि बेशुद्ध  पडली
संजू चांगलाच घाबरला होता विश्वासला समोर जिवंत पाहून …त्यात मेघना बेशुद्ध झाल्यावर तर खूपच घाबरला …त्याने पळत जाऊन पाणी आणलं आणि तिच्या तोंडावर मारलं .. मेघना शुध्दीवर आली ..तिला हाताला धरून संजूने खुर्चीवर बसवलं …तिला आता शांत बसलेलं पाहून उमाकांत पुढे आला …काय ग बाई आता बरी आहेस ना तू ? नाही म्हणजे पुढ्चा धक्का बसणार आहे तुला तो सहन करता आला पाहिजे ना …ऐक आता
उमाकांत : तू या शहाण्या भीमाला पाठवलस हॉस्पिटलमध्ये माझी परिस्थिती काय आहे ते बघण्यासाठी …तुझी मोठी चूक झाली …तू माझ्या भावाला इतकी वर्ष सोबत राहूनपन नाही ओळ्खलस ग..अग ते हॉस्पिटल त्याच्याच ट्रस्ट च आहे …तू जी नर्स ,डॉक्टर हाताशी धरले ना ते सगळे विश्वासच्या जिवाभावाचे …अग हे सगळे जण आज त्याच्याच जीवावर जगतायेत ..ती जी नर्स आहे ना तिच्या वडिलांना हार्ट अटॅक आला होता ..बिचारीची परिस्थिती खूप खराब होती तीच शिक्षण चालू होतं …विश्वासराव तिला ओळखत पण नव्हते ..पण जेव्हा तिच्या वडिलांना तीने इलाजासाठी आणलं तेव्हा ती विश्वास ला भेटली …आणि सर्व परिस्थिती सांगितली …माझ्या या भोळ्या भावाने तिला नर्सिंग साठी फ्री मध्ये ऍडमिशन दिली …तिच्या वडिलांचा पूर्ण ईलाज एक रुपया न घेता केला …आता तूच सांग तुझ्या एकलाख रूपड्यांसाठी ती याला मरू देईल का ग ?माझ्यासारखा दगड जर त्याच्यापुढे नमूं शकतो तर ती काय ग?तिने ते पैसे घेतले आणि जाऊन सिनियर डॉक्टर अबनावे कडे गेली ..तिला समजलं त्याला पण पैसे दिलेत या कामासाठी…त्यांनी पैसे फक्त यासाठी घेतले की जर आपण पैसे घेतले नाही तरी ते दुसऱ्याला पकडतील…आणि त्याने साहेबांचा घात केला तर …आता त्यांना अस वाटेल की आपण करतोय काम …मग ते इतर कोणाला नाही भेटणार …
संध्याकाळी त्यांच्या लक्षात आलं की आपणच नाही आजून खूप जणांना पैसे दिलेत …मग मात्र त्यांना राहवलं नाही आणि त्यांनी विश्वास ला फोन केला..बिचारा विश्वास एकदम तुटला आतून …त्याला सहनच झालं नाही …आपली बायको आपल्याला मारणार आहे …विश्वासने त्यांना सांगितले जेव्हा उमाकांत शुध्दीवर येईल तेव्हा पाहिलं मला कळवा मग बघू आपण काय ते …
थोडक्यात काय तर तुम्ही चुकीच्या जागी शेण खाल्लत…त्यानंतर दोनच दिवसात मी शुद्धीवर आलो …तीच नर्स माझ्याजवळ उभी होती…मला काहीच समजत नव्हतं ना आठवत होत …मी शांत पडून होतो …नर्स ने मला पाहिलं आणि पळत जाऊन डॉक्टरांना बोलावलं …डॉक्टर पण शॉक होते …अस कस होऊ शकत ??पण हा एक चमत्कार होता म्हणायला हरकत नाही ..मी मला वाटत 7-8 वर्ष तरी कोम्यात होतो आणि मी अचानक शुद्धीवर आलो जेव्हा माझ्या भावाला दगा फटका होणार होता …हीच तर माझ्या भावाची पुण्याई ग…या देवमानसाला तू ओळखलं नाहीस…
बर मी शुद्धीवर आलो तेव्हा मला काही आठवत नव्हतं …त्या नर्सने मला सर्व घटना सांगितली …शिवाय विश्वास किती मनलाऊन माझी काळजी घेतो हे पण सांगितल…मला हळू हळू सगळं आठवू लागलं ..पण मला बोलता येत नव्हतं नीट …म्हणून मी शांत होतो..अंगात खूप अशक्तपणा होता ..दोन दिवसात मला बर वाटू लागलं …थोडं त्राण आल…तोपर्यंत मी शुध्दीवर आलोय हे विश्वास ला सांगितलं गेलं होतं…मग तिथेच त्यांचा प्लॅन तयार झाला …मला यातलं काहीही माहिती नव्हत ..आज माझं मन मला खुप शिव्या देऊ लागला …अरे किती मोठा गुन्हा करत होतो मी ..माझ्या भावाला मारायला निघालो होतो आणि तेव्हाच मरणाच्या दारात पोहोचलो होतो …तरीपण त्याने मला वाचवण्यासाठी इतके वर्ष प्रयत्न केले …शिवाय मला जीव पण लावतो इतका …आता मला त्याला भेटून माफी मागायलाच हवी..
मी त्या नर्स जवळ गेलो आणि तिला माझी मनोकामना बोलून दाखवली …ती खूप खुश झाली …तिने विश्वास ला फोन केला .. मी प्रथमच त्याच्याशी नीट बोलणार होतो  ..थोडा संकोच करत मी फोन घेतला …
उमाकांत: विश्वास..माफ कर मला …तुला ओळखू नाही शकलो.. प्लीज जे झालं ते सगळं विसरून जा … मला माफ कर रे .. मी तुझ्या जीवावर उठलो होतो आणि तूच माझा जीव वाचवलास…आणि हो मला भेटायच आहे तुला …please नाही बोलू नकोस .. माझ्या भावा please नाही नको बोलुस …तुझ्यावर ती मेघना कट रचतीये अस समजलं मला इथे ..याना मी अस काही करू नाही देणार ..पण साल्याना जन्माची अद्दल घडवूया आपण विश्वास बिचारा ढसाढसा रडला फोन वर …त्याने नर्सला फोन दयायला सांगितला…
विश्वास:आता तुम्ही कळवा उमाकांत शुध्दीवर आलाय …आणि जेव्हा ते त्याच्याशी बोलायचं बोलतील तेव्हा बोलुद्या …बघू काय आहे डोक्यात त्यांच्या …आणि उमाकांत तुझं माझ्यावरच प्रेम त्यांना जरापन समजता कामा नये …ते जे बोलतील त्यासाठी तयार हो …पुढे बघू काय करायचं ते … 
विश्वास खूप दुःखी झाला होता ..पण त्याच बरोबर त्याला आनंद होता की मी त्याच्यासोबत होतो…जस विश्वासला अपेक्षित होत तुमचा फोन आलाच …आणि तुम्हाला मदत करायला मी तयार झालो …तुमच्या बोलण्याप्रमाणे  आम्ही विश्वासला फोन केला…तेव्हा तो ऑफिस मध्ये होता …तो तडक ऑफिस मधून निघाला …त्याला बीपी चा त्रास चालू झाला …आणि तो लिफ्ट मध्येच चक्कर येऊन पडला ..त्याच लिफ्टमध्ये अविनाश एकटाच होता …त्याने त्याला उचललं स्वतःच्या गाडीतून डॉक्टरांकडे घेऊन गेला …डॉक्टरांनी औषध दिल …पण खूप काळजी घ्या असे सांगितले …विश्वासला घेऊन तो त्याच्या घरी गेला …औषधे दिली …विश्वास उठला की त्याला चक्कर येत होती …अविनाशने त्यांना आराम कारायला सांगितले …विश्वास जवळजवळ 3 तासांनी शुद्धीवर आला …
विश्वास : कोण तुम्ही?मी कुठे आहे?हो तुम्ही लिफ्ट मधे होता ना माझ्यासोबत ?कुठे आणलंय तुम्ही मला ?मी ओळखत नाही तुम्हाला …
अविनाश : अहो काका दमाने जरा …अहो मी अविनाश भालेकर ..माझं ऑफिस तुमच्या समोरच आहे.
विश्वास : म्हणजे रामरावचा ..???
अविनाश : हो मी मुलगा त्यांचा 
विश्वास : मी आत्ता कुठे आहे?आणि इथे कसा आलो?
अविनाश : तुम्ही लिफ्टमध्ये चककर येऊन पडले होतात …मी तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो …तुमचं बीपी खूप हाय आहे …काही टेन्शन आहे का काका ?मी काही करू शकतो का?
विश्वास : अरे तू मला ओळ्खतोस का?
अविनाश : हो काका 
विश्वास : अरे तू नक्कीच ओळखत नाही मला ..मी आणि रामराव एजमेकांचे शत्रू होतो …अरे त्या चकमकीतच त्याचा मृत्यू झाला …
अविनाश : हो माहीत आहे काका मला 
विश्वास :अरे ..तरी तू माझा जीव वाचवलास ?कस शक्य आहे ?आणि हे तुझं घर आहे का ?आता काय तू इथे मला दगा फटका करणार आहेस का ?कर बाबा कर ..जेव्हा आपलेच सोडत नाहीत ..तुला तर हक्क आहे …तुझ्या वडिलांचा मृत्यू झाला मझ्यामुळे …उगाच आपल्याच माणसाच्या हातून मारण्यापेक्षा तुझ्यासारख्या शत्रूकडून मरण परवडल …
अविनाश : अहो काका ..काहीपण काय बोलताय …ते जे झालं त्यात माझ्या वडिलांचीच चूक होती …,मी भारतात नव्हतोच ..माझं सगळं शिक्षण बाहेर देशात झालय काका …पण माझी ताई इथेच होती ना ..तिने मला सगळ काही सांगितलं …आणि यात you are not guilty at all…I respect you uncle …रिअली प्लीज misunderstood नका करू …
मी भारतात आल्यावर प्रथम आमच्या मुख्य ऑफिसात गेलो ..तिथे गेल्यावर लक्षात आलं आमचे आबा खूप वाईट धंदे करत होते …मला हे सहन नाही झालं …मग मी ते सगळे उद्योग बंद केले …काही दिवसांनी मला तुमच्या जवळच ऑफिस पण समजलं ..सहज म्हणून मी त्या ऑफिसला आलो …आणि ऑफिसच्या पार्किंगमध्ये तुम्ही आणि नुतनला पाहिलं …काका राग नका मानू …पण तिला प्रथम पाहताच तिच्या प्रेमात पडलो हो मी …लव ऍट फर्स्ट साईट काय असत ते अनुभवलं मी त्या दिवशी …आणि मग फक्त तिला पाहता यावं म्हणून रोज या ऑफिसला येऊन बसतो ...मला ती मनापासून आवडते काका …
विश्वास ला तर स्वप्नात असल्यासारखं वाटत होतं ..जे चालल होत ते अगदीच अनपेक्षित होत …इतका स्मार्ट ,उच्च शिक्षित मुलगा ,सगळी दुष्मनी विसरला आहे …नुतनला हा अगदी साजेसा आहे …अगदी लक्ष्मी नारायणाची जोडीच …ते डोळ्यासमोर त्यांना दोघांना एकत्र पाहू लागले मनातल्या मनात…
विश्वास : चला खूप काही वाईट वाईट ऐकत होतो …आज एक छान बातमी मिळाली मला …पोरा सुखी राहा रे …माझ्या पोरीची काळजी घे रे …माझं काही खर नाही बघ …
अविनाश :का ..काका अस वाईट बोलताय ?
विश्वास :काय सांगू तुला बाळा …खूप वाईट असतो बघ हा पैसा …चांगली चांगली घर,नाती  मोडतो बघ 
मी पण सध्या अशाच परिस्थिती मध्ये आहे
अविनाश :म्हणजे मी नाही समजलो 
विश्वास :अरे समजून तरी तू काय करणार ?
अविनाश :जर तुम्हाला मी खरच जावई म्हणून पसंत असेल आणि तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर प्लीज सांगा मला ..आपण यातून मार्ग काढू …
विश्वास ने सर्व घटना त्याला सांगितली…
अविनाश :ओहह nooo …किती भयंकर आहे हे सगळं …काळजी करू नका ..मी आहे तुमच्या सोबत 
आणि मग हा सगळा प्लॅन त्याचाच
तर प्लॅन असा होता की …मला कॉल येईल की उमाकांत शुद्धीवर आला आहे आणि मी ताबडतोब निघायचं …हॉस्पिटलमध्ये जायचं मी गेलो …त्यापूर्वीच तिथून उमाकांत गायब झालेला …मग आम्ही एका गरीब शेतकऱ्याची मदत घेतली.. .खूप मागे. बिचाऱ्याच शेत कर्जात अडकलेलं होत …ते आम्ही सोडवून दिल होत…बिचारा खूप कृतकृत्य झाला होता …बोलला होता साहेब माझ्या योग्य काही सेवा असेल तर नक्की आठवण करा माझी …मी कधीच नाही म्हणणार नाही …त्यालाच तर माझा मोबाईल आणि पैसे घेऊन आम्ही नूतनकडे पाठवलं होत …आम्हाला घरी यात कोण कोण सामील आहे माहीत नव्हतं .. आणि माझी नूतन तर सगळ्यांनाच जीव लावते …
आता नुतनला खरी प्रोटेक्शन ची गरज होती …आणि त्या रात्री पावसाने साथ दिली आम्हाला . .म्हणून त्याच दिवशी मुहूर्त साधून अविनाशने नुतनला प्रपोज केले …तो आता सतत तिच्या सोबत असण खूप गरजेचं होतं …माझी नूतन बिचारी तुमच्यामध्ये अडकणार होती ना ..सांभाळायला हवं होतं तिला …त्याच नूतनवर अतोनात प्रेम असल्यामुळे ती त्याला नाही बोलूच शकली नाही …आणि पावसामुळे ती घरी जाऊ शकली नाही …मग आम्ही ठरल्याप्रमाणे दाजीबा म्हणजे तो शेतकरी…त्याला ऑफिस ला पाठवले …संशयाला कुठे जागाच नव्हती कोणाला …हॉस्पिटलमध्ये जेव्हा तुम्ही माझी डेथ बॉडी घ्यायला आले तेव्हा मी फक्त 5 मिनिट तिथे शवागरात झोपलो होतो …तिथला डॉक्टर अमोल गुप्ते त्याच सगळं शिक्षण माझ्या संस्थेनी करवल आणि त्याला तिथे कामाला पण लावलं होत …त्याने नियमांच्या पुढे जाऊन मला मदत केली …एक बेवारस शव त्यांनी पूर्णपणे पॅक करून दिल ..की चेहरा दिसू नये …त्याचा बांधा माझ्यासारखाच होता …तुम्ही तीच बॉडी घेऊन आलात आणि अंत्यसंस्कार केले…
आम्ही नुतनला पण काहीच सांगितल नाही …ती चुकून कोणालाही बोलेल ..ती खूप तापट आहे …रागाच्या भरात घरी येऊन तुमच्यासोबत जर भांडली …तर तुम्ही तीच काय कराल ?? त्यामुळे नाहीच सांगितलं …आम्हाला तू आणि भीमा एक आहात माहीत होतं ..पण अजून कोण कोण आहे समजत नव्हतं ..
मला नूतनची खूप काळजी वाटत होती त्यामुळे मी रात्री तिच्या बेडरूम मधेच होतो ..जर काही दगा झाला तर तिला वाचवण्यासाठी…आपल्या या घराला मी खुप चोर दरवाजे बनवलेले आहेत ..शिवाय 2 आशा रूम आहेत की त्या लक्षातच येत नाहीत तिथे मी माझी सर्व व्यवस्था केली…आणि तिथेच राहिलो …त्या दिवशी रात्री नूतनने मला पाहिलं मी पटकन त्या रुममध्ये जाऊन लपलो ..तिला वाटलं माझं भूतच आहे.
ती अस्थीविसर्जन करायची कल्पना पण अविनाशचीच …खरतर त्याला या संजूचा खूप संशय येत होता …आणि त्याची पडताळणी करण्यासाठी तो एकटा हातात येन खूप गरजेचं होतं …आम्ही गाडीत अंत्यसंस्कार करण्यासाठी जात असताना संजू थोडाही दुःखी दिसत नव्हता …ना रडत होता …उलट त्याला भूक लागत होती …तो मस्त गेम खेळत होता मोबाईलवर …मध्ये मध्ये काही टेक्स्ट पाठवत होता कोणाला तरी …आता आम्हाला ते टेक्स्ट बघणं गरजेचं होत…त्यादिवशी पण मी त्यांच्या गाडीच्या मागेच होतो …मी वॉशरूम मध्ये जात असताना नूतनने मला पाहिलं …आणि बेशुद्ध झाली …खूप वाईट वाटलं मला …मग अविनाशनने नूतनतला उचलून गाडीत नेलं …आज संजुच्या बोलण्यात नेहमीप्रमाणे नूतनलाच प्रेम दिसत नव्हतं … मी त्याच हॉटेलमध्ये राहिलो…
दुपारी नूतन आणि संजू त्यांच्या रूम मध्ये असताना अविनाश त्यांच्या रूम मध्ये गेला खरतर संजूचा मोबाईल चेक करायला पण नूतनसमोर कस करणार …तर नूतनच अविनाशच्या रूम मध्ये गेली ..तेही बरच झालं …मी रूमच्या की होल मध्ये पाहिलं तर झोपेचं सोंग घेतलेला संजू उठला आणि मेघनाला कॉल केला…त्याने तिला सगळं सांगितलं ..कस आले ..काय खाल्लं …मग नूतन कशी बेशुद्ध झाली …अविनाशच्या रूम मध्ये गेलीये ती आता …आणि फोन ठेऊन तो बाहेर निघाला ..मी लगेच बाजूला लपलो तर तो अविनाशच्या रूम मध्ये …त्याने डोरबेल वाजवली…. नुतनला चल बोलला आणि घेऊन गेला .समोरची व्यक्ती काय बोलली काही समजलं नाही फोनवर …मग आम्ही ठरवलं आज रात्री नूतन अविनाश च्या रूम मध्ये राहील आणि ती जबाबदारी अविनाशची …रात्री जेवताना अविनाशने गुपचूप झोपेची गोळी संजुच्या भातात टाकली त्याला समजलं पण नाही …त्यामुळे रूम वर गेल्या गेल्या संजू गाढ झोपला …
हीच ती वेळ होती जेव्हा संजूचा मोबाईल चेक करता येणार होता …कदाचित आमचा संशय चुकीचा पण असू शकत होता …मुलगा असपन आईला संगणारच ना काय काय झालं ते …मग अविनाशने लादिगोडी लावून नुतनला त्याच्या रूम मध्ये बोलवलं …मी संजुच्या रूम मध्ये गेलो …त्याचा मोबाईल घेतला …आणि कॉल्स मेसेज चेक करायला सुरुवात केली …त्याचे काही कॉल भीमाला आणि काही मेघनाला…अरे हा भीमाला का कॉल करत असेल बर …
मग मी त्याचे टेक्स्ट बघायला सुरवात केली …
संजू :आई अग ही नूतन आणि तो अविनाश जास्तच जवळ येतायत …मला असं वाटत आहे तोंड काळ करणार ही बाई …त्या विश्वासला समजलं असत हे सगळं तर कसलं वाईट वाटलं असत ना ..हवा होता तो हे बघायला ..त्याची लाडकी लेक काय दिवे लवतीये ते बघायला 
मेघना : हो रे ..पण तिला हा चान्स पण त्याच्याच कामामुळे मिळालाय ना …आणि दोन हसरे ईमोजी..हे बघ मला सगळं सांगत रहा …विश्वास तर गेलाच आता या नूतनचा नंबर लावूया …तुमच्या हॉटेलचं नाव आणि पत्ता पाठव मला .. बघूया आजच काम तमाम करू तीच 
संजू बर आई पाठवतो
हे टेक्स्ट बघून माझ्या डोक्यात झिंझिण्याचं आल्या 
पुढचा टेक्स्ट संजूचा  भीमाला :बाबा आई बोलते आज या नुतनला उडवायचा …मग छान होईलना?सगळी संपत्ती आपलीच …आणि तुम्हींतर मला आजून जास्त जीव लावाल हो ना ?बाबा मला तुमची खूप आठवण येतीये …आणि मी आईला आणि तुम्हाला अड्रेस पाठवतो आजच निकाल लावून टाका या बायचा …
बापरे ..बिचारी माझी पोर किती जीव लावायची याला …आणि हा बघा 
पुढचा टेक्स्ट 
संजू : बाबा आई हा हॉटेलचा ऍड्रेस आणि पत्ता आहे …डिटेल्स दिलेले ..रूम नंबर 321 मी आणि नूतन इथेच आहोत …
मेघना :बर बाळा पुढे काय ते सांगते 
भीमा : पोरा आज रातच्याला तू 3 वाजता बाथरूम मध्ये जा हे लोक येतीन आणि त्या नुतनला ठार मरतील ..तू त्यांच्या समोर येऊ नगस ..येडी अस्त्यात ही लोक …आन मग ते गेल्यावर तू जोर जोरात वरडं …कुणीतरी मारलं ताईला मी नेमका बाथरूम मधी व्हतो …मंग तुझ्याव आळ न्हाई यायचा 
संजू : हो बाबा मी करतो तसच आता जेवायला जातोय खाली …जमलं तर करतो मेसेज …पण तुम्ही त्या माणसांना सांगा त्यांचं काम करायला ..
मी घामाने डबडबलो होतो …किती भयानक लोक आहेत हे …मी नूतनच्या जागेवर ब्लॅंकेट उशी लावून तीच झोपली आहे असा भास तयार केला …स्वतः तिथेच लपुन राहिलो बरोबर3ला 5 कमी असताना या संजुला बेड खाली लपवला…ती लोक आली ..आणि त्या उशीला मारून गेली …मी त्यात सॉस घालून ठेवला होता …त्यामुळे त्यांना वाटलं काम झालं …
आज रात्री नुतनला इकडे येऊच देऊ नकोस अस मी अविनाशला टेक्स्ट केलं होतं …सकाळी तुमच्या रूमवर आलो आणि संजूचा मोबाईल अविनाशला देऊन मी निघालो …नूतन झोपलेलीच होती …थोड्यावेळाने उठल्यावर आधी नूतन खूप टेन्शन मध्ये होती हे काय केलं आपण …आणि पूर्ण रस्ताभर बोलली नाही अविनाश सोबत ..संजुला वाटलं त्याचा मोबाइल हरवला तो रडत होता ताई मोबाइल हरवला माझा …नूतनने त्याची समजूत घातली आपण नवा घेऊ …
पण आता हे नुतनला सांगणं आवश्यक होतं आणि तीच हे तुमच्या तोंडुन वादवून घेऊ शकत होती …संजुला काही समजलंच नाही नूतन आजून जिवंत कशी …नक्कीच ते लोक आले नाहीत …त्याला फोन नसल्याने ना टेक्स्ट करता येत होता न कॉल …पण अविनाश आणि नूतन बोलत नाहीत पाहून त्याला बर वाटल 
पुढे जेवणासाठी एका हॉटेलमध्ये आम्ही थांबलो …तिथे एक रूम मी आधीच घेतली होती …नूतन जेव्हा वॉशरूम जवळ आली… मी तीचा हात पकडला आणि तिला रूम मध्ये घेऊन गेलो …पाठोपाठ अविनाश पण आला …माझा चेहरा पाहिल्यामुळे ती ओरडली नाही . नशीब साथ देत होत …मला जिवंत पाहून ती खूप खुश झाली ..पण अवाक पण झाली …हे कसं काय?पप्पा तुम्ही?आणि अविनाश तुला कस माहीत ?
मग मी तिला सर्व माहिती दिली…संजुचे टेक्स्ट दाखवले …आजपर्यंत जे घडलं ते सगळं सांगितलं…आता आपल्याला पुरावा हवा होता …जो फक्त त्यांच्याकडूनच मिळू शकतो …पण तू आणि अविनाश नाराजच आहात अस दाखव …म्हणजे त्यांना तू आता बेसहारा झाली आहेस अस वाटेल आणि त्यांच्या तुला मारायच्या हालचाली आजच चालू होतील …
मी तुषारला पण सगळं सांगून ठेवलं होतं …तो तर मी जिवंत आहे ऐकून खूप खुश झाला …आणि आता मी आणि उमाकांत एकत्र झालोत ऐकल्यावर तर खूपच खुश…त्याला पुरावा हवा होता …त्याकरितानूतनच हे नाटक …तुम्हाला वाटलं नूतनला मारलं त्या लोकांनी.... तुम्ही बेसावध होता ..त्यामुळे नुतनला लगेच तर नक्कीच काही करू शकणार नव्हतात…आमच्या या पाशात तुम्ही  अडकले आहात..तुम्ही जे काही बोललात सगळं नूतनने रेकॉर्ड केलं आहे …
इतक्यात तिथे तुषार आणि अविनाश आले …तुषारने त्यांना अटक केली …मेघना ओरडत होती मी चुकले माफ करा …मला असं जेल मध्ये नका टाकू …माझा पोरगा लहान आहे त्याला तरी सोडा …इतक्यात तुषार बोलला …वहिनी आपण जे पेरतो तेच उगवतो हो …तुम्ही तुमच्या मुलाला पण फक्त लोभी बनवले तो तसाच झाला …आणि विश्वासने सगळ्यांना नेहमी मदत केली …चांगले संस्कार केले …त्याच्या पाठीशी खूप जण उभे राहिले …त्याने केलेल्या पुण्यकर्मामुळे तो तुमच्या कटामधून सहीसलामत राहिला …तुषार त्या तिघांना घेऊन गेला …इतक्यात छोटी राजुल बाहेर आली … जी इतकावेळ झोपली होती …
नूतनने तिला उचलून घेतलं …आणि बोलली आजपासून तू माझी बहिण नाहीस मुलगी आहेस …
अविनाशने पण पाठीमागून येऊन नूतनच्या खांद्यावर हात ठेवला

समाप्त
©पुनम पिंगळे